Read in
सोमवार 05 जूलै 2021 चे दैनिक राशीभविष्य
सोमवार 05 जूलै चंद्ररास मेष 18:58 पर्यंत व नंतर वृषभ. चंद्रनक्षत्र भरणी 12:11 पर्यंत व नंतर कृतिका.
वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :–व्यवसायात नवीन स्पर्धक समोर शह देण्यासाठी उभे असल्याचे कळेल. परिस्थिती ओळखून कोणावरही विश्र्वास ठेवू नका. ज्येष्ठ मंडळींबरोबर चर्चा केल्यास बर्याच प्रश्र्नातून बाहेर पडता येईल. संकटाला स्वत:पेक्षा मोठे समजू नका.
वृषभ :–सध्या तुम्हाला ज्या मनाविरुद्ध गोष्टी कराव्या लागत आहेत त्यातही खंत करू नका. त्यातूनच तुम्ही यशाकडे वाटचाल करणार आहात. कोणत्याही बाबतीत बेजबाबदारपणे वागल्यास त्रास सोसावा लागेल. नोकरीतही वाद निर्माण होणार नाही याची खबरदारी घ्या.
मिथुन :–नोकरीत पदाधिकार्यांबरोबर वागताना विचारल्याशिवाय स्वत:चे मत देऊ नका. व्यवसायातील प्रलंबित येणी वसूल करण्यासाठी आता फार कष्ट घ्यावे लागणार नाहीत. तरूण वर्गास किडनी स्टोनचा त्रास असलेल्यांनी दुर्लक्ष करू नये.
कर्क :–आज वरच्या तुम्ही करत असलेल्या कष्टाला फळ आल्याचे दिसेल. मित्रमंडळीतील गुप्त गोष्टींना गुप्तच ठेवा अनवधानानेही त्याचा उल्लेख करू नका. समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या सहवासातील मौल्यवान क्षणांचा अनुभव येईल.
सिंह :–कालपरवापर्यंत आपली प्रकृती नाजूक आहे असे म्हणणार्यांना आपले आरोग्य पोलादी असल्याचे जाणवेल. तुम्ही सहकार्याबरोबर केलेली तडजोड वरिष्ठांकडून कौतुकाला पात्र होईल. सकारात्मक विचारवरचे तुमचे उद्बोधन लोकांकडून गौरवले जाईल.
कन्या :–विवाहेच्छू मुलींना मनपसंत जोडिदार मिळणार आहे. कलाकार मंडळीना त्यांच्या कलागुणांना चांगला वाव मिळणार आहे. पुरूष वर्गाने कर्तव्याबरोबर भावनेलाही महत्व द्यावे. व्यावसायिकांनी भागिदारांबरोबर चर्चा करूनच निर्णय घ्यावा एकट्याच्या विचाराने नको.
तूळ :–समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींचा सहवास लाभेल. तुमच्या समझोत्याच्या बोलण्यामुळे समोरील व्यक्तीलाही माघार घ्यावी लागेल. वयोवृद्ध मंडळी आज जास्तच भावनाप्रधान होतील. कुटुंबातील वातावरण आज अतिशय आनंददायी राहील.
वृश्र्चिक :–महिलांनी आपल्या आरोग्याचा प्रथम विचार करावा. सामाजिक क्षेत्रातील महिलांना आपल्या कामाच्या आघाड्या सांभाळताना धावपळ होणार आहे. व्यावसायिकांनी आपल्या प्रोजेक्टचे अधिकार स्वत:च्याच हातात ठेवावेत.
धनु :– हातातील काम पूर्ण होण्यापूर्वीच पुढील कामाची जबाबदारी तुम्हाला स्विकारावी लागेल. मुलांबरोबर आईवडीलांनी संवाद साधल्यास मुलांचे मनोबल वाढणार आहे. आज तुमच्या बाबतीत आनंददायी घटना घडणार आहेत.
मकर :– महत्वाच्या विषयावरच्या चर्चासत्रात तुमचा सहभाग महत्वाचा ठरेल. विद्यार्थ्यांना आपले ध्येय गाठण्यासाठी पूर्ण विचाराने निर्णय घ्यावा लागेल. राजकीय मंडळीनी संयमाने परिस्थिती हाताळल्यास तुमची प्रतिमा मलीन होणार नाही.
कुंभ :–कुटुंबातील ज्येष्ठांना त्यांच्या आवडत्या गोष्टी उपलब्ध करून द्याल. कुटुंबात शुभकार्याची नांदी होईल. सरकारी कर्मचार्यांनी दुसर्यांच्या अधिकारातील कामात हस्तक्षेप करू नये. आजचा दिवस तुम्हाला एखादे धाडस करण्यास भाग पाडेल.
मीन :–आर्थिक नियोजनास प्राधान्य देऊनच बाकिचे नियोजन करावे. कुटुंबातील ज्येष्ठ व कनिष्ठ व्यक्तीसाठी मौल्यवान खरेदी कराल. ज्येष्ठ मंडळींच्या मदतीने व्यवसायातील अडचणींवर उपाय सापडेल. मित्रमंडळीमधे तुमच्याविषयी अतिशय आदराची भावना निर्माण होईल
| शुभं-भवतु ||