Rसोमवार 28 जून 2021 चे दैनिक राशीभविष्यead in
शनिवार 03 जुलै 2021 चे दैनिक राशीभविष्य
शुक्रवार 02 जूलै चंद्ररास मीन दिवसरात्र व चंद्रनक्षत्र रेवती अहोरात्र.चंद्र नक्षत्र रेवती 06:13 पर्यंत व नंतर अश्र्विनी. वरील
दोन्ही राशी नक्षत्रांचा करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत
आहे.
मेष :- संततीच्या प्रतीक्षेत असलेल्या नव दाम्पत्यांना गोड बातमी कळणार आहे. शैक्षणिक क्षेत्रात मानसन्मानाचे प्रसंग
येतील. सूचक स्वप्नांचा अर्थ लावून पुढील निर्णय घ्या. उद्योग व्यवसायातील आज घेतलेले निर्णय लाभदायक राहणार
नाहीत. कोणतेही धाडस करताना बुद्धी चातुर्याचा वापर करा. अचानक गरिबांची दया येऊन दान धर्म कराल.
वृषभ:- आज तुम्ही करणार असलेल्या खर्चातून तुम्हाला कोणतेही समाधान मिळणार नाही. वैवाहिक जीवनातील
धुसफूस वाद निर्माण करेल. व्यवसाय व्यवहारातील निर्णय ज्येष्ठांच्या सल्ल्याने ना घेतल्यास आर्थिक नियोजन कोलमडेल.
भागीदाराबरोबरच्या व्यवहारातील मनात दाबून ठेवलेले नकारात्मक विचार काढून टाका. विचारातील लहरीपणा
वाढल्याने कोणताही निर्णय घेऊ नये.
मिथुन:- व्यवसाय व्यवहाराबाबत अचानक वेगवेगळ्या कल्पना सुचतील. जोडीदाराला खुश करण्याकरता त्यांच्या
आवडीची खरेदी कराल. समोरच्या व्यक्तिविषयीचा मनातील राग गरज नसताना उफाळून येईल. महिलांना व पुरुषांना
सासुरवाडी बरोबरच्या बोलाचालीत समाधान वाटणार नाही.
कर्क:- पती पत्नीने एकमेकांविषयीचे मत नकारात्मक करु नये. सरकारी खात्यातील अधिकारी किंवा न्यायसंस्थेतील
पदाधिकारी यांनी वस्तुस्थिती सोडून भावनांना महत्त्व देऊ नये. आज कोणत्याही प्रसंगात मित्र मैत्रिणींची साथ मिळेल.
ओबेस व्यक्तींनी मनाने व्यायाम करू नये.
सिंह:- वडिलांच्या नात्याकंडील मंडळींबरोबर तात्विक मतभेद होतील.महिलांनी रागावर नियंत्रण ठेवावे. वकिल
मंडळींना सरकारी केस मध्ये हस्तक्षेप करावा लागेल. आज गुंतवणूक लाभदायक होणार नाही. वडील काका यांच्या
तब्येतीची काळजी घ्या.
कन्या:- प्रेमविवाहाच्या बाबतीत कुटुंबाकडून विरोध होईल. नोकरतील तुमच्या योगदानाबद्दल वरिष्ठांकडून सन्मान केला
जाईल. जास्त झोप असलेल्या व्यक्तींनी झोपेची मर्यादा पाळावी. विवाहेछु मुलामुलींना वयात जास्त अंतर असलेले स्थळ
येईल. अनावश्यक प्रवास टाळा.
तूळ:- अचानक निघणाऱ्या खर्चाला थांबवू शकणार नाही. आई बरोबरील व्यावहारिक बोलणी फिस्कटतील. उच्च
शिक्षणाची स्वप्ने लवकरच पूर्ण होण्याचे संकेत मिळतील. कोणत्याही परिस्थितीत प्रवास करू नका. कारखान्यात
मशिनवर काम करणाऱ्यांनी आज विशेष काळजी घ्यावी.
वृश्चिक:- मनातील वादळाला शांत करण्यासाठी जवळच्या व्यक्तीशी मन मोकळे करून बोला. महिलांच्या अध्यात्मिक
अभ्यासात वाढ होईल. व्यापार व्यवसायात कोणतेही धाडस करू नका. मातोश्रीच्या मार्गदर्शनाने निर्णय घ्या. शारीरिक
आजारापेक्षा मानसिक विचाराने हैराण व्हाल. सासुरवाडीच्या न्यायालयीन कामकाजात लक्ष घालावे लागेल.
धनु:- बँकेतील शीलकीला खर्चाचे कलाम निघेल. नोकरीतील भेडसावणाऱ्या अडचणींवर लहान भावंडकडून उपाय
सापडेल. प्रेमाच्या व्यवहारात निर्णय घेण्याच्या विचारात चलबिचलता येईल. आजारी असलेल्यांच्या प्रकृतीची काळजी
चिंता वाढवेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.मकर:- प्रत्येक अरेला कारे केल्याशिवाय मन शांत राहणार नाही. शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवराना त्यांचे मार्गदर्शन
वेबिनरच्या साहाय्याने करता येणार आहे. कुटुंबाच्या समधानासाठी लहानसा प्रवास घडेल. अभ्यासाचे योग्य नियोजन
ना केल्याने अडथळे निर्माण होतील.
कुंभ:- आध्यत्मिक गुरू आपल्या साधकांना मार्गदर्शन करतील. नियोजीत प्रवासाच्या रूपरेषेत बदल होईल. पाळीव प्राणी
आजारी पडल्याने दवाखान्यात न्यावे लागेल. प्रेमिकांकडून वैवाहिक जीवनाविषयी स्वप्ने रंगवली जातील. सरकारी
रेगाळलेल्या कामात महिला अधिकाऱ्यांची मदत होईल.
मीन:- प्रवासात त्रास संभवतो. आई भागीदार असलेल्या व्यवसायात आईचे मार्गदर्शन उपयोगी पडेल. ठरलेल्या विवाहात
अडचणी निर्माण होतील. ऋषितुल्य गुरुवर्यांकडून मार्गदर्शन मिळेल. मित्र मंडळींबरोबर व्यावहारिक वाद निर्माण होईल.
||शुभं–भवतु ||