Rसोमवार 28 जून 2021 चे दैनिक राशीभविष्यead in
शुक्रवार 02 जूलै 2021 चे दैनिक राशीभविष्य
शुक्रवार 02 जूलै चंद्ररास मीन दिवसरात्र व चंद्रनक्षत्र रेवती अहोरात्र.वरील राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या
पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :–प्रकृती अस्वास्थ्यामूळे आज तुम्हाला काही करावेसे वाटणार नाही. रोजच्याच कामातील अचानक गुंतागुंत
वाढल्याचे जाणवेल. नोकरीच्या ठिकाणी आज नेहमीपेक्षा कामाचा भारही जास्त जाणवेल. दिवसभर सकारात्मक
राहण्याचा प्रयत्न करा.वृषभ :–कुटुंबात अचानक मित्रमंडळींचे येणे होऊन सहजच गेट टुगेदरचा फिल येईल. तरूणांची चैन करण्याची प्रवृत्ती
वाढेल. महिलांना उद्योगासाठी बँकेचे कर्ज काढण्याची कल्पना सुचेल. गेल्यावर्षापासूनचे रेंगाळलेले काम पूर्ण
करण्यासाठी सहकार्यांची मदत मिळेल.मिथुन :–संततीच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. नोकरीतील बाकी येणे हातात पडल्यामुळे सुखवस्तू, किंवा
चैनीच्या वस्तूंची खरेदी करण्याचा मोह होईल. सरकारी कामातून मिळणारे उत्पन्नही लवकरच मिळणार
असल्याचे संकेत मिळतील.कर्क :–नवीन जागेच्या शोधतील महिलांना बजेटमधील जागेची माहिती कळेल. पूर्वीच बुकींग केलेल्यांना घर पूर्ण
होत आल्याचे कळेल. कुटुंबात गावाकडून आजीआजोबांचे येणे होईल. भूतकाळातील घटनांवर सध्याचा प्रसंग
पडताळू नका.सिंह :–ज्येष्ठांनी आहार व आराम यांकडे विशेष लक्ष द्यावे. तरूणांनी व्यायामाचा अतिरेक करू नये. वयस्कर
मंडळींच्या विचारांमधे सुसंगती राहणार नाही तरी त्यांना समजून घ्यावे लागेल. गरज नसताना प्रवास करू नये.कन्या :–तरूण वर्गाने व्यसनापासून दूर राहण्यासाठी सकारात्मक विचार करावा. व्यावसायिक क्षेत्रातील अंदाजावर
कोणतीही गणिते व व्यवहार ठरवू नका. मित्रमंडळीमधे तुमच्याविषयी अतिशय आदराची भावना निर्माण होईल.तूळ :–नव्याने आलेल्या नोकरीच्या संधीने हुरळून जाऊ नका. पूर्ण माहिती घेऊनच पहिली नोकरी सोडा. घराचे
सँनिटायझेशन करून घेतले जाईल. लहान मुलांच्या कलेला चांगला वाव मिळेल. महिलांनी आँन लाईनच्या
माध्यमाचा व्यवसायात वापर करावा.वृश्र्चिक :–वडिलोपार्जित इस्टेटीबाबत आता पक्का निर्णय घेण्याची वेळ आलेली आहे. कुटुंबातील ज्येष्ठ मंडळींच्या
विचाराने निर्णय घ्या. आर्थिक स्थिरता आल्याने मानसिक स्वास्थ्य वाढेल. विशेषत: ज्येष्ठांच्या आवडीच्या
गोष्टींची खरेदी कराल.धनु :–मित्रमैत्रिणींकडून प्रेरणा घेतल्याने नवीन व अवघड विषयाचा अभ्यास करण्याची मानसिक तयारी होईल.
अचानक खर्चाच्या बाबींमधे वाढ होऊन खरेदीचा मनावर ताबा राहणार नाही. महिलांनाही काटकसरीचा विसर पडेल.मकर :–कुटुंबप्रमुखांनी कोणतेच निर्णय भावनेच्या आहारी जाऊन घेऊ नयेत. स्वत:च्या व्यवसायातील अडचणी
इतरांना सांगू नका. बाहेरगावी असलेल्या मुलांबरोबर त्यांच्या अडचणींवर चर्चा करावी लागेल. नव्याने करत
असलेल्या कलाक्षेत्रातील कामात चांगली प्रगती होईल.कुंभ :–आज तुम्हाला प्रसंगावधानाने वागावे लागणार आहे. नोकरीच्या ठीकाणीही कामात अचानक आलेल्या
अडचणीला तोंड द्यावे लागेल. तरूण मंडळींचा सहवास ज्येष्ठांना हवाहवासा वाटेल. चुकीच्या मैत्रीच्या संबंधातून
मानसिक त्रास निर्माण होईल.मीन :–नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी आज तुमच्या स्वभावातील लहरीपणा इतका वाढेल की क्षुल्लक घटनांवरून
वाद निर्माण होईल. आपल्या नियोजित कामावर लक्ष केंद्रित केल्यास अपेक्षित साध्य साधता येईल.
||शुभं–भवतु ||