Rसोमवार 28 जून 2021 चे दैनिक राशीभविष्यead in
गुरूवार 01 जूलै 2021 चे दैनिक राशीभविष्य
गुरूवार 01 जूलै 2021 चंद्ररास मीन दिवसरात्र व चंद्रनक्षत्र उत्तरा भाद्रपदा 27:48 पर्यंत व नंतर रेवती.वरील राशी
नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश
देत आहे.मेष :–आज मानसिक त्रास होणार्या घटनांपासून स्वत:हूनच दूर रहा. मुलांकडून नकळतपणे तुमचे मन दुखावले
जाणार आहे. नोकरीत जून्या सहकार्यांची भेट झाल्याने मनास उर्जा मिळेल. महिलांनी सकारात्मक विचाराने
वागल्यास अवघड कामही सोपे वाटेल.वृषभ :–सकाळपासूनच कामाची होणारी धांदल दुपारपर्यंतही तशीच चालणार आहे. तरूण मुलांच्या मनातील
विचाराचा जराही थांगपत्ता लागणार नाही. नोकरीव्यतिरिक्त राहिलेल्या वेळेत एखादा उद्योग करण्याचे नियोजन
कराल.मिथुन :–नव्याने आर्थिक गुंतवणूक करायला आजचा दिवस तुमच्यासाठी लाभदायक आहे. उद्योग, जोडधंद्यातून
होणारी आर्थिक प्राप्ती आचंबित करणारी ठरेल. तरूणांना एखादा व्यावसायिक कोर्स करण्याची इच्छा निर्माण होईल.कर्क :–महिलांना मेनोपाँजचा तसेच मासिक पाळीचा अतिशय त्रास होईल. स्वेच्छा निवृत्तीच्या विचारात असल्यास
विशेष लाभ होणार नसल्यास घेऊ नका. इथून पुढे नोकरीतील वातावरण समाधानकारक असणार आहे.सिंह :–डळमळीत झालेली आर्थिक स्थिती अचानक सुधारण्याचे संकेत मिळतील. नवीन नोकरीच्या शोधात
असणार्यांना नवीन चांगली संधी मिळेल. नातेवाईकांबरोबरचे बिघडलेले संबंध नव्याने प्रस्थापित कराल.कन्या :–धार्मिक कार्यासाठी नातेवाईक एकत्र आल्याने कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. संततीच्या कलाने
घेतल्यास वादाचे प्रसंग टळतील व समजूत काढणेही सोपे जाईल. नोकरीत निष्कारण कष्ट व दगदग वाढणार आहे.तूळ :–कुटुंबात जोडीदाराचा लहरीपणा वाढेल त्यामुळे आज मौन धारण करावे लागेल. कुटुंबात नवदांपत्याकडून गोड
बातमी कळेल. अस्थमा, किंवा श्वासांचे विकार असलेल्यांनी विशेष काळजी घ्यावी.वृश्र्चिक :– कमी श्रमाने आज जास्त लाभ होणार आहे. शेअर मार्केटमधील गुंतवणूक लाभदायक राहील. वयस्कर
मंडळीनी औषधाचे वेळापत्रक नीट सांभाळावे. आज महिलांना, तरूणींना मनातील इच्छापूर्तीचा आनंद मिळेल.धनु :–आर्थिक बाजू सुधारल्यामुळे मुलांच्या आवडीच्या गोष्टींची खरेदी कराल. पतीपत्नीच्या विचारातील तफावत
वाद निर्माण करेल. नात्यातील धार्मिक विधी उपस्थित राहण्याचा आग्रह तुम्हाला मोडता येणार नाही.मकर :–तरूणांच्या आरोग्यात चांगली सुधारणा होईल. कुटुंबात स्वास्थ्य निर्माण होईल. परदेशी जाऊ इच्छिणार्यांनी
आता विचार करायला हरकत नाही. उधारीवर कोणत्याही वस्तूंची खरेदी करू नका. आज ठरवलेल्या साध्या साध्या
गोष्टीतही विलंब होईल.कुंभ :–जूनी येणी परत मिळण्याचे मार्ग मोकळे होतील. हातातील पैशांचा वापर काटकसरीने केल्यास मानसिक त्रास
होणार नाही. कोणत्याही प्रकारची लाँटरी किंवा कोणत्याही शेअर्समध्ये आज पैसे गुंतवू नयेत नुकसान संभवते.मीन :–नोकरीत कोणतीही जोखीम घेऊ नका. आर्थिक बाजू समाधानकारक झाल्याने कुटुंबात सुखवस्तू ची खरेदी
कराल. वडीलांकडून मानसिक आनंद देणार्या घटना घडतील. मुद्धाम वडिलांच्या इच्छेकरीता वेळ काढून आज
धार्मिक विधी पार पाडाल.
||शुभं–भवतु ||
Thank you Tai