Rसोमवार 28 जून 2021 चे दैनिक राशीभविष्यead in
बुधवार 30 जून 2021 चे दैनिक राशीभविष्य
बुधवार 30 जून चंद्ररास कुंभ 19:42 पर्यंत व नंतर मीन.
चंद्रनक्षत्र पूर्वा भाद्रपदा 26:02 पर्यंत व नंतर उत्तरा भाद्रपदा.
वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने
नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :–नात्यातील बिघडलेल्या नातेसंबंधात तुम्हाला मध्यस्थी करावी लागेल. समोर आलेल्या प्रसंगात तुम्हालाही
मार्ग काढणे काहीसे अवघड जाणार आहे. नोकरीत प्रमोशनच्या बाबतीत स्वतहून कोणतेही भाष्य करू नका.वृषभ :–हातातील असलेल्या गोष्टीत जास्त रस घेतल्यास आनंदाचे क्षण अनुभवता येथील. आर्थिक व्यवहार
करताना कोणतीही जोखीम घेऊ नका. डाँक्टर मंडळीना आपल्या नियोजित कामापेक्षा जास्त दगदग होईल.
महिलांची लहान सहान कारणावरून मानसिक चिडचिड होईल.मिथुन :–वयस्कर मंडळींना पाय घसरून पडण्याची भिती आहे तरी काळजी घ्यावी लागेल. तुमच्या बोलण्यातील
चतुरपणामुळे तुमचा प्रभाव पडेल. सरकारी कामातील दुर्लक्षित राहिलेल्या कामाकडे आज लक्ष दिल्यास दंड टळेल.कर्क :–नियोजन करूनच केलेल्या कामातील प्रगती समाधानकारक राहील. ज्येष्ठांच्षा वागण्या बोलण्यातून
इतरांचा गैरसमज होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. नोकरीतील तुमच्या जबाबदारीतील कामाकडे जराही
दुर्लक्ष करू नका.सिंह :–आपण आता कोणाबरोबर मैत्री करायची व कोणाबरोबर नाही याचा संभ्रम दूर होईल. कोणत्याही प्रलोभनाला
बळी न पडता नियमात बसणारी कामेच करा. नोकरीतील कामाचा ताणतणाव वाढल्याने ब्लडप्रेशरचा त्रास
संभवतो.कन्या :–उच्चशिक्षणासाठीचे परदेशी जाण्याचे मनसुबे आता दृष्टीपथात येथील. मित्रपरिवाराबरोबर आज कोणताही
आर्थिक व्यवहार करू नका. कुटुंबातील वातावरणातील ताण तणाव आज तुमच्या हस्तक्षेपाने कमी होणार आहे.तूळ :–नैतिक मुल्ये जपून घेतलेले निर्णय एकदम अचूक ठरतील. नोकरीतील प्रोजेक्टमधे नव्या प्रयोगांना
वरिष्ठांची परवानगी मिळेल. महिलांना नेत्रविकाराचा त्रास संभवतो. घरातील व्यवहारात सकारात्मक पवित्रा घ्यावा
लागेल.वृश्र्चिक :–कोणत्याही निर्णयात घाई करू नका. आपल्या वागण्या बोलण्यातून इतरांबद्धलचा राग व्यक्त होईल.
लहान मुलांना आज त्याच्या अडमुठ्या वागण्याला समजून घ्यावे लागेल. कोणत्याही परिस्थितीत रागावर नियंत्रण
ठेवावे लागेल.धनु :–आज तुम्ही तुमच्या हातातील कामाबाबत आत्मविश्वास वाढवला तर नक्कीच यशाचा मार्ग दिसेल लहानश्या
अपयशाने खचून जाऊ नका. व्यवसायातील उधारी वसूल करण्याकरीता मानसिक त्रास संभवतो.मकर :–कुटुंबातील प्रश्र्न चर्चेने सुटतात याचे उत्तम उदाहरण घालून द्याल. मोहाला व लोभाला बळी पडून नसती
आफत ओढवून घ्याल. तरूणांनी आपल्या मनातील विचार योग्य तर्हेने इतरांसमोर मांडावेत.कुंभ :–कोणत्याही गोष्टीची चिंता करून काम सुटणार नाही हे लक्षांत घेऊन प्रथम कामाला लागा. वैवाहिक जीवनात
समंजसपणे वागल्यास अडचणी न वाढता योग्य मार्ग निघेल. राजकीय मंडळीनी कोणतेही डावपेच आखू नयेत.मीन :–व्यावहारिक तडजोडीला महत्व दिल्यास कामातील गुंतागुंत कमी होईल. लहान मुलांच्या हाताला अग्नी
पासून इजा होण्याचा धोका आहे. वयस्कर मंडळीना आज त्याच्या मनासारखा आनंद मिळणार आहे.
||शुभं–भवतु ||