Rसोमवार 28 जून 2021 चे दैनिक राशीभविष्यead in
सोमवार 28 जून 2021 चे दैनिक राशीभविष्य
सोमवार 28 जून चंद्ररास मकर 12: 59 पर्यंत व नंतर कुंभ. चंद्रनक्षत्र धनिष्ठा
24.48 पर्यंत व नंतर शततारका .
वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने
नक्षत्रीय फलादेश देत आहे.मेष :–आपण प्रामाणिकपणे केलेल्या कष्टाचे कसे फळ मिळते याचे जिवंत उदाहरण इतरांना दाखवाल. लहान
भावंडाचे बरेच दिवसापासून अडकलेले काम तुमच्या प्रयत्नाने मार्गी झाल्याचे कळेल व कुटुंबातील सर्वानाच आनंद
होईल.वृषभ :–संततीच्या प्रकृतीची काळजी वाढवणार्या घटनांचा त्रास होईल. चोराने चोरून नेलेल्या वस्तूंचा सुगावा
लागेल. तुम्ही केलेल्या नियोजनात कालावधीपेक्षा आर्थिक बाबींना महत्व न दिल्याने नुकसान संभवते.मिथुन :–व्यवसायाचे स्वरूप बदलता बदलता डायरेक्ट व्यवसायातही नवीन बदल करावा असे वाटेल. मित्राला
दिलेला शब्द पाळल्याने सर्वत्र कौतुक होईल. सामाजिक पातळीवरील तुमच्या शब्दाला असलेली किंमत बघून
सर्वजण आश्र्चर्य चकीत होतील.कर्क :–फँक्टरी कींवा व्यवसायाच्या जागेत बदल करण्याची तीव्र इच्छा होईल. उच्चपदावरील ओळखीचा तुम्च्या
अडलेल्या कामासाठी अचानक उपयोग करून घेता येणार आहे. आज बोलण्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील.सिंह :–घराबाबतच्या समस्यांवर मित्रांच्या मदतीने अचूक उपाय निघतील. नोकरीतील बदलाला किंवा
व्यवसायातील समस्यांना विचार करूनच सामोरे जा. मित्रमैत्रिणींच्या विचारांचा पगडा निदान आज तरी नको.कन्या :–कौटुंबिक पाठींब्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे. नोकरीत आज अचानक दगदग वाढणार आहे.
ऐकीव बातमीवर विश्र्वास ठेवून आपल्या कोणत्याही निर्णयात बदल करू नका. वैवाहिक जीवनातील मतभेदांवर
पडदा टाकणे तुमच्या हातात आहे.तूळ :–आज तुमच्या स्वभावातील लहरीपणा इतका वाढेल की कोणत्याच बाबतीत तुम्ही निर्णय घेऊ शकणार
नाही. आज अनिच्छेने कोणत्याही गोष्टी करू नका. कुटुंबातील गैरसमज कमी करण्याचा तुमचा प्रयत्न फसणार
आहे.वृश्र्चिक :- आपला आनंद कशात आहे हे समजून विचार करावा लागेल. नात्यातील व्यवहारात लगेच आपले मत
व्यक्त करू नका. नोकरीतील कामाचा ताणतणाव वाढल्याने ब्लडप्रेशरचा त्रास जाणवेल. मित्रमंडळीना आर्थिक मदत
करावी लागेल.धनु :–नात्यातील व्यवहारात समझोत्याची बोलणी करण्यासाठी मध्यस्थी करावी लागेल. नव्याने करत असलेल्या
सामाजिक क्षेत्रात तुमच्या कामातील प्रामाणिकपणाबद्धल सर्वांकडून कौतुक होईल. आर्थिक नियोजनास महत्व
द्यावे लागेल.मकर :–आज पित्तविकाराचा व डोकेदुखीचा त्रास जाणवेल. कोणत्याही व्यवहारातील इतरांकडून झालेल्या
विरोधाबद्धल लगेच नाराज न होता त्यावर उपाय शोधा. महिलांनी अती हळवे होऊ न देता आपल्या भावनांवर
नियंत्रण ठेवावे.कुंभ :–आज तुमच्या बाबतीत सर्वच घटना तुमचा आनंद वाढवणार्या ठरतील. आर्थिक व्यवहारात कागदपत्रे
वाचल्याशिवाय कशावरही सही करू नका. कुटुंबातील खर्चामुळे आर्थिक नियोजन कोलमडेल. नातेवाईकांसाठी
लहानसा प्रवास करावा लागेल.मीन :–आज मिळणार्या आर्थिक प्राप्तीमधे इतरांचाही वाटा आहे हे विसरू नका. राजकीय मंडळीनी विरोधकांच्या
डावपेचांकडे दुर्लक्ष केल्यामुळे विरोधकांची ताकद जास्त वाढणार आहे तरी दखल घ्यावी लागेल. कुटुंबातील ज्येष्ठ
व्यक्तीसाठी अचानक मनात आले म्हणून मौल्यवान वस्तूची खरेदी कराल.
||शुभं–भवतु ||