Read in
रविवार 04 जुलै 2021 ते शनिवार 10 जुलै 2021 पर्यंतचे साप्ताहिक राशी भविष्य
रविवार 04 जुलै चंद्ररास मेष दिवसरात्र व चंद्रनक्षत्र अश्र्विनी 09:04 पर्यंत व नंतर भरणी.
सोमवार 05 जूलै चंद्ररास मेष
18:58 पर्यंत व नंतर वृषभ. चंद्रनक्षत्र भरणी 12:11 पर्यंत नंतर कृतिका. मंगळवार 06 जुलै चंद्ररास वृषभ दिवसरात्र व
चंद्रनक्षत्र कृतिका 15 :19 पर्यंत व नंतर रोहिणी. बुधवार 07 जुलै चंद्ररास वृषभ दिवसरात्र व चंद्रनक्षत्र रोहिणी 18 :17
पर्यंत व नंतर मृगशीर्ष. गुरूवार 08 जुलै चंद्ररास वृषभ 08:40 पर्यंत व नंतर मिथुन. चंद्रनक्षत्र मृगशीर्ष 20 :57 पर्यंत व
नंतर आर्द्रा. शुक्रवार 09 जुलै चंद्ररास मिथुन दिवसरात्र व चंद्रनक्षत्र आर्द्रा 23:13 पर्यंत व नंतर पुनर्वसु. शनिवार 10 जुलै
चंद्ररास मिथुन 18:37 पर्यंत व नंतर कर्क. चंद्रनक्षत्र पुनर्वसु 25:01 पर्यंत व नंतर पुष्य.
सोमवार 05 जूलै रवीचा पुनर्वसु नक्षत्रात 29:26 ला प्रवेश होत आहे.
बुधवार 07 जुलै प्रदोष असून याच दिवशी बुधाचा मिथुन राशीत 11:12 ला प्रवेश होत आहे.
शुक्रवार 09 जुलै दर्श अमावास्या असून शनिवारी सकाळी 06:46 ला संपत आहे.
मेष :–कुटुंबात मुलांच्या आजारपणावर व इतर समस्येवर अचानक खर्चाची कलमे निघून मोठी रक्कम खर्च होईल.
नोकरीतून निवृत्त होणार्या आई करीता तरूण मुलांकडून समारंभ आयोजित केला जाईल. कलाकार मंडळींना लोकांच्या
आवडीखातर एखादा कार्यक्रम करण्याची संधी मिळेल व त्यांना चांगली प्रसिद्धीही मिळेल. वडिलांच्या शेअरमार्केटच्या
प्रवृत्तीत जराही बदल न झाल्याने मोठे नुकसान होईल. प्रेमप्रकरणात आनंददायी अनुभव येईल. लहान भावंडाला
शिक्षणासाठी परदेशी जाण्याकरता आर्थिक मदत करावी लागेल.नवीन घराची संधी येऊनही आर्थिक अडचणींमुळे सध्या
स्थगित करावे लागेल. आईच्या मनाला समाधान देणार्या गोष्टी करण्याची संधी तुम्हाला मिळेल.
वृषभ :–बर्याच दिवसापासून आईची पूर्ण न झालेली इच्छा तुमच्याकडून पूर्ण होणार आहे. आईला आपले भाग्य
उजळल्याची भावना येईल. शारिरीक क्षमता बाबत उगाच बढेजाव करू नका. वस्तूस्थितीला सामोरे जाउन आवश्यक तो
व्यायाम किंवा आहारात बदल करा. हा सप्ताह कांही प्रमाणात आंतरिक उर्जा कमी वाटल्याने आळसात जाणार आहे. तुम्हा
आईवडीलांच्या इच्छेखातर व आग्रहामुळे तुमची मुले लग्नाचा विचार करणार आहेत. लहान भावंडाच्या प्रकृतीची खूपच
चिंता निर्माण होईल. जोडीदाराच्या नोकरीच्या ठिकाणातून प्रमोशनची आनंदाची बातमी कळेल व कुटुंबात आनंद निर्माण
होईल.
मिथुन :–तुमच्या व्यवसायातील वर्कशाँप ची जबाबदारी तुमचा लहान भाऊ किंवा बहिण जबाबदारीने उचलणार आहे.
तुमच्या हातातील प्रोजेक्टमधे सुधारणा करण्याचे काम तुमच्यावरच येणार आहे. कारने प्रवास करणार असाल तर या
सप्ताहात अजिबात नको. अत्यावश्यक असेल तर निदान दीनांक 06, 07, व 08 रोजी अजिबात नको. वडीलांना प्रसिद्धीचे
वलय मिळणार आहे. जोडीदाराबरोबरच्या एकत्रित व्यवसायात आर्थिक बाजू उंचावत असल्याचे जाणवेल. दैनंदिन
कामातील कष्टात वाढ होईल पण त्याचबरोबर उत्पन्नातही वाढ होणार आहे.
कर्क :– नवीन जागेच्या शोधात असलेल्यांना तुमच्या आवडीचे मनपसंत घराची माहिती मिळणार आहे. व याच सप्ताहात
घरासाठी पैसे भराल. नोकरीच्या बाबतीत तुम्हाला तडजोड स्विकारावी लागणार आहे. या सप्ताहात विद्यार्थ्यांनी
कोणत्याही स्पर्धेत भाग घेऊ नये. तसेच राजकीय मंडळीनी पण प्रतिस्पर्ध्यांबरोबर वाद निर्माण होईल असे कृत्य करू नये.
तुमच्या खर्चिक वृत्तीचा फारच मोठा फटका या सप्ताहात विशेषत:09,10 तारखेला बसणार आहे. तरूणांना झोपेचा त्रास
संभवतो पण कोणतीही नशा देणारी औषधे घेऊ नयेत.
सिंह :–जोडीदाराचा पासपोर्ट, व्हीसा सारखी महत्वाची डाँक्युमेंटस् सापडणार नाहीत. ज्यांना आपल्या नोकरी व्यवसायात
बदल करायचा आहे त्यांनी अचानक वाटतय म्हणून किंवा फायदेशीर आहे म्हणून करू नये. ज्यांना नव्या घराची प्रतिक्षा
आहे त्यांना प्रशस्त व टेरेस असलेल्या घराची माहिती कळेल. संशोधनाचे काम करणार्या विद्यार्थ्यांना त्यांच्या गाईडचे
चांगले सहकार्य मिळेल. शिक्षक मंडळीना त्यांच्या कामात नव्याने बदल करावा लागेल. लेखक मंडळीना आँन लाईनच्या
कार्यक्रमातून वाचकांपर्यंत पोहोचण्याचा मार्ग खुला होईल. या सप्ताहात तुमचा प्रवास भाग्योदयाच्या दिशेने जात असल्याचे
जाणवेल.
कन्या :–तुम्ही तुमच्या जवळ आजपर्यंत सांभाळलेल्या गुप्त गोष्टींची वाच्यता करू नका. व्यवसायातील नुकसान भरून
काढण्याकरता चे मार्ग सापडतील व त्या दृष्टीने वाटचाल कराल. गावी, परगावी जात असाल तर मौल्यवान गोष्टी घरात ठेवू
नका. चोरी होण्याची शक्यता आहे. ज्यांचे आँपरेशन घाईवर आलेले नाही त्यांनी पुढील सप्ताहात करावे. हा सप्ताह तुम्हाला
लाभदायक नाही आहे. फार्मा क्षेत्रातील मंडळीना, कर्मचार्यांना अचानक एखाद्या आरोपाला सामोरे जावे लागेल. महिलां
आपल्या मनाप्रमाणे व्यवहार करू शकणार आहेत. व्यवसायातील तोटे भरून काढण्यासाठी तुम्ही अतिशय मेहनत कराल.
तूळ :–विवाहसंस्था चालवणार्याना लोकांचा क्षोभ सहन करावा लागेल. राजकीय मंडळीना गुप्तशत्रूपासून भिती संभवते.
कुटुंबातील ज्येष्ठ मंडळींच्या विचाराने घरातील महत्वाचे प्रश्र्न सोडवता येतील तरी त्यांची मदत घ्या. पती व पत्नीमधील
प्रेमात संशय निर्माण होऊन मतभेद निर्माण होतील. नोकरीतील महिलांबरोबर पुरूष वर्ग मिळून मिसळून काम करतील व
त्यामुळे कामाचा आवाका वाढणार आहे. वेदनादायी आजारावर नवीन उपचारपद्धतीची माहिती मिळेल. शारिरीक
व्यंगावर मात करणार्या औषधी कळल्यामुळे सर्वांच्या आशा पल्लवीत होतील. वैयक्तिक जीवनात स्वत:च्या इच्छेला महत्व
द्याल.
वृश्र्चिक :–स्पर्धात्मक बाबींसाठी हा सप्ताह अतिशय लाभदायक ठरेल. सरकारी क्षेत्रातील मंडळीना त्यांच्या हातातील
अधिकारांवर बंधने आणली जातील. हाताखालील कर्मचारी, कनिष्ठ वर्गाकडून महत्वाच्या गोपनिय कामात मदत होईल.
पतीपत्नीच्या एकत्रित व्यवसायात ओव्हर ड्राफ्ट घेण्याची वेळ येईल. सामाजिक कार्यकर्त्यानी स्पर्धात्मक कामाच्या मागे
आपली ताकद लावल्यास चांगले यश येईल. सध्या प्रमोशन मिळण्यात येणार्या अडचणींवर तुम्हाला मात करता येईल पण
त्यासाठी तुम्हाला बदलीसाठी तयारी दाखवावी लागेल.
धनु :–लहान मुले, बालसंगोपन केंद्रे, पाळणाघरे यातील कर्मचार्यांना नवीन उत्पन्नाचा स्त्रोत सुरू होईल. दैनंदिन
काबाडकष्ट करणार्यांना स्वकमाईचा आनंद मिळेल. नोकरीच्या प्रतिक्षेतील मंडळीना नोकरीच्या नवीन संधी मिळतील.
परदेशी शिक्षणासाठी जाऊ इछ्छिणार्यांना त्याचे मार्ग सुकर होत असल्याचे कळेल. अँनिमेशन, ग्राँफिक्स व डिझायनिंगच्या
क्षेत्रातील तरूणांना चांगल्या नोकरीची संधी मिळणार आहे. पण तुमची नोकरी तुमच्या राहत्या ठिकाणापासून लांब
असणार आहे. प्रेम प्रकरणात कुटुंबातून विरोध झाला तरी नाराज होऊ नका. पुढील महिन्याच्या १५ तारखेपर्यंत घरातून
संमती मिळेल.
मकर :–तुम्ही तुमच्या हाताखालील कर्मचार्यांना दिलेले आश्र्वासन जोपर्यंत पूर्ण होण्याच्या मार्गावर जात नाही तोपर्यंत
त्याची वाच्यता कोठेही करू नका. तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्ही केलेल्या बदलामुळे कर्मचार्यांना आनंद झाल्याचे लक्षात
येईल. शेती, बागायती बाबतच्या माहितीसाठी संस्थांमार्फत शेतकरी मंडळीना बोलावले जाईल. भाड्याच्या घरातून
स्वत:च्या घरात लवकरच जावयास मिळणार आहे याची खात्री बाळगा. नोकरीत होणारा मानसिक त्रास हा तात्कालिक
स्वरूपाचा आहे व तो लवकरच कमी होणार आहे यावर विश्र्वास ठेवा.तरूण मंडळींचा निद्रानाशाचा त्रास कमी झाल्याने
मानसिक स्वास्थ्य मिळेल.
कुंभ :–आजारी असलेल्यांना त्याच्या आजारावर उतार पडण्यासाठी वातावरणात बदल करण्यासाठी घरापासून दूर जावे
लागेल. नोकरीत सहकारी वर्गाकडून मिळालेल्या, वरिष्ठांकडून मिळालेल्या सहकार्यामुळे मोठ्या यशाचे धनी व्हाल.
वैवाहिक जीवनात पदार्पण करावेसे वाटणार्यानी प्रथम आपल्या अपेक्षा ठरवाव्यात. तडजोडीच्या मर्यादा ठरवाव्यात.
लेखनकला अवगत असणार्यांनी शाळकरी मुलांसाठी आँनलाईनच्या माध्यमातून वर्कशाँपस घेतील. खाजगी क्षेत्रातील
कर्मचार्यांना नवीन काँन्ट्रक्टचा विचार करावा लागेल.
मीन :–व्यवसायातील आर्थिक परिस्थिती चांगली निर्माण करण्यात तुमचा मोलाचा वाटा राहील. स्मरणशक्तीच्या
अभ्यासात विद्यार्थ्यांना चांगले यश संपादन करता येणार आहे. कुटुंबात अचानक सुना, नातवंडे, यांना घेऊन एखादा
समारंभ पार पडणार आहे. गायक मंडळीना आपल्या गायन कलेला सादर करण्यासाठी आँनलाईन चा वापर करता येणार
आहे. वाहन विक्रीचा व्यवहार चांगला लाभदायक ठरेल. बाहेरगावी उच्च शिक्षणासाठी जाणार्या मुलांना आपल्या घरापासून
दूर जाणे अवघड जाणार आहे. नोकरीत जून्या सहकार्यांची भेट नवी उमेद देणारी ठरेल.
||शुभं-भवतु |