Read in
शनिवार 26 जून 2021 चे दैनिक राशीभविष्य
शनिवार 26 जून चंद्ररास धनु 09:55 पर्यंत व नंतर मकर..
चंद्रनक्षत्र उत्तराषाढा 26:36 पर्यंत व नंतर श्रवण. वरील
राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय
फलादेश देत आहे.मेष :– व्यवसायात परिचयातील तज्ञांचे मार्गदर्शन घेऊन मगच पुढील निर्णय घ्यावा. तरूणांनी कोणत्याही
प्रलोभनाला बळी न पडता आपली कामे प्रामाणिकपणे कशी होतील यासाठी प्रयत्न करावा. नियमावर बोट ठेवून
दुसर्यांच्या चुका दाखवू नयेत.वृषभ :–पतीपत्नीमधील वाद मिटविण्यासाठी मनातील नाराजी काढून तडजोडीचे धोरण ठेवल्यास सर्व काही ठीक
होईल. सामाजिक कार्यातील तुमचा सहभाग इतरांच्या आत्मविश्वासात वाढ करेल. औषधांच्या दुकानातील मंडळीनी
गिर्हाईकांना औषधे देताना जागरूक रहावे.मिथुन :–जवळच्या नात्यातील वाईट बातमीमुळे मनस्थिती इतकी बिघडेल की तुम्हाला आजारी असल्याचे
जाणवेल. आईच्या माहेरकडील मंडळींची भेट झाल्याने मनास उर्जा मिळेल. सकारात्मक विचार करून परिस्थितीवर
मात कराल.कर्क :–सरकारी नियमातील ढिलाईमुळे दंड भरावा लागणार आहे. आर्थिक नियोजनातील चुकांमुळे कामात गोंधळ
निर्माण होईल. कुणाच्याही भरवशावर न राहता स्वकर्तृत्वावर विश्र्वास ठेवून कामाला सुरूवात करा.सिंह :–आजचा दिवस आळसात जाण्याची चिन्हे सकाळपासूनच दिसतील. महत्वाच्या कामासाठी जाताना तज्ञ
व्यक्तीला बरोबर घ्या. वयस्कर मंडळीना आजचा दिवस मानसन्मानाचा राहील व त्यांना आंतरिक आनंद होईल.कन्या :– दवाखान्यात अँडमिट करण्यापासून लागणारे सर्व व्यवहार शेजारच्यांसाठी किंवा मित्रांसाठी करावे
लागतील. महिलांचे मन कमकुवत झाल्याने आज त्या कोणताच मानसिक त्रास सहन करू शकणार नाहीत.तूळ :–आज तुमची तर्कशक्ती अफाट चालेल पण त्याचबरोबर कांही अंदाज साफ चुकतील. ज्यांना जूनाट त्वचारोग
आहे त्यांनी विशेष काळजी घ्यावी. लहान मुलांना व वयस्कर मंडळीना युरीन इन्फेक्शनचा त्रास संभवतो.वृश्र्चिक :–आज लोक तुमच्याकडे आपणहून आकर्षित होतील व बोलायला येतील. आज कोणतेही काम मनाविरुद्ध
केल्यास तुम्हाला मानसिक त्रास होणार आहे. महिला आधुनिक जीवनशैलीचा आनंद घेतील.धनु :–ज्यांचे शिक्षण अपूर्ण राहीले आहे त्यांना पुन्हा शिक्षण सुरू करण्याची इच्छा होईल. महिलांना संगीत व फँशन
या विषयांची ओढ लागेल. तुमच्या मनातील आनंदाच्या गोष्टी तुम्हाला इतरांना कधी सांगतो याची घाई होईल.मकर :–महिलांना एखाद्या घटनेची भिती वाटल्याने मानसिक त्रास होऊन ताप येईल. राजकीय मंडळीना त्याच्या
कार्यक्षेत्रातील सुसंधी मिळणार असल्याचे संकेत मिळतील. घरगुती उद्योगातून आज चांगली आर्थिक प्राप्ती होईल.कुंभ :–महत्वाच्या घेतलेल्या निर्णयामुळे कामे मार्गी लागत असल्याचे अनुभवास येईल. नोकरीत वरिष्ठांकडून
अपेक्षित सहकार्य मिळाल्याने कामास हुरूप येईल. कुटुंबातील ज्येष्ठ मंडळींसाठी त्याच्या आवडीच्या वस्तूंची खरेदी
कराल.मीन :–स्वत:च्या प्रकृतीपेक्षा जास्त महत्वाचे काहीही नसते याचा विचार करा. आजूबाजूचे वातावरण हलके फुलके
ठेवण्याचा प्रयत्न करा. इतरांच्या समस्या सोडवताना तुम्हाला अतिशय जागरूक रहावे लागेल.
||शुभं–भवतु ||
Thank you Tai