Read in
शुक्रवार 25 जून 2021 चे दैनिक राशीभविष्य
शुक्रवार 25 जून चंद्ररास धनु दिवसरात्र व चंद्रनक्षत्र मूळ 06:39 पर्यंत व नंतर पूर्वाषाढा.
वरील राशी नक्षत्रांचा विचार
करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :–आजचा दिवस तुमच्या दृष्टीने अपेक्षापूर्तीचा राहणार आहे. व्यवसायातील नव्याने सुरू केलेल्या योजनांवर
लोक अचंबित होतील व त्यांचा चांगला प्रतिसाद राहील. ज्येष्ठांना आपल्या जून्या ओळखींची उजळणी करावीशी
वाटेल.वृषभ :–स्वत:ला सिद्ध करण्यासाठी कष्टांची पराकाष्ठा कराल व अपेक्षित साध्यही होईल. आज अपचनाच्या
विकाराचा त्रास संभवतो. ज्येष्ठांनी आपल्या आहारावर नियंत्रण ठेवावे व पाण्याची शुद्धता पाळावी.मिथुन :–तुम्हाला आज सकाळपासूनच प्रत्येक कामात अनुत्साह वाटेल . कांही अनपेक्षित कौटुंबिक समस्यांमुळे
त्रास संभवतो. आपल्या वागण्या बोलण्यातून इतरांचा गैरसमज होणार नाही याची दक्षता घ्या.कर्क :–तुमच्या सामाजिक प्रतिष्ठेला बाधा येणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. वयोवृद्ध महिलांकडून
नवविवाहितांना अतिशय मोलाच्या टिप्स मिळतील. नोकरी व्यवसायात अतिशय सावधपणे व्यवहार करावे
लागतील.सिंह :–तुम्ही तुमच्या अंगी असलेल्या चतुरपणामुळे अडचणीतून ही योग्य प्रकारे मार्ग काढाल. समोर आलेल्या
प्रत्येक अडचणींची जबाबदारी तुमच्यावर नाहीय हे लक्षांत घ्या. आज आर्थिक स्थिती चांगली होईल.कन्या :–लहान मुलांना भितीदायक प्राणी कींवा किड्यांची भिती राहील. मुले अंधाराला घाबरतील तरी काळजी घ्यावी
लागेल. नको त्या गोष्टींची चिंता करण्यामुळे काय करावे याचा निर्णय घेता येणार नाही.तूळ :– घराच्या कुलुपाची किल्ली हलवल्यामुळे गोधळ निर्माण होईल. नात्यातील कांही जवळच्याच व्यक्तींचा त्रास
होईल. सरकारी कामात जास्तीत तास्त सतर्कता बाळगल्यास नुकसानी भिती राहणार नाही.वृश्र्चिक :–स्वत:चे महत्व टिकवण्यासाठी उगाच जीवाचा आटापिटा करू नका. कुटुंबातील महत्वाच्या निर्णयात
तरूणांचे मत विचारात घेतल्यास त्यातील छुप्या धोक्यांची कल्पना येईल. कौटुंबिक जीवनात आनंद निर्माण
करण्याचे तंत्र सापडेल.धनु :–विचारपूर्वक घेतलेल्या निर्णयामुळे पुढील काम सोपे होईल. विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या विषयातील
उच्चशिक्षण घेण्याचा मार्ग सापडेल. सकारात्मक विचार केल्यास अपेक्षित इच्छा पूर्ण होतील.मकर :–तुम्हाला तुमचे विचार योग्य प्रकारे मांडण्याची संधी मिळेल. लेखक व कवी मंडळीना त्यांच्या सामाजिक
आशयाच्या लेखनाबाबत सर्वांकडून कौतुक होईल. राजकीय मंडळीनी इतरांच्या भरवशावर राहून कोणतेही
आश्वासन देऊ नये.कुंभ :–इतरांशी असलेले वैचारिक मतभेद मिटवण्याची हीच योग्य वेळ आहे याचा विचार करा. आजारातून
उठलेल्यानी ओव्हरकाँन्फीडन्समधे जाऊ नये. आवश्यक ती विश्रांती घ्यावी. सरकारी नियमांचे उल्लंघन होणार नाही
याची काळजी घ्या.मीन :–कोणतेही घेतलेले निर्णय पूर्ण विचारानेच घ्या. नोकरी व्यवसायातील तुमच्या जबाबदारीतील कामाला
योग्य वेळ न दिल्यास नुकसान होईल. शिक्षण अपूर्ण राहिलेल्यांना सुद्धा योग्यतेप्रमाणे नोकरीची संधी मिळेल.
||शुभं–भवतु ||
Thank you Tai