Read in
गुरूवार 24 जून 2021 चे दैनिक राशीभविष्य
गुरूवार 24 जून चंद्ररास वृश्र्चिक 09:10 पर्यंत व नंतर धनु.
चंद्रनक्षत्र ज्येष्ठा 09:10 पर्यंत व नंतर मूळ. वरील
दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय
फलादेश देत आहे.
मेष :– नोकरी करण्यापेक्षा व्यवसाय करण्याचे विचार मनात येतील. न्यायालयातील वाद न्यायालयाच्या बाहेर
सुटणार असल्याचे लक्षात येईल तरी त्यानुसार प्रयत्न करावेत. स्वत:ला सिद्ध करण्यासाठी कितीही कष्ट
करण्याची मनाची तयारी होईल.वृषभ :–ओळखीच्या व ज्येष्ठ व्यक्तींच्या सल्ल्याने केलेला व्यवसायातील बदल लाभदायक ठरणार आहे. कुटुंबात
अचानक नवीन घर घेण्याचे विचार सुरू होतील. घरगुती उद्योगातून होत असलेली आर्थिक प्रगती कौतुकास्पद
राहील.मिथुन :– आई व मुलगी यांना एकमेकांपासून लांब राहणे अवघड असल्याचे जाणवेल. परदेशातील मुलांना घराची
ओढ अतोनात जाणवेल. कलाक्षेत्रातील कलाकार नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या कला सादर करण्याचे
नियोजन कराल.कर्क :–सामाजिक प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण न करता झपाट्याने काम सुरू कराल. आजपर्यंत तुमच्या मनातील इच्छा
प्रत्यक्षात पूर्ण होण्याकरीता घेतलेल्या प्रयत्नांना यश येत असल्याचे दिसेल.सिंह:–नोकरीच्या ठिकाणच्या प्रत्येक अडचणी, समस्या तुम्हीच सोडवल्या पाहिजेत ह्या भ्रमातून बाहेर या.
महत्वाची खरेदी करताना अती चोखंदळपणा करू नका. नात्यातील विवाह ठरवण्यासाठीच्या व्यवहाराकरीता तुमची
मदत घेतली जाणार आहे.कन्या :–आज तुमच्या बोलण्या वागण्यातील चातुर्य तुमच्या कामी येईल. परदेशाशी संबंधित व्यवहारात आलेल्या
अडचणी चुटकीसरशी सोडवाल. लहान मुलांच्या डोक्याला मार लागण्याची शक्यता आहे तरी काळजी घ्यावी लागेल.तूळ :–कुटुंबात जोडीदाराचा लहरीपणा वाढेल त्यामुळे कोणत्याच विषयाच्या निर्णयावर येऊ नका. अचानक सोने
खरेदीचे बेत ठरतील व तुमचे काहीही चालणार नाही. बालवयातील मुलांचा हट्ट डोके भंडावून सोडेल.वृश्र्चिक :–नुसती चिंता करण्यामुळे काहीच साध्य होत नाही हे लक्षात असू द्या. नोकरीतील वरीष्ठांबरोबर
बोलताना अहंकाराला दूर ठेवल्यास त्यांचे तुमच्याबद्धलचे मत खराब होणार नाही. आजचा दिवस संमीश्र
अनुभवाचा राहील.धनु :–विद्यार्थ्यांना शाळा व शिकवणी क्लासचे वेध लागतील. लहान शाळकरी मुलांनी सायकल चालवताना
संभाळून चालवावी. नात्यातील काही व्यक्तींच्या त्रासाने मनस्थिती हळवी होईल व मोकळेपणाने रडावेसे वाटेल.मकर :– मनाला न पटलेल्या गोष्टीही सकारात्मक विचाराने करायला लागाल. बोलण्यावर नियंत्रण ठेवल्यास
तुम्हाला काहीही त्रास होणार नाही. नोकरीच्या ठिकाणी स्वत:च्या वैयक्तिक बाबींवर चर्चा करू नका.कुंभ :– आज सकाळपासून येणार्या सर्व बातम्या यशाच्या येतील. नोकरदारांची नवीन प्रोजेक्ट्स वरीष्ठ
पातळीवरून मंजूर होतील व तुमचे क्रेडीट वाढेल. वयस्कर मंडळींच्या स्वभावातील चिडचिडेपणा वाढेल.मीन :–कुटुंबातील महत्वाच्या जबाबदार्या सहविचाराने सोडवण्याचा प्रयत्न केल्यास अडचणी वाढणार नाहीत.
लहान वयाच्या मुलावरील संस्कार शाळेची जबाबदारी कुशलतेने सांभाळाल. विचार न करता केलेल्या खरेदीने
आर्थिक बोजा उचलावा लागेल.
||शुभं–भवतु ||