Read in
बुधवार 23 जून 2021 चे दैनिक राशीभविष्य
बुधवार 23 जून चंद्ररास वृश्र्चिक दिवसरात्र व चंद्रनक्षत्र अनुराधा 11:47.पर्यंत व नंतर ज्येष्ठा.
वरील दोन्ही राशी
नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश
देत आहे.
मेष :– नोकरीतील तुम्हाला न पटणार्यां गोष्टीं कराव्या लागल्यामुळे मनात बंडखोरीची भावना निर्माण होईल.
ज्येष्ठांकडून कुटुंबातील प्रत्येकाच्या आवडत्या गोष्टींची पूर्तता लवकरच करणार असल्याचे आश्र्वासन मिळेल.वृषभ :–स्पर्धात्मक कार्यक्षेत्रात काम करणार्यांना त्यांचे मित्रमंडळींकडून चांगले सहकार्य मिळेल. लेखक, कवी
यांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळेल. महिलांनी कुठल्याही परिस्थितीत भावनांचा अतिरेक होऊ देऊ नये.मिथुन :–जमीनीच्या व्यवहारातील मिळणारी दलाली सहजपणाने मिळणार नाही तरी प्रथम कबूल करून घ्या.
नोकरीत वास्तवापेक्षा भविष्यातील लाभाचे अमिष दाखवले जाईल. तरूणांना त्यांच्या मनाविरुद्ध असलेले मत
स्विकारावे लागेल.कर्क :–प्रकृतीकडे केलेले दुर्लक्ष फारच महागात पडणार आहे. दवाखान्यात अँडमिट केलेल्यांच्या प्रकृतीत आराम पडू
लागेल. राजकीय मंडळीना गुप्तशत्रूंच्या हालचालीवर लक्ष ठेवावे लागेल. सरकारी क्षेत्रातील मंडळीना अचानक
कामाच्या दिरंगाईबाबत स्पष्टीकरण द्यावे लागेल.सिंह :–सामाजिक कार्यात तुम्ही केलेल्या कामामुळे मानसन्मानाचे मानकरी व्हाल. आईच्या माहेरकडील मंडळींची
भेट घडणार आहे. तरूणांना आपल्या कार्यक्षेत्रात स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळेल.कन्या :–अधिक आर्थिक प्राप्तीसाठी दुसर्यांच्या सांगण्यावरून अचानक व्यवसायात बदल करू नका. उधार उसनवार
दिलेले पैसे परत मिळण्याचे निरोप येथील. अहंपणाने ताणून धरल्याने नातेसंबंधात बिघाड निर्माण होईल.तूळ :–मोठ्या मार्केटमधे काम करणार्यांना नवनवीन उद्योगांची माहिती मिळेल. बोलण्यात स्पष्टता न ठेवल्याने
गैरसमज होणार आहेत. व्यवसायातील घडामोडींवर लक्ष केंद्रित करताना कुटुंबाकडे दुर्लक्ष करू नका.वृश्र्चिक :–मनातील इच्छा प्रबळ झाल्याने काम पूर्ण करण्याची जिद्ध निर्माण होईल. विद्यार्थी एका विशिष्ट
विषयाच्या अभ्यासाच्या प्रवेशासाठी हट्ट धरतील. मुलींच्याकडे प्रत्येक प्रश्राला प्रतिप्रश्न असल्याने कोणताच प्रश्र्न
सुटणार नाही.धनु :– आज शारिरीक दुर्बल असलेल्यांना मित्रमंडळींच्या सहकार्याने मानसिक बळ वाढेल. इतरांच्या चुका
काढण्यापेक्षा स्वत:च्या कामातील प्रगतीकडे जास्त लक्ष द्या. कलाकार मंडळीना पुढील शिक्षण घेण्यासाठी प्रवेश
मिळण्याचे मार्ग मोकळे होतील.मकर :–जवळच्या नातेवाईकांबरोबर मतभेदाचे प्रसंग येतील पण नातेसंबंध बिघडू देऊ नका. वेळेचा सदुपयोग
केल्याने नियोजनात नसलेल्या कामाची पण चांगली सुरूवात होईल. सर्वच गोष्टी तुम्हाला पटत नसल्या तरी सतत
विरोध करू नका.कुंभ :–तुमच्या पुढाकाराने व कुटुंबियांच्या वतीने शेजारील मंडळीना जिवदान मिळेल. नोकरदारांना वैयक्तिक
डाँक्युमेंटची गरज भासेल पण वेळेवर सापडणार नाहीत. मुलांच्या आर्थिक व्यवहारावर लक्ष न दिल्याने त्याचेकडून
निरूपयोगी खरेदी होईल.मीन :–तुमचे अंदाज आज अजिबात चुकणार नाहीत. व्यावसायिक कार्यक्षमता वाढवण्याचा प्रयत्न केल्यामुळे
मार्केटमधील तुमची प्रतिष्ठा वाढेल. परदेशी वस्तूच्या हव्यासापोटी डबल पैसे घालवाल.
||शुभं–भवतु ||