Read in
सोमवार 21 जून 2021 चे दैनिक राशीभविष्य
सोमवार 21 जून चंद्ररास तूळ दिवसरात्र व चंद्रनक्षत्र स्वाती 16:45 पर्यंत व नंतर विशाखा.
वरील राशी नक्षत्रांचा
विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
आज रवी आर्द्रा नक्षत्रात 29:37 ला प्रवेश करत आहे.
ज्येष्ठ शुक्ल पक्षातील एकादशी ही निर्जला एकादशी या नावाने ओळखली जाते.
मेष :– मोठ्या लोकांच्या ओळखीने करावयाची कामे आज आठवड्याच्या सुरवातीलाच नियोजनात घेतल्यास या
सप्ताहात कामे बर्यापैकी होतील. वैयक्तिक जीवनात मान सन्मान मिळेल. बुद्धीच्या क्षेत्रातील तुमचे अंदाज
अचूक निघतील.वृषभ :–नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाचे, नियोजनाचे खूपच कौतुक होणार आहे. तरूण मंडळीना आपल्या
छंदाचा, कलेचा वापर व्यवसायाच्या दृष्टीकोनातून करता येणार आहे. तरी मोठ्यांचा सल्ला घ्यावा.मिथुन :–स्वत:चा कोणत्याही प्रकारचा उद्योग असला तरी त्यात तुम्हाला चांगले यश मिळून आर्थिक प्राप्ती पण
चांगली होणार आहे. तरूणांच्या जीवनात आजपासूनचे पुढील दोन दिवस चांगल्या घडामोडींचे राहणार आहेत.कर्क :–नोकरीतील अपेक्षित बदलाचे स्वप्न पूर्ण होण्याचे संकेत मिळतील. आईच्या इच्छेनुसार गावाकडील
घराबाबतचे निर्णय घेतला जाईल व बांधकामाची चर्चा सुरू होईल. दैनंदिन जीवनात आज समाधान मिळेल.सिंह :–जवळच्याच नातेवाईकांबरोबर वैचारिक मतभेदांमुळे मानसिक नाराजी येईल. मुलांच्या वागणूकीवरून
कुटुंबात वादळ निर्माण होईल. नोकरी विषयक जून्या मुलाखतीच्या वेळी घेतलेला निर्णय योग्य असल्याचे जाणवेल.कन्या :–गेले वर्षभर ज्या आर्थिक अडचणीतून जात आहात त्यात बदल होणार असल्याचे संकेत मिळतील. पूर्वी
झालेले नुकसान भरून काढण्यासाठी मित्रांच्या मदतीने तयार नवा उद्योद मिळेल. अजिबात पाय मागे घेऊ नका.तूळ :–कुटुंबातील आरोग्याच्या तक्रारी कमी होऊ लागतील. कलाकारांना अचानक कार्यक्रम मिळाल्याने आर्थिक
बाजू सावरू लागणार असल्याने कुटुंबात आनंद निर्माण होईल. मुलांकडून आवश्यक ती मदत मिळेल.वृश्र्चिक :–कामगार वर्गाला आरोग्याचे प्रश्र्न मानसिक त्रास देणारे ठरतील. वयस्कर मंडळींसाठी त्यांच्या
आरोग्यासाठी मोठा खर्च करावा लागेल. घरातील मानापमानाच्या प्रश्र्नांवर पडदा न टाकल्यास मानसिक स्वास्थ्य
हरवेल.धनु :–नव्याने नोकरीच्या शोधतील कामगारांना चांगली नोकरीची संधी उपलब्ध होईल. राजकीय क्षेत्रातील तुमचे
सहकारी अचानक तुमच्या बाबतीत घुमजाव करतील. तुमचा आत्मविश्वास हेच तुमचे बळ राहील हे लक्षांत ठेवा.मकर :–कुटुंबातील व्यक्तींच्या बाबतीत बेजबाबदारपणे वागल्याचा त्रास सोसावा लागेल. महिलांनी आपले
व्यक्तिमत्वात बदल करण्यासाठी तज्ञांचा सल्ला घ्यावा. गुंतवणूकीबाबतचे तुमचे अंदाज अचूक निघतील.
कामातील घेतलेला निर्णय फायदेशीर असल्याचे मुलांना पटेलकुंभ :–कुटुंबात ज्येष्ठ मंडळीकडून अचानक अशांतता निर्माण होईल. कलाकारांना आपले स्वप्न साकार होणार
असल्याचे संकेत मिळतील. गुरूतुल्य व्यक्तीकडून व्यवसायाबाबतच्या महत्वाच्या टीप्स मिळतील.मीन :–सप्ताहाची सुरूवात आनंदी घटनेने व मनपसंत खरेदीने होईल. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या विचारांवर
आत्मचिंतन करण्याची गरज आहे. बँकेच्या व्यवहाराबाबतची चर्चा परक्या समोर करू नये. कुटुंबात नवीन पाहुणा
येणार असल्याची गोड बातमी मिळेल.
||शुभं–भवतु ||