weekly-horoscope-2020

रविवार 20 जून 2021 ते शनिवार 26 जून 2021 पर्यंतचे साप्ताहिक राशी भविष्य

Read in

रविवार 20 जून 2021 ते शनिवार 26 जून 2021 पर्यंतचे साप्ताहिक राशी भविष्य

रविवार 20 जून चंद्ररास कन्या 07:41 पर्यंत व नंतर तूळ.

weekly-horoscope-2020

चंद्र नक्षत्र चित्रा 18:49 पर्यंत व नंतर स्वाती. सोमवार 21
चंद्ररास तूळ दिवसरात्र व चंद्रनक्षत्र स्वाती 16:45 पर्यंत व नंतर विशाखा.. मंगळवार 22 जून चंद्ररास तूळ 08:59 पर्यंत व
नंतर वृश्चिक. चंद्रनक्षत्र विशाखा 14:22 पर्यंत व अनुराधा.. बुधवार 23 जून चंद्ररास वृश्र्चिक दिवसरात्र. चंद्रनक्षत्र
अनुराधा 11:47 पर्यंत व नंतर ज्येष्ठा. गुरूवार 24 जून वृश्र्चिक 09:10 पर्यंत व नंतर धनु. चंद्रनक्षत्र ज्येष्ठा 09:10 पर्यंत व
नंतर मूळ. शुक्रवार 25 जून चंद्ररास धनु दिवसरात्र व चंद्रनक्षत्र मूळ 06:39 पर्यंत व नंतर पूर्वा षाढ.शनिवार 26 जून
चंद्ररास धनु 09:55 पर्यंत व नंतर मकर. चंद्रनक्षत्र उत्तराषाढा 26:36 पर्यंत व श्रवण.

सोमवार 21 जून निर्जला एकादशी.
मंगळवार 22 जून त्रिदिनात्मक सावित्री व्रताचा आरंभ
गुरूवार 24 जून वटपौर्णिमा.
बुधवार 23 जून श्री शिवराज्याभिषेकोत्सव दिन. शिवराज शक 348 प्रारंभ.
सोमवार 21 जून रवीचा आर्द्रा नक्षत्रात प्रवेश 29:37.

सोमवार 21 जून निर्जला एकादशी.
मंगळवार 22 जून त्रिदिनात्मक सावित्री व्रताचा आरंभ
गुरूवार 24 जून वटपौर्णिमा.
बुधवार 23 जून श्री शिवराज्याभिषेकोत्सव दिन. शिवराज शक 348 प्रारंभ.
सोमवार 21 जून रवीचा आर्द्रा नक्षत्रात प्रवेश 29:37.

मेष :–मनातील इच्छांना पंख फुटण्याचे दिवस आहेत. तुमच्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आता फार
यातायात करावी लागणार नाही. फक्त नक्की ठरवा की कोणते मिशन हातात घ्यायचे ते. कुटुंबातील प्रत्येक सदस्याचीही
मनापासून साथ मिळणार आहे. कोणत्याही अनावश्यक गोष्टी करण्यात वेळ वाया घालवू नका. व्यावसायिकांना आपल्या
प्रोजेक्टविषयी अतिशय अभिमान वाटणार्‍या घटना घडतील. उच्चशिक्षित तरूणांना अपेक्षित कार्यक्षेत्रात आपले नाव
कमवण्याची संधी मिळेल. कालपर्यंत साथ न देणारे आज अचानक तुमच्या मागेपुढे करतील. हा सर्व तुमच्या जिद्धीने
केलेल्या कष्टाचा परिणाम आहे हे लक्षांत घ्या.

वृषभ :–लाभ होतो म्हणजे काय होतो व कसा होतो याचे उदाहरण इतरांसमोर ठेवाल. व्यवसायातील चढ उतारावर तुम्ही
शोधून काढलेला उपाय इतरांनाही कसा लागू पडला आहे याची प्रचिती येईल. सामाजिक स्तरावर काम करताना घाई न
करता शांतपणे विचार करावा लागेल. सरकारी बँकेतील अधिकार्‍यांनी कर्ज देण्याच्या बाबतीत बाबतीत घेतलेले निर्णय
एकदम अचूक ठरतील. वकील मंडळीनी आपल्या भरवशावर असलेल्या क्लायंटच्या तक्रारीवर विशेष लक्ष द्यावे लागेल.
जवळच्या नातेवाईकांकडून एखाद्या कार्यक्रमाचे आमंत्रण येणार आहे.

मिथुन :– विवाहेच्छूंना परिचयातून विवाहाबाबतचा प्रस्ताव येईल. तुमच्या अपेक्षांना कांही प्रमाणात मर्यादा घातल्यास
नातेसंबंध जुळून येण्यात अडचणी येणार नाहीत. व्यावसायिक क्षेत्रातील तुमचे धाडस पाहून इतरांना आछ्चर्य वाटेल. काल
पर्यंत तुमच्या प्रोजेक्टमधील झालेली डेव्हलपमेंट यशाच्या मार्गाने धावणारी ठरेल. कुटुंबातील ज्येष्ठ भावंडांसाठी त्यांच्या
आवडीच्या गोष्टी करताना तुम्हाला मनापासून आनंद मिळेल व त्यांना तर आश्चर्याचा धक्काच बसेल. सरकारी कामातील
दिरंगाई बद्धल दंड भरावा लागेल. तसेच वाहनाचे नियम न पाळल्याने ही दंड भरावा लागणार आहे.

कर्क :–वैवाहिक यश हे एकमेकांच्या विश्वासावर अवलंबून असते हे लक्षांत घ्यावे लागेल. आपल्या मनातील गोष्टी
समोरच्याला , जोडीदाराला सांगितल्या तरच त्यातील अडचणी दूर होणार आहेत. नोकरीच्या ठिकाणी सध्या तरी
स्वत:च्या कामाकडे लक्ष केंद्रित करा. इतरांच्या कोणत्याही बाबतीत लुडबुड करू नका किंवा त्यांच्या अडचणींची
जबाबदारी तुमच्या डोक्यावर घेऊ नका. डाँक्टर व सर्जन यांना त्यांच्या क्षेत्रातील योगदानाबद्दल सन्मानित केले जाईल.
पोलिस खात्यातील वरिष्ठ अधिकारी वर्गास आपले अधिकार वापरताना दहा वेळा विचार करावा लागेल.

सिंह :–नोकरी मधील कामाचा भार या सप्ताहात तुमच्यावर जास्त प्रमाणात पडणार आहे. कंपनीच्या उच्चपदावरील
अधिकार्‍यांनी नुसत्या ऐकीव बातमीवर विश्र्वास ठेवून कोणताही निर्णय घेऊ नये. महिलांना सासरच्या मंडळींबरोबर
योग्य प्रकारे जमवून घेतल्याने सर्वांकडून कौतुक होईल विशेषत: सासूबाईंकडून शाबासकी मिळेल. विद्यार्थ्यांना आपल्या
क्षमता ओळखून मगच निर्णय घेता येणार आहे. मित्रमैत्रिणींकडून आलेल्या सल्ल्यामुळे मानसिक गोंधळ उडेल. प्रथम
संततीच्या प्रकृतीची काळजी वाढवणार्‍या घटनांचा त्रास होईल. महाविद्यालयातील प्राध्यापक मंडळीना ज्यादा कामाची
जबाबदारी घ्यावी लागेल.

कन्या :–मित्राच्या मदतीने नव्याने गुंतवणूक करण्याची उगाच घाई करू नका. व्यावहारिक पातळीवर बोलताना
अविचाराने नकळत समोरच्याला दुखावले जाण्याची दाट शक्यता आहे तरी सावधान रहावे. राजकीय मंडळी आपल्या
प्रतिष्ठेचा गरज नसताना वापर करण्याचा प्रयत्न करतील व त्यामुळे मानहानीचा प्रसंग येईल. कुटुंबातील कांही अनपेक्षित
कौटुंबिक समस्यांमुळे आर्थिक बोजा वाढेल व परिस्थिती अवघड होईल. शालेय विद्यार्थ्यांनी या वर्षाकरीताचे अभ्यासाचे
नियोजन शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली करावे.

तूळ :– व्यवसायातील भागिदार अचानक पैसे काढून घेण्याच्या गोष्टी करू लागेल. धान्याच्या रिटेल दुकानदारांना
उधारीचा त्रास भयंकर जाणवेल. कुटुंबातील व व्यवसायातील ज्येष्ठ मंडळींच्या विचाराने हे उधारीचे प्रश्र्न सोडवावे
लागतील. सध्या बचतीचे धोरण स्विकारून आर्थिक नियोजन केल्यास सध्याच्या अडचणीतून बाहेर पडणे सोपे जाईल.
कलाकार मंडळींना आँन लाईन कार्यक्रम करण्यासाठी चांगला सपोर्ट मिळेल. महिलांना मोनोपाँजचा त्रास असह्य होऊन
दवाखान्यात अँडमिट करावे लागेल. पूर्वी गुंतवलेल्या गुंतवणूकीतून सध्या काहीही फायदा होणार नाही तरी कसलीही घाई
करू नका.

वृश्र्चिक :–आजपर्यंत भावंडांकरीता घेतलेल्या कष्टाचे चीज झाल्याचे जाणवेल. मोठ्या भावाकरीता त्याच्या घराच्या
कर्जासाठी जामिन रहावे लागेल. नव्या नोकरीतील कामाची नीटशी कल्पना न आल्यामुळे मानसिक ताण वाढेल. वयस्कर
मंडळीना विसराळूपणाचा फारच त्रास होईल. कुटुंबियांनी त्यांच्या गळ्यात ओळखपत्र अडकवावे म्हणजे कोणताही धोका
होणार नाही. शेजारील कुटुंबातील ज्येष्ठ मंडळींच्या विचाराने घरातील महत्वाचे प्रश्र्न सोडवता येतील. मुलीच्या
विवाहाच्या सकारात्मक झालेल्या वाटाघाटीत अचानक विघ्न येईल.

धनु :– गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या परिस्थितीत बदल होत असल्याचे दिसून येईल. आर्थिक बाबतीतही कांही
होणार्‍या सुधारणांमुळे तुमच्या बर्‍याच अडचणी दूर होणार आहेत. व्यवसायातील बँकेच्या कर्जाबाबत चे प्रश्र्न उग्र रूप
धारण करतील. मध्यास्थामार्फत बँकेतील अधिकार्यांची भेट घेतल्यास कांही सुवर्णमध्य निघेल. नुकतेच आजारातून किंवा
कोविडमधून बरे झालेल्यांनी व्यायामाचा प्रयत्न करू नये. कुटुंबातील सर्वानीच सहविचाराने नवीन घराबाबतचे निर्णय
घ्यावेत. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या विचारांवर आत्मचिंतन करूनच शिक्षणाची दिशा ठरवावी.

मकर :– मनातील इच्छा पूर्ण करताना होणार्‍या कष्टांचा तुम्ही जराही विचार करणार नाही. अती मेहनत केल्याने
शारिरीक थकव्याबरोबर मानसिक थकवापण येणार आहे. मनाचा थकवा दूर होण्यासाठी जवळच्या नातेवाईकांच्या
सहवासात रहावे.महिलांना आपल्या रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. संततीकडून तुमच्या कांही अपेक्षांना तडा जाण्याचा
धोका आहे. वयस्कर मंडळीनी आपल्या जवळच्या माणसांबरोबर मनातील भावना व्यक्त केल्यास मनावरील भार कमी

होईल. तरूण मंडळीनी कुटुंबातील ज्येष्ठांच्या मनाचा विचार करूनच त्यांच्याबरोबर बोलावे. त्यांचे मन दुखावणार नाही
याची काळजी घ्यावी.

कुंभ :–दवाखान्यात अँडमिट असलेल्यांच्या प्रकृतीमधे चांगली प्रगती होईल व घरी सोडतील. राजकीय क्षेत्रातील मंडळीना
बोलताना अतिशय जपून बोलावे लागेल. उगाच शब्दांच्या कसरती करू नका. कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने
व्यवसायातील अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करा. हाँस्पिटलमधील कर्मचार्‍यांना तुमच्यावर असलेली जबाबदारी अतिशय
चोखपणे पार पाडावी लागेल तुमच्याकडून कोणतीही चूक होत नसल्याची खात्री करा. भावनेच्या आहारी जाऊन घेतलेला
निर्णय नुकसानीस कारणीभूत होईल. आर्थिक देवाणघेवाण करताना सावधानता बाळगावी लागेल.

मीन :–आज तुमच्या हातातून गेलेल्या बर्‍याच गोष्टी तुम्हाला परत मिळवता येणार आल्याचा सुगावा लागेल. वर्कशाँप
मधील कामात निर्माण झालेला अडथळा दूर करण्याचे श्रेय तुम्हाला मिळेल. तुमच्या व्यक्तीमत्वाचा सर्वसामान्यांवर
चांगला प्रभाव पडेल. या सप्ताहात तुम्हाला व्यवसायिक क्षेत्रात काही कसोट्यांना सामोरे जावे लागेल. योग्य नियोजन
करून कामाची जिद्ध ठेवल्यास तुम्ही अवघड गोष्टही पूर्ण करू शकाल. गोड आश्र्वासन देणार्यांपासून तुम्हाला सावध रहावे
लागेल. आर्थिक गरजेकरीता सध्या कोणाचीही मदत न घेता वेळ निभावून न्याल.

||शुभं-भवतु ||

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *