Read in
शुकवार 18 .जून 2021 चे दैनिक राशीभविष्य
शुक्रवार 18 जून चंद्ररास कन्या दिवसरात्र व चंद्रनक्षत्र उत्तरा फाल्गुनी 21:36 पर्यंत व नंतर हस्त.
वरील राशी
नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश
देत आहे.
मेष :–मुलांच्या संदर्भातील आनंददायक बातमीने खुष व्हाल. आईच्या आशिर्वादाने जमिनीचे व शेतीबाबतचे
अडकलेली कामे मार्गी लागतील. आज कोणालाही जामीन राहण्याचा विचारही करू नका.वृषभ :–आध्यात्मिक क्षेत्रातील मंडळीना अभ्यासाच्या सरावाची आवश्यकता आहे. पूर्वीची येणी मिळण्यासाठी चे
तुमचे प्रयत्न यशस्वी होतील. महिलांना अचानक पाठदुखीचा व कंबरदुखीचा त्रास जाणवेल. कोणतीही नवीन खरेदी
करू नका.मिथुन :–आजचा दिवस तुमच्यासाठी आईच्या आशिर्वादाचा राहील. कोणत्याही अडकलेल्या प्रकरणातून बाहेर
पडण्यासाठी मनाची शक्ती वापरावी लागेल. बँकेचे व्यवहार स्वत: करा इतरांकडून नकोत.कर्क :– ज्यांच्या पायांना चिखल्या होण्याची सवय आहे त्यांनी आपल्या पायांची विशेष काळजी घ्यावी. नोकरीत
तुम्हाला प्रमोशनची बातमी मिळेल. मित्रपरिवाराबरोबर आवडत्या विषयावर चर्चा होऊन आंतिरक उर्जा वाढेल.सिंह :–घरगुती व्यवसायात नवीन पर्याय समोर येतील. आत्मविश्वास वाढून पर्यायांचा विचार कराल. नोकरदारांनी
नोकरीतील कामातील बदलाचा स्विकार केल्यास करिअर उत्तम होण्यास मदत होईल.कन्या :–नोकरीतील वातावरण आव्हानात्मक वाटेल पण तुम्ही स्वत:ला कामात झोकून द्याल. कुटुंबातील
ज्येष्ठांकडून आवश्यक ते सहकार्य मिळेल. कुळाचाराच्या, धार्मिक पूजेसाठी दोन दिवस घरात विधी चालेल.तूळ :–वासाची अत्तरे, परफ्युम्स, उदबत्त्या यांच्या घरगुती व्यवसायातून चांगले उत्पन्न मिळेल. बुद्धीच्या क्षेत्रात
उल्लेखनीय केलेल्या कामासाठी समाजिक क्षेत्रातून कौतुक होईल. नवीन नोकरीच्या प्रयत्नात असणार्यांनी आज
शांत रहावे.वृश्र्चिक :–नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना पूर्वी दिलेल्या मुलाखतींमधून सिलेक्ट झाल्याचा निरोप येईल.
उच्चशिक्षणासाठी परदेशी जाण्याचा बेत सध्या रद्ध करावा. व्यावसायिक क्षेत्रातील अंदाज अचूक निघतील.धनु :–तुमच्या नवीन गुंतवणूकीचा विचार सल्ला घेऊनच करा. कोणत्याही व्यक्तीवर क्षुल्लक कारणावरून
चिडचिड करू नका किंवा वादही निर्माण करू नका. कुटुंबातील वातावरण आनंदी ठेवण्याचा तुमचा फंडा जबरदस्त
राहील.मकर :–घरांविषयीच्या न सुटणार्या प्रश्र्नांसाठी कायदेशीर सल्ला घ्यावा लागेल. व्यवसायातील कर्जमुक्तीसाठी
तुम्हाला नवीन योजना आखाव्यात लागतील. शाळकरी मुलांना आपल्या पूर्वनियोजित कामाचा आढावा घेऊनच
पुढील अभ्यासाचे नियोजन करावे लागेल.कुंभ :–कुटुंबातील वृद्ध व्यक्तीची दिवसरात्र सेवा करण्यासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागेल. तरूणांचा त्यांच्या
व्यवसायाव्यतिरिक्त कांही नवीन उद्योग करायचा विचार असल्यास त्याची पूर्ण विचाराने सुरूवात करावी घाई करू
नये.मीन :–आजचा दिवस अतिशय गतामान राहील. कामाची सांगड घालताना नाकी नऊ येतील. कोणतीही खरेदी
करताना आपण फसत नसल्याची खात्री करून घ्या. परदेशातील नोकरीचा प्रश्न विचारानेच सोडवा.
||शुभं–भवतु ||