Read in
गुरूवार 17 जून 2021 चे दैनिक राशीभविष्य
गुरूवार 17 जून चंद्ररास सिंह 28:06 पर्यंत व नंतर कन्या.
चंद्रनक्षत्र पूर्वा फाल्गुनी 22:12 पर्यंत व नंतर उत्तरा
फाल्गुनी. वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती
पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :–तुमच्या अपेक्षेनुसार तुमची मुले शिक्षणाच्या बाबतीत तुमचा सल्ला मान्य करतील. तुम्ही पूर्वी हातउसने
दिलेले पैसे परत मिळण्याची मावळत चाललेली आशा पुन्हा जाणवू लागेल. सरकारी लायसन्स च्या बाबतीत योग्य
त्या अधिकार्याची भेट होईल.वृषभ :–शाळकरी मुलांच्या मित्रांचे पालक तुमच्याकडे सल्ला घेण्यासाठी येथील. कुटुंबात पाहुण्यांचे आगमन होणार
असल्याने घरातील वातावरण आनंदी राहील. कोणतीही आरोग्याची तक्रार जाणवल्यास लगेच डाँक्टरांचा सल्ला
घ्यावा.मिथुन :–सामाजिक कार्यातील तुमच्या सहभागाने लोकांना आछ्चर्य वाटेल. व्यवसायासाठी केलेला प्रवास निष्फळ
ठरणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. साहित्यिक, लेखक व कलाकार मंडळींना त्यांच्या कार्याविषयीची
पोचपावती मिळेल.कर्क :–आज तुमच्या मनातील विचार स्पष्टपणे व्यक्त करण्याची योग्य वेळ आलेली आहे हे लक्षांत घ्या. महिलांनी
अतीविश्र्वासाने केलेली मदत वाया जाणार नाही. स्पर्धात्मक गोष्टीत मनातील इच्छेच्या बळावर बाजी माराल.सिंह :–आज तुमच्या स्वभावातील प्रेमळपणाचा अनुभव इतरांना येणार आहे. कुटुंबात सुना, जावई यांच्याबरोबर
सहभोजनाचा आनंद घ्याल. पतीपत्नीमधील मतभेद दूर होऊन प्रेमभावना वाढेल.कन्या :– जवळच्या नात्यातील आजारी व्यक्तीस वेळेवर आराम न पडल्यास दवाखान्यात अँडमिट करावे लागेल व
त्याची जबाबदारी तुमच्यावर येईल. पोलीस खात्यातील वरीष्ठांना वादग्रस्त प्रकरणे अतिशय जागरूकपणे हाताळावी
लागतील.तूळ :–महिलांकडून केलेले नवीन उपक्रमाचे आयोजन कौतुकास्पद ठरेल. बोलण्यातील कला व आवाजाच्या
कार्यशाळेची जबाबदारी तुमच्याकडून अगदी व्यवस्थितपणे फार पडेल. लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळेल.वृश्र्चिक :–पोस्टाच्या बचत योजनेबाबतच्या प्रचार प्रसाराच्या जबाबदारीच्या कामावरील तुमची नियुक्ती समाधान
देईल . कुटुंबातील ज्येष्ठांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेली गायनाची मैफल अप्रतिम आनंद देईल.धनु :–सकाळपासूनच्या नियोजित कामातील तुमचा सहभाग तुम्ही उत्तम रितीने फार पाडाल. शेजारील ज्येष्ठांच्या
समाधानाकरीता त्यांची इच्छा पूर्ण करावी लागेल. आर्थिक गरजेकरीता कोणाचीही मदत न घेता वेळ निभावून
न्याल.मकर :–संततीच्या प्रगतीच्या दृष्टीने तरूणांना आपल्या मनाला मुरड घालावी लागेल. सरकारी कागदपत्रांची फाईल
प्रवासात जीवापेक्षाही सांभाळावी लागेल. वृद्धाश्रमातील आर्थिक व्यवहारातील तुमच्या कामात पारदर्शकता ठेवावी
लागेल.कुंभ :– शालेय विद्यार्थ्यांना शिकवणार्या शिक्षकांना आपले प्रशिक्षण आँन लाईन करता येणार आहे. बांधकाम
क्षेत्रातील कंत्राटदारांनी आर्थिक व्यवहार तपासून घ्यावेत नुकसानीची शक्यता आहे.मीन :–मित्रांच्या मदतीने व्यवसायातील अडलेले काम मार्गी लागेल. किरकोळ विक्रेत्यांना, घरगुती लहान
उद्योगांना एकमेकांच्या ओळखीतून योग्य ती चालना मिळेल. मोकळेपणाने बोलल्यास व्यवसायवृद्धी चांगली
होईल.
||शुभं–भवतु ||