Read in
बुधवार 16 जून 2021 चे दैनिक राशीभविष्य
वरील दोन्ही राशी
नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश
देत आहे.
मेष :–नोकरीच्या ठिकाणी तुमचे वरीष्ठ व सिनिअर्स यामधे वैचारिक वाद उफाळून येईल पण त्यात तुमच्या
मध्यस्थीने मार्गी लागेल. पोलीस व होमगार्ड क्षेत्रातील कर्मचार्यांवर, अधिकार्यांवर अचानक आरोप होतील.वृषभ :–मनाविरुद्ध घटना घडताना पाहून मनाला अस्वस्थपणा येईल. सामाजिक स्तरावर तुमच्या मनातील
विचार, महत्वाच्या सूचना यांची चर्चा करण्यास संधी मिळेल व शासकीय स्तरावर त्याची दखल घेतली जाईल.मिथुन :–आरोग्यविषयक चर्चासत्रात तुम्हा डाँक्टर व मानसोपचार तज्ञांचे विचार बहुमोल ठरतील. प्रवासाचा
कोणताही बेत सध्या ठरवू नका. मित्रमंडळीमधे एखादी समाजहितोपयोगी योजना कार्यान्वित करण्याचे ठरेल.कर्क :–आज तुम्ही करत असलेल्या प्रत्येक कार्यातून आनंद निर्माण होईल. शैक्षणिक क्षेत्रात मदत करण्याच्या
तुमच्या हेतुला लोक उचलून धरतील व त्यात सामिलही होतील. कुटुंबात नवीन मेंबरचे आगमन होणार असल्याचे
कळेल.सिंह :–अँपेंडिक्सच्या रूग्णांना दवाखान्यात अँडमिट करावे लागेल. प्रेमाच्या अवास्तव कल्पना व्यवहारात चालत
नाहीत याचा प्रेमवीरांनी विचार करावा. नवीन घर घेण्याचा विचार तूर्त तरी करू नका.कन्या :–धार्मिक कार्यासाठी मोठा खर्च होईल. वारसा हक्का बाबतची अपूर्ण राहिलेल्या कामाना प्रथम प्राधान्य द्या.
नोकरीतील तुमच्यावर न सोपवलेली जबाबदारीही तुम्हाला पार पाडावी लागेल.तूळ :–व्यवसायात हाताखालील कर्मचार्यांची चांगली साथ मिळेल. लहान मुलीं आपल्या इच्छा पूर्ण करून
घेण्यासाठी हट्टाला पेटतील. अचानक महिलां भावनावश होतील व मनाची व्याकुळता वाढेल. दूर गावी असलेल्या
मुलांच्या आठवणीने दु:खी होतील.वृश्र्चिक :–मित्रमंडळींबरोबरच्या गप्पात खिशातील रकमेपेक्षा दहापट खर्च कराल. हाँस्पिटलमधील कर्मचार्यांनी
तुमच्यावर असलेली जबाबदारी अतिशय चोखपणे पार पाडल्याने सर्वत्र कौतुक होईल. आरामाची आवश्यकता
वाढेल.धनु :–विद्यार्थ्यांना अभ्यासाचा ताण तणाव वाढेल. मुलांनी आपली क्षमता ओळखून अवघड विषयाकरीता वेगळ्या
शिक्षकांची सोय करावी. कोर्टातील कर्मचार्यांना जनतेच्या क्षोभास सहन करावे लागेल.मकर :–आज तुम्हाला एखादा कडक निर्णय घ्यावा लागेल जो तुमच्या मनालाही पटणार नाही. पूर्ण विचाराने व
चर्चेने घेतलेले निर्णय योग्य राहतील. आजारपणातून बरे वाटलेल्यांना फार मोठ्या संकटातून वाचलो आहोत ही
भावना राहील.कुंभ :–नोकरीतील आनंदी वातावरणाचे सर्व क्रेडीट तुम्हालाच मिळेल. बुद्धीच्या क्षेत्रातील महिलांना आपल्या
कामाच्या वेळात किंवा कामात कोणतीही सुट घ्यावी असे वाटणार नाही. कुटुंबात अचानक आईच्या माहेरील पाहुणे
येतील.मीन :–संततीबाबतच्या तुमच्या अपेक्षा पूर्ण होणार असल्याची खात्री पटेल. ज्येष्ठ मंडळीना शालेय जीवनातील
मित्रमंडळींबरोबर संपर्क साधले जातील. आज व उद्या मोबाईल हरवण्याचा धोका आहे. तरूण ड्रायव्हर्सनी वाहनांची
वेगमर्यादा पाळावी.
||शुभं–भवतु ||