Read in
मंगळवार 15 जून 2021 चे दैनिक राशीभविष्य
मंगळवार 15 जून चंद्ररास कर्क 21:41 पर्यंत व नंतर सिंह.
तसेच चंद्रनक्षत्र आश्लेषा 21:41 पर्यंत व नंतर मघा.
वरील राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय
फलादेश देत आहे.मेष :– नोकरीच्या ठिकाणी ताणतणाव वाढल्याने नोकरी करण्यापेक्षा व्यवसाय करावासा वाटेल. पतीपत्नीच्या
व्यवसायातील आर्थिक वाढ चांगली होईल व मोठ्या प्रमाणात आनंद साजरा कराल.वृषभ :–तुमच्या बोलण्यातील पुढाकाराने कुटुंबियांच्या फायद्याची गोष्ट घडेल. विवाहेच्छूंना मनासारखा जोडीदार
मिळाल्याचा आनंद मिळेल. वडिलांच्या व्यवसायाची जबाबदारी तुमच्यावर सोपवण्यात येईल.मिथुन :– आजचा दिवस सकाळपासूनच लाभदायक व आर्थिक व्यवहाराचा, कमाईचा राहील. ज्येष्ठांना आपल्या
ज्ञानाचा उपयोग तरूणांना मार्गदर्शन करण्याकरीता करावा लागेल. विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारची घाई करू नये.कर्क :– दैनंदिन जीवनातील आनंदाचा सुखद अनुभव येईल. कामाचा व्याप वाढला तरीही मानसिक आनंद मिळेल.
वडिलांच्या, सासरच्या नात्यातील आलेला दुरावा तुमच्या पुढाकाराने कमी होईल व त्याबाबत तुमचे कौतुकही होईल.सिंह :– नवोदित कवी, लेखक यांना आपली ओळख निर्माण करता येणार आहे. आँन लाईनच्या माध्यमातून तुम्हाला
ज्येष्ठ नागरिकांसाठी मोठा कार्यक्रम हाती घेण्याचे ठरेल. कोणत्याही प्रकारची हुकमत न करता इतरांचा सहभाग
घ्याल.कन्या :–व्यवसायातील नव्या मार्गाचा अवलंब करण्याचे सहविचाराने ठरेल. महिलांना अचानक पाय व पाठ दुखीचा
त्रास जाणवेल. नर्सिंग क्षेत्रातील महिला व पुरूष वर्गास समाजाकडून जाहीरपणे प्रशंसेचे व कौतुकाचे शब्द मिळतील.तूळ :–चित्रकार, रांगोळी काढणारे, पेंटींग्ज करणार्यांना आँन लाईन प्रदर्शन भरवता येणार आहे. तसेच आँन
लाईनच्याच माध्यामातून मोठे वेबिनार घेण्याचे ठरेल. कोणत्याही प्रकारच्या गुप्त गोष्टींसाठी तिसर्या व्यक्तीची
मदत घेऊ नका.वृश्र्चिक :–कुटुंबातील व्यक्तींच्या इच्छा एकाच वेळी पूर्ण करण्यासाठी तुम्ही जीवाचे रान कराल. कलाकारांना
सामाजिक पातळीवर आपली कला सादर करण्याची खूप मोठी संधी मिळेल. महत्वाच्या कामात काहीही कसूर
सोडणार नाही.धनु :– हातात घेतलेले काम अत्यंत चिकाटीने पूर्ण कराल. नोकरीतील तुमचे यश उल्लेखनीय राहील.
राजकीयदृष्टय़ा आज तुमच्या अधिकारात करण्यात आलेल्या वाढीमुळे प्रतिष्ठा वाढेल व तुमची पण काम
करण्याची हीम्मत वाढणार आहे.मकर :–सरकारी क्षेत्रातील पेडींग कामे करण्यासाठी तुम्हाला दिलेल्या वेळेचे योग्य नियोजन करावे लागेल.
अजोळकडील नात्यातील मंडळींच्या भेटीतून नवीन उर्जा मिळेल. महिलांना अध्यात्मिक क्षेत्राविषयी कुतूहल
निर्माण होईल.कुंभ :–विद्यार्थी वर्गास अभ्यासाची, नवीन शिक्षणक्रमाची जबरदस्त ओढ निर्माण होईल. प्रायव्हेट कोचिंग
क्लासच्या शिक्षकांना मोठे टार्गेट दिले जाणार आहे. नोकरीत प्रमोशनच्या बातम्या कानावर येथील.मीन :– लहान मुलांच्या रूग्णालयातील डाँक्टर्सना अतिशय मानसीत ताण वाढेल. मानसोपचार तज्ञांना अतिशय
गुंतागुंतीच्या प्रकरणाचा अभ्यास करावा लागणार आहे. लोखंडाशी संबंधित व्यवहार असलेल्यांनी आज खरेदी,
विक्री कांहीही करू नका.
||शुभं–भवतु ||