Read in
सोमवार 14 जून 2021 चे दैनिक राशीभविष्य
सोमवार 14 जून चंद्ररास कर्क दिवसरात्र व चंद्रनक्षत्र पुष्य 20:35 पर्यंत व नंतर आश्लेषा.
वरील दोन्ही राशी
नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश
देत आहे.मेष :–आज आईला भेटण्याची, आईजवळ बसून बोलण्याची इच्छा पूर्ण होईल. कुटुंबातील ज्येष्ठ मंडळींच्या
विचाराने मुलांच्या शिक्षणाबाबतचा निर्णय घ्या. तरूण मुलांना सुद्धा मार्गदर्शनाची गरज भासेल. महिलांनी
आपल्या कल्पना विचारात घ्याव्यात.वृषभ :–नोकरीसाठी लांब गेलेल्यांना नवीन नोकरी निमीत्ताने आपल्या जिल्ह्यातच परत येण्याची संधी मिळेल.
लेखक व कवी मंडळीना आपल्या विषयावरील माहिती व प्रशिक्षण वेबिनारच्या माध्यमातून देता येणार आहे तरी
तसा प्रयत्न करावा.मिथुन :–आईवडीलांच्या आनंदासाठी मुलांना आपल्या मतांना व इच्छेला ही मुरड घालावी लागेल. हातातील पैशांचा
उपयोग फक्त भविष्यासाठी न ठेवता वर्तमानातही वापरावा लागतो हे लक्षात घेतल्यास मनाला त्रास होणार नाही.कर्क :–रसायनाच्या कारखान्यात काम करणार्या कामगारांनी आपली प्रकृती ठिक असल्याचे चेक करावे. किरकोळ
भाजी विक्रेत्यांना अचानक चांगला लाभ होईल व मोठ्या आँर्डरची खात्री मिळेल. घरगुती उद्योगात चांगली आवक
होईल.सिंह:–आज तुमच्या स्वभावातील ताठपणा नुकसानीस कारणीभूत होईल. कुटुंबात जोडीदाराच्या आजारपणाची
चिंता वाढेल व मानसिक ताण वाढेल. बँकेच्या कर्ज प्रकरणाची वेळेत चौकशी केल्यास काम मार्गी लागेल.कन्या :–कलाकारांना आपल्या कलेला जनतेने उचलून धरल्याचे जाणवेल. महत्वाच्या कागदपत्रांवर सह्या
करताना त्याविषयीची पूर्ण माहिती करून घ्या. महिलांना दैनंदिन कामातून आपल्या छंदासाठी वेळ काढता
आल्यामुळे मानसिक समाधान मिळेल.तूळ :–अचानक कौटुंबिक कारणासाठी प्रवास करावा लागेल. सरकारी बँकेच्या कर्जाबाबतीत आजपर्यंतच्या तुमच्या
कल्पना फोल ठरतील. वकील मंडळीनी आता कामाची घाई केल्यास कामातील उरक वाढेल व तो तुमचा प्लस पाँईंट
राहील.वृश्र्चिक :–प्रतिष्ठेच्या विचाराने मानभावीपणे वागू नका त्यामुळे तुमचेच नुकसान होणार आहे. सामाजिक कार्यात
सहभागी होण्यासाठी लोकांकडून प्रेशर येईल. तुमच्या आवडीच्या क्षेत्राविषयीची माहिती सादर करण्याची चांगली
संधी मिळेल.धनु :–भागीदारीच्या व्यवसायातील नवीन जबाबदार्या स्विकाराव्या लागतील. पूर्वीच्या कामाच्या अनुभवावर
आधारित तुम्हाला मान दिला जाईल. कोणतेही काम लहान किंवा मोठे नसते याची जाणीव होईल.मकर :–उच्च पदावरील मंडळीनी ताकही फुंकून प्यायचे दिवस आहेत हे लक्षांत ठेवावे. व्यवसायात भागीदाराच्या
मताचा आदर करून सहविचाराने योजना ठरवाव्यात. वरिष्ठांबरोबरचे मिटींग चांगली फलद्रूप होईल.कुंभ :–नोकरीतील सध्या निर्माण झालेल्या अडचणींवर तुमच्याकडूनच उपाय सापडणार आहे. सर्वांची भिस्त
तुमच्यावरच राहील. आजारी कंपन्यांच्या कामावर चर्चा व अभ्यास करण्याच्या कमिटीत तुमचे नांव प्रथम दर्जाला
राहील.मीन :–सध्याच्या अडचणींवर श्री गुरूमाऊलीकडून योग्य तो उपदेश मिळेल व उपासनेचे महत्व कळण्यासाठी हे
संकट होते याची प्रचिती येईल. कुटुंबात धार्मिक समारंभाचे आयोजन करण्यात येईल व त्याची जबाबदारी
तुमच्यावर राहील.
||शुभं–भवतु ||