Read in
रविवार 13 जून 2021 ते शनिवार 19 जून 2021 पर्यंतचे साप्ताहिक राशी भविष्य
रविवार 13 जून चंद्ररास मिथुन 12:31 पर्यंत व नंतर कर्क.
चंद्रनक्षत्र पुनर्वसु 18:59 पर्यंत व नंतर पुष्य. सोमवार
14 जून चंद्ररास कर्क दिवसरात्र व चंद्रनक्षत्र पुष्य 20 :35 पर्यंत व नंतर आश्लेषा. मंगळवार 15 जून चंद्ररास कर्क
21:41 पर्यंत व नंतर सिंह. चंद्रनक्षत्र आश्लेषा 21:41 पर्यंत व नंतर मघा. बुधवार 16 जून चंद्ररास सिंह दिवसरात्र व
चंद्रनक्षत्र मघा 22:13 पर्यंत व नंतर पूर्वा फाल्गुनी. गुरूवार 17 जून चंद्ररास सिंह 28:06 पर्यंत व नंतर कन्या.
चंद्रनक्षत्र पूर्वा फाल्गुनी 22:12 पर्यंत व नंतर उत्तरा फाल्गुनी. शुक्रवार 18 जून चंद्ररास कन्या दिवसरात्र व चंद्र नक्षत्र
उत्तरा फाल्गुनी 21:36 पर्यंत व नंतर हस्त. शनिवार 19 जून चंद्ररास कन्या दिवसरात्र व चंद्र नक्षत्र हस्त 20:27
पर्यंत व नंतर चित्रा.
वरील सर्व राशी नक्षत्रांचा विचार करून व रोजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने
नक्षत्रीय फलादेश देत आहे.
रवीची मिथुन राशीत प्रवेश करण्याची वेळ :–30:00.
मेष :– नोकरीतील तुमच्यावर असलेल्या जबाबदारी बाबत वरिष्ठ खूष असतील पण त्याचबरोबर नवीन
जबाबदारी स्विकारावी लागेल. व्यवसायातील नवनवीन संधींचा लाभ घेण्याची हीच योग्य वेळ आहे हे लक्षांत घ्या.
अनेक शंकाकुशंका काढून पाय मागे घेऊ नका. फक्त कुटुंबातील ज्येष्ठांचा सल्ला घ्या. बाहेरील व्यक्तींचा नको.
ज्यांची संतती वयाने मोठी आहे अशांनी संततीची साथ घेतल्यास कामाची सुरूवात चांगली होईल. कौटुंबिक चिंतेमुळे
मानसिक स्वास्थ्य बिघडणार आहे. महिलांना त्यांच्या महत्वाच्या वैयक्तिक कामात भावाची मदत मिळेल. कुटुंबात
आनंदोत्सव साजरा होईल.
वृषभ :–या सप्ताहाच्या सुरवातीलाच मोठा खर्च निघणार आहे. गुंतवणूकीच्या क्षेत्रात स्वत:च्या मनाने कोणताही
निर्णय घेऊ नका. डाँक्टर व सर्जन मंडळीना मानसिक त्रास होणार्या घटनाना सामोरे जावे लागेल. तरूणांना
त्यांच्यावर असलेल्या जबाबदारीत अचानक वाढ होईल. निवृत्तीच्या वाटेवर असलेल्यांना आता दगदग होत
नसल्याचे जाणवेल. कुटुंबातील आर्थिक गणिते कोलमडून पडतील पण निराश न होता मार्ग काढावा लागेल.
आईवडीलांच्या इच्छेखातर कांही गोष्टी तुम्हाला मान्य कराव्या लागतील. या सप्ताहात कांही प्रमाणात झोप न
लागण्याचा त्रास संभवतो.
मिथुन :–पत्नीच्या सांगण्यावरून घेतलेला निर्णय फायदेशीर असल्याचे जाणवेल. महत्वाच्या कागदपत्रांवर सही
करण्यापूर्वी ज्येष्ठांबरोबर चर्चा करूनच मग सही करण्याचा निर्णय घ्या. अध्यात्मिक क्षेत्रातील अभ्यासूना त्यांच्या
उपासनेतून परिस्थितीकडे पाहण्याची नवीन दृष्टी मिळेल. जून्या घराच्या व्यवहाराचा प्रश्र्न पुन्हा लांबणीवर जाणार
आहे तरी कोणतेही मनसुबे रचू नका. नातेवाईकांच्या विषयावरील तुमच्या मतांमुळे कुटुंबातील वातावरण नरम गरम
राहणार आहे तरी शक्यतो मनाला आवर घाला. हातातील पैशांचा स्वत:ऐवजी इतरांसाठी जास्त होईल.
कर्क :–त्या सप्ताहात तुमच्या स्वभावातील प्रेमळपणा व रागीटपणा दोन्हीही उफाळून येणार आहे. मनावर संयम
घातल्यास कुटुंबातील वातावरण बिघडणार नाही. विवाहेच्छू मुलांना समजावताना आई वडीलांना मानसिक ताण
येईल. वयस्कर मंडळीनी आपले ब्लडप्रेशर वाढत नसल्याची खात्री करून घ्यावी. नोकरीच्या ठिकाणी सहकार्यांची
मदत चांगली मिळेल. महिलांनी संसारातील अडचणींवर मार्ग काढताना कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीचा सल्ला घ्यावा.
सिंह :–तुम्ही हाती घेतलेल्या जबाबदार्या अतिशय कष्टाने का होईना पण पार पाडणार आहात. नोकरीत
सहकार्यांना विश्र्वासात घेतल्यास होणारा गैरसमज टाळू शकाल. आप्तेष्टांबरोबर मतभेदाचे प्रसंग उद्भवणार
आहेत. तरी आपण शांत रहायचे आहे हे आधीच ठरवून टाका. राजकीय मंडळीनाही विरोधक कोंडीत पकडण्याचा
प्रयत्न करणार आहेत तरी सावध रहावे. गुंतवणूकीच्या गोष्टी एकतर्फी विचाराने करू नका. लहानशा प्रवास घडेल
पण त्यात काळजी घ्यावी लागेल.
कन्या :–कोणताही निर्णय एकतर्फी घेतल्यास त्यातील लहानशी बाबही त्रासदायक ठरेल. सततच गोष्टी आपल्या
मनाप्रमाणे घडत नसतात हे लक्षांत ठेवा. नोकरीत ज्या कामाची जबाबदारी तुमच्यावर आहे ते काम अतिशय
काळजीपूर्वक करावे लागेल. प्रेमाच्या व्यवहारात गैरसमजाने अडचणी निर्माण होतील तरी गैरसमजाला वावच देऊ
नका. इतरांच्या चुका काढण्यात वेळ वाया घालवू नका. या सप्ताहाच्या शेवटी तब्बेतीकडे केलेले दुर्लक्ष मानसिक
ताण वाढवेल.
तूळ :–राजकीय क्षेत्रात विरोधकांनी तुमच्या समोर केलेल्या अडचणी तुम्ही चतुराईने पार करून दाखवाल.
मालमत्तेचे, जमीन जमल्याचे कोणतेच काम कितीही अर्जंट असले तरी हातात घेऊ नका. सामाजिक कार्यातील
सहभाग मानसिक आनंद देईल. दैनंदिन कामाच्या धावपळीत महत्वाच्या कामाकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका. घरातील
नात्यात अचानक निर्माण झालेल्या संशयाच्या वातावरणाला तोंड द्यावे लागेल. आपल्या आर्थिक क्षमतेचा अंदाज
घेऊन नंतरच दुसर्यांना शब्द द्या. भावनेच्या आहारी जाऊन कांहीही करू नका.
वृश्र्चिक :–या सप्ताहात कांही कामे तुम्हाला अनिच्छेने करावी लागणार आहेत. पण या गोष्टीं भविष्यात लाभदायक
होणार आहेत. बर्याच दिवसापासून रखडलेली कामे लवकरच मार्गी लागण्याचे अंदाज येथील. मुलांकडून जबाबदारीने
करून घ्यावयाची कामे त्यांना व्यवस्थितपणे समजावून सांगावी लागतील. वैयक्तिक पातळीवर करावयाची कामे
सध्या पुढे ढकला पण घाईने काहीही करू नका. कुटुंबातील आजारी किंवा दवाखान्यात अँडमिट असलेल्या
व्यक्तीसाठी सप्ताहाच्या शेवटी धावपळ करावी लागेल.
धनु :–नोकरीच्या ठिकाणी अडमुठे किंवा अडवणूकीचे धोरण स्विकारून नका. तडजोडीने तसेच समजूतदारपणे कामे
केल्यास तुम्हाला नक्कीच यश मिळेल. महिलांकडून मानसिक भितीपोटी हातातील कामात चुका होण्याचा संभव
आहे. सप्ताहाच्या सुरूवातीलाच कांही अप्रिय घटनांना सामोरे जावे लागेल. नातेवाईकांबरोबरील असलेल्या तुमच्या
सलोख्यामुळे तुम्हाला ऐनवेळी त्याचेकडून हक्काची मदत मिळेल. कुटुंबातील सर्वांचा हातभार लागल्याने
महत्च्याच्या कामाला गती येईल व मानसिक ताणही कमी होईल.
मकर :–या सप्ताहात आपण व आपले काम भले हेच सूत्र कामाला येणार आहे. कोणासाठीही या सप्ताहात कसलीही
मध्यस्थी करू नका. आईवडीलांचा आनंद कशात आहे हे ओळखून तुम्हाला मुलांची चांगली साथ मिळणार आहे.
मित्रमंडळीमधे तुमच्याविषयी झालेले गैरसमज आपोआप दूर होत असल्याचे तुम्हाला जाणवेल. नव्याने परिचय
झालेल्या व्यक्तीवर विश्र्वास टाकू नका. वकील मंडळीना हातातील केसबाबतच्या आपल्या बौद्धीक क्षमतेचा योग्य
अंदाज येईल.
कुंभ :–हा सप्ताह कांही प्रमाणात धावपळीचा व धकाधकीचा जाणार आहे. तूम्ही करत असलेल्या कामातील गती
पाहून वरिष्ठ खूपच खूष होणार आहेत. महत्वाच्या विषयात नुसत्या अनुभवावर न राहता बोद्धीक कसोटी लावावी
लागेल. सरकारी क्षेत्रातील व न्यायालयातील कर्मचार्यांनी कोणाशीही जास्त जवळीक करू नये. आर्थिक व्यवहार
तर नक्कीच त्रासदायक राहतील. नुकतेच आजारपणातून बरे झालेल्यांनी आवश्यक ती विश्रांती घ्यावी. ओव्हर
काँन्फीडन्सने कामे करू नयेत.
मीन :–या सप्ताहात मनाला दिलासा देणार्या घटना घडतील. कुटुंबात ज्येष्ठांचा वाढदिवस करण्याचा घाट फक्त
तुमच्या मुळेच फार पडेल. कुटुंबातील गरजा ओळखून आर्थिक नियोजन करावे लागेल. ज्येष्ठांच्या समाधानासाठी
तुमच्या मनात नसले तरी अनिच्छेने होकार द्यावा लागेल. राजकीय क्षेत्रात तुमच्या विरोधातील मंडळीना तुमच्या
विरोधात जाण्याची हिम्मत होणार नाही. व्यवसाय क्षेत्रात आवश्यक ती सुधारणा केल्यास यश चालून येईल.
महत्वाच्या आर्थिक बाबतीत फक्त लक्षांत ठेवण्याऐवजी नोंदी महत्वाच्या राहतील.
||शुभं-भवतु ||