Read in
शनिवार 12 जून 2021 चे दैनिक राशीभविष्य
शनिवार 12 जून चंद्ररास मिथुन. दिवसरात्र व चंद्रनक्षत्र आर्द्रा 16:56.पर्यंत व नंतर पुनर्वसु.
वरील राशी नक्षत्रांचा
विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :–आज तुमची समयसूचकता एकदम कारणी लागेल आणि तुमच्या धाडसाने प्रसंगातून अलगद बाहेर पडाल.
व्यावसायिक कामात होणार्या बिघाडावर योग्य उपाय सापडेल. बर्याच दिवसापासून रखडलेले तुमचे घर लवकरच
ताब्यात येणार असल्याचा निरोप येईल.वृषभ :–नोकरीत बदली किंवा कामातील बदल स्विकारावा लागेल. तुमचे कोणतेही तंत्र उपयोगी पडणार नाही.
व्यवसाय व मार्केटींगचा उद्धोगाची आलेख अचानक उंचावत जात असल्याचे लक्षात येईल.मिथुन. :–कुटुंबाकरता व जवळच्या नातेवाईकांकरीता आर्थिक बोजा उचलावा लागेल. घरातील दुरूस्तीची कामे आता
परत पुढे ढकलली जातील. शिक्षणासाठी परदेशी जाऊ इच्छिणार्यांना आर्थिक बाबतीत आवश्यक ती मदत मिळेल.कर्क :–विचार न करता खरेदी केल्यामुळे अनावश्यक खर्च वाढतील. नोकरीत तुमच्या कामावर, कामाच्या पद्धतीवर
वरीष्ठ खूष होतील. नव्याने गुंतवणूक करता असाल तर स्वत:च्या विचाराने निर्णय घेऊ नका.सिंह :–तुम्हाला तुमच्या आवडत्या क्षेत्रात काम करता येणार असल्याचे चित्र स्पष्ट होईल. लहान सहान कारणावरून
ही आज तुम्हाला आनंद मिळणार आहे. कोणत्याही अत्यावश्यक कारणाशिवाय प्रवास करू नका.कन्या :–वडीलांच्या मध्यस्थीने मित्राच्या आईला दवाखान्यात अँडमिट करणे सोपे जाईल. सार्वजनिक जीवनात
वादळ उठणार नाही याची काळजी घ्या. जमीनीची रेंगाळलेली कामे तातडीने हातात न घेतल्यास त्यामधील गुंता
वाढेल.तूळ :–गर्भवती महिलांनी प्रकृतीची विशेष काळजी घ्यावी. वडिलांच्या प्रकृतीची काळजी घेताना नवीनच किडनीचा
प्राँब्लेमही त्रास देऊ शकेल. तरूणांना आपल्या नोकरीच्या ठिकाणी मनासारख्या घटना घडतील.वृश्र्चिक :–नोकरीत अचानक वेतनात वृद्धी झाल्याचे कळेल. शिक्षक मंडळीना आजचा दिवस मानसन्मानाचा
आजचा राहणार आहे. विद्यार्थ्यांनी गेले वर्षभर घेतलेल्या कष्टाचे चीज झाल्याचे लक्षात येईल. तरूणांचे व्यवहार
संशयात अडकतील.धनु :–तरूणांनी वाईट संगतीपासून व व्यसनापासून दूर रहावे. आईच्या प्रकृतीची काळजी वाढेल व प्रसंगी
दवाखान्यात उपचारासाठी दाखल करावे लागेल. आज फक्त कामाकडे लक्ष दिल्यास काम शिल्लकच राहणार नाही.मकर :–घरगुती व्यवसायात आर्थिक आवक चांगली राहील व नव्याने गुंतवणूक करावी वाटेल. जून्या मित्रांची भेट
घडेल व सर्वानाच त्यातून आनंद मिळेल. वडिलांच्या नोकरीतील मागील बाकी असलेले येणे मिळण्याचे कळेल.कुंभ :–आज रागावर नियंत्रण ठेवल्यास कामात कोणत्याही प्रकारचा बिघाड होणार नाही. आजचा दिवस तुम्हाला
डबल ताकदीने व धडाडीने काम करण्यास सांगत आहे. उत्तम कार्यशक्ती मुळे रेंगाळलेल्या प्रोजेक्टला मार्गी
लावण्याचे आश्वासन द्याल.मीन :–आज त्रासदायक व्यक्तीच्या आसपासही फिरकू नका. कुटुंबातील महत्वाच्या निर्णयात तरूणांचे मत
विचारात घेतल्यास सर्व कामाचे स्वरूपच बदलून जाईल. कलाकार मंडळीना आपल्या कलेचे सादरीकरण करण्याची
महत्वाची संधी मिळेल.
||शुभं–भवतु ||