Read in
शुक्रवार 11 जून 2021 चे दैनिक राशीभविष्य
शुक्रवार 11 जून चंद्ररास मिथुन दिवसरात्र व चंद्रनक्षत्र मृगशीर्ष 14:30 पर्यंत व नंतर आर्द्रा.
वरील राशीचा व दोन्ही
नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश
देत आहे.
मेष :– कालपर्यंत ज्यांच्याबरोबर तुमचे चांगले पटत होते त्यांच्या वागण्यामुळे तुमच्या मनात कटुता निर्माण होईल.
वाहन विक्री खरेदीच्या व्यवसायात चांगली आर्थिक प्राप्ती होईल. दूर गावी असलेल्या आईला भेटण्यासाठी जाण्याचे
ठरवाल.वृषभ :–गायक मंडळीना मैफिलीत गाणे सादर करता येणार आहे. तुमच्या घराण्यातील श्री गुरूमाऊलीच्या कृपा
आशिर्वादाने ज्येष्ठ व्यक्तींवरील संकट दूर होईल. आईची इच्छापूर्ती कराल व त्यातून समाधान मिळेल.मिथुन :–स्वकष्टार्जित धनाचा इतरांसाठी मोठ्या प्रमाणात वापर करावा लागेल. लहान भावंडाच्या मनातील इच्छा
प्रत्यक्षात पूर्ण होण्याकरीता तुमच्या प्रयत्नाना यश येईल. राजकीय क्षेत्रातील मंडळीना अचानक कामाचा तणाव
निर्माण होईल.कर्क :–अचानक तुम्हाला तुमच्यातील आत्मविश्वास कमी झाल्याचे जाणवेल. शिक्षकांना नवीन प्रशिक्षण करण्याची
संधी मिळेल. तरूणांना अचानक अँपेडिक्सचा त्रास होऊ लागेल. कोणाशीही आज स्पर्धा करू नका.सिंह :– तुमच्या नोकरीच्या ठिकाणी महत्वाच्या कामात तुम्हाला सल्ला विचारला जाईल. आजारी व हाँस्पिटलमधे
अँडमिट असलेल्यांना आज डिसचार्ज मिळेल. विद्यार्थ्यांना अवघड विषयातील झालेल्या प्रगतीमुळे समाधान वाटेल.कन्या :–व्यवसायातील तुमच्या कर्तृत्वामुळे तुमचा सन्मान वाढेल. नोकरीतील कर्मचार्यांचे घरापासून लांबच्या
ठिकाणी बदली होणार असल्याचे कळेल. दुसर्यांच्या ताब्यात असलेल्या तुमच्या जागेवरचा ताबा सोडणार नाहीत
तरी वेळीच योग्य ते पाऊल उचलावे लागेल.तूळ :–एकाच वेळी दोन दगडावर पाय ठेवण्याने विनाकारण नुकसान करून घ्याल. अचानक होणार्या लाभापेक्षा
संथपणे होणार्या प्राप्तीला जास्त महत्व द्यावे लागेल . मनातील योजना कागदावर आणण्यापूर्वी पुन: एकदा
विचार करा.वृश्र्चिक :–ज्याच्यावर तुमचा विश्वास आहे त्याच्याकडूनच तुमची फसगत झाल्याचे उशीरा लक्षात येईल. सामाजिक
स्तरावर तुमच्या प्रतिष्ठेला बाधा येईल असे वागू नका. कुटुंबात वादग्रस्त विषयावरील चर्चेने मानसिक शांतता
बिघडेल.धनु :–ऐनवेळी सासुरवाडीकडून मिळणार्या मदतीवर अवलंबून राहिल्याने कामाचा खोळंबा होईल. सरकारी
अधिकार्यांना मुद्धामहून अडचणीत आणले जाईल. तरी जागरूक रहावे. मुलांच्या आर्थिक व्यवहारावर बारकाईने
लक्ष ठेवावे.मकर :–विवाहाच्या प्रस्तावाचा योग्य वेळेत विचार करा. भावनेच्या आहारी जाऊन कोणताही निर्णय घेऊ नका.
मानसोपचार तज्ञांना अतिशय ताणतणावा सहन करावा लागेल. महिलांनी प्रत्येक गोष्ट शांततेने मिटवण्याचा
प्रयत्न करावा.कुंभ :–तरूणांना जून्या आजारावर मात केल्याचा आनंद होईल. घरगुती व्यवसायात नव्याने भांडवलाची गरज
निर्माण होईल. विद्यार्थ्यांनी आपल्या इच्छेपेक्षा आपल्या क्षमता ओळखून विषय निवडावेत.मीन :–गेल्या वर्षभरापासून रखडलेल्या घराचा लवकरच ताबा मिळणार असल्याची बातमी कळेल. वयस्कर
मंडळीना आर्थिक विवंचना जाणवेल. तुमच्या हातातील प्रोजेक्टवर लक्ष केंद्रित केल्यास कामाचा आवाका कळेल व
भिती दूर होईल.
||शुभं–भवतु ||