daily horoscope

गुरूवार 10 जून 2021 चे दैनिक राशीभविष्य

Read in

गुरूवार 10 जून 2021 चे दैनिक राशीभविष्य

गुरूवार 10 जून चंद्ररास वृषभ 25:09 पर्यंत व नंतर मिथुन.

चंद्रनक्षत्र रोहिणी 11:43 पर्यंत व नंतर मृगशीर्ष. वरील
दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय
फलादेश देत आहे.
1) आज शनैश्र्वर जयंती आहे. तरी ज्यांना शनीमहाराजांना प्रसन्न करून घ्यायचे आहे त्यांनी त्यांची उपासना
करावी. व पुढील मंत्र किमान २३ ञेळा म्हणावा. ज्यांना शक्य असेल त्यांनी 108 वेळा करावा. प्रथम संकल्प
करावा.
सूर्य पुत्रो दीर्घ देहो विशालक्ष: शिवप्रिय 😐 मंदचार: प्रसन्नात्मा पीडां हरतु मे शनि : ||
2) आज कंकणाकृती सूर्यग्रहण आहे. पण ते भारतातून दिसणार नसल्याने काहीही काळजी करू नये.

मेष :–राजकीय क्षेत्रातील मंडळीना अचानक फसवणूक प्रकरणात गोवले जाण्याच्या हालचाली सुरू होतील.
वयस्कर मंडळींच्या उजव्या डोळ्याचा मोतीबिंदू वाढला असेल तर त्वरीत डाँक्टरांचा सल्ला घ्या. आज तरूणांना
रोजच्यापेक्षा उत्साह कमी जाणवेल.

वृषभ :–कुटुंबात पतीपत्नीमधे अचानक वाद होऊन नवीनच समस्या उभी राहील. डोकेदुखीचा, मायग्रेनचा त्रास
वाढेल. सेवाभावी काम करणार्या सेवकांना संस्थेकडून मान सन्मान मिळेल. महिलांना जवळच्या नातेवाईकांकडून
विचारपूस करण्याचे फोन येथील.

मिथुन :–आज तुम्ही करत असलेल्या कामात, प्रोजेक्टमधे अडचणी निर्माण होतील. कोणीही मुद्धमहून करणार
नाही पण तुमचा पी . सी. ला किंवा साँफ्टवेअरला झालेल्या प्राँब्लेम मुळे सर्व गडबड होईल. प्रेझेंटेशनचा फियास्को
होईल.

कर्क :–कोर्टकेसच्या गुंत्यातून तुम्ही लवकरच सुटणार असल्याचे लक्षात येईल. पतीपत्नी किंवा संततीबरोबर
झालेल्या दुराव्यात अचानक बदल होऊन प्रेमभावना निर्माण होईल व एकोपा होईल. लहान मुलांच्या हातातील
खेळण्याकडे विशेष लक्ष द्या.

सिंह:–आज व्यवसायाबाबत च्या अडचणीत सुधारणा होणार्‍या गोष्टी घडतील व मानसिक समाधान मिळेल.
कुटुंबातील सर्वांचा हातभार लागल्याने महत्च्याच्या कामाला गती येईल. नोकरीतही प्रतिष्ठा वाढणार्या घटना
घडतील.

कन्या :–सरकारी अधिकारी वर्गाला आपल्या कामातील त्रुटींकडे लक्ष् द्यावे लागेल तसेच त्यांच्या अधिकारात
अडचणी निर्माण होतील. नोकरी व व्यवसाय दोन्ही करणार्यांना आज तारेवरची कसरत करावी लागेल.

तूळ :–उच्च शिक्षणासंदर्भातील कामात अचानक बदल करून नोकरीच्या संधीचा विचार कराल. पण सध्या
गुरूबरोबर होणारा नवपंचम योग शिक्षणाकडेच मन व वेळ व यशही मिळेल. कोणत्याच कामात दोलायमान होऊ
नका.

वृश्र्चिक :–बर्याच दिवसापासून विम्याचे येणारे पैसे लवकरच मिळणार असल्याचे संकेत मिळतील. नव्याने विकत
घेतलेल्या किंमती वस्तूत बिघाड झाल्याने नुकसान भरपाई मिळणार असल्याचे कळेल. कुटुंबात आजी आजोबांना
तुमच्याकडून आनंद व समाधान मिळेल.

धनु :–व्यवसायातील भागीदारीच्या व्यवहारात तुमच्या अडमोठी धोरणामुळे व्यत्यय येईल. तडकाफडकी निर्णय
घेऊ नका. विवाह ठरला असल्यास आज कोणत्याही विषयावर कोणतेही मत व्यक्त करू नका.

मकर :–स्पर्धा परिक्षा किंवा इतर कोणत्याही स्पर्धेसाठी सध्या करत असलेली मेहनत पुरणार नाही.
वडीलधार्यांकडून मनातील शंकांचे निरसन करून घ्या. उगीत एकाच विचारावर चर्चा करून काहीच निष्पन्न होणार
नाही.

कुंभ :–प्रेम प्रकरणात होणारे वाद सिरियसली घेऊन त्यावर विचार करा. नोकरीत बदलाची अपेक्षा करणार्याना
सहजपणे साध्य होणार आहे. वडिलांकडील नात्यातून काळजी लावणारा निरोप येईल.

मीन :–शिक्षणात पडलेला खंड आता सुधारण्याची संधी निर्माण ङोईल. ज्येष्ठांना, प्रौढांना एखाद्या प्रशिक्षणआत
सामिल होण्याची संधी मिळेल. लेखकांना जूने थटलेले लेखनाचे पैसे प्राप्त होतील.

||शुभंभवतु ||

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *