Read in
बुधवार 09 जून 2021 चे दैनिक राशीभविष्य
बुधवार 09 जून चंद्ररास वृषभ दिवसरात्र व चंद्रनक्षत्र कृतिका 08:43 पर्यंत व नंतर रोहिणी.
वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
आज चतुर्दशी 13:57 ला संपत असून वैशाख कृष्ण अमावास्या सुरू होत आहे.
मेष :– बोलण्यातील मार्दवपणाला किती महत्व आहे याचा मोठा अनुभव येईल. कुटुंबातील वारसा हक्का बाबतच्या न्यायालयात अडकलेल्या प्रश्र्न सोडवण्यासाठी तुमचा चाललेला हलगर्जीपणा कामात नुकसान करणार आहे.
वृषभ :–वडीलांच्या प्रकृतीची चिंता निर्माण करणार्या घटना घडतील. तरूणांच्या बोलण्यात वागण्यात एकवाक्यता राहणार नाही. शैक्षणिक क्षेत्रातील मंडळीना प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या पदावर नेमणूक करण्यात येणार असल्याची बातमी मिळेल.
मिथुन :– महिलांना आज घरातील कामाचा ताण जाणवेल. वैयक्तिक महत्वाच्या कामासाठी ओढून ताणून वेळ काढावा लागेल. व्यवसायातील कर्जमुक्तीसाठी तुम्हाला नवीन योजना आखाव्या लागतील. नुसता विचार करून काहीच होणार नाही.
कर्क :–मित्रमंडळींबरोबरच्या शाब्दिक बाचाबाची होऊन वाद निर्माण होईल. नोकरीच्या ठिकाणी आज तुमच्या कामाच्या पद्धतीवर आक्षेप घेतला जाईल. चर्चेपेक्षा कामाला महत्व देऊन त्यानुसार वागणे ठेवा.
सिंह :–टाकाऊतून वस्तू बनवण्याच्या कार्यशाळा आयोजित करण्यात तुम्ही यशस्वी होणार आहात. पुरूषांना आपल्या फिटनेसकडे लक्ष द्यावे लागेल. रेंगाळलेल्या प्रश्र्नांना प्राधान्य दिल्यास अजूनही उशीर झालेला नाही हे लक्षांत येईल.
कन्या :–आज तुमच्या स्वभावातील लहरीपणा इतका वाढेल की कोणत्याच बाबतीत तुम्ही निर्णय घेऊ शकणार नाही. अति मोबाईलच्या आहारी गेलेल्यांना डोकेदुखीचा त्रास जाणवेल. वयस्कर मंडळीना आपल्या मूळ गावाची आठवण येऊन ओढ वाढेल.
तूळ :–बदलीच्या मागे न लागल्यास डिपार्टमेंट बदलाची संधी मिळेल. लहान मुलांच्या विश्र्वातील त्याच्या विचारांना धक्का देऊ नका. अभ्यासातील अवघड प्रश्र्नांसाठी फक्त तज्ञांचा सल्ला उपयोगी ठरेल.
वृश्र्चिक :–वयस्कर मंडळींना जून्या काळातील विषयावरील गप्पात रमावेसे वाटेल. स्वप्नातील बाबींना अवास्तव महत्व देऊ नका. आर्थिक बाबींना गरजेपेक्षा जास्त महत्व दिल्याने सर्वांकडून इतरांकडून चेष्टेचा विषय व्हाल.
धनु :–सामाजिक परिस्थितीचे भान ठेवून गरजूंना आर्थिक मदत कराल. विद्यार्थ्यांना आपल्या आवडत्या विषयावर बोलण्याची संधी मिळेल. महत्वाच्या विषयावर आवश्यक तेवढे ज्ञान नसल्यास जराही आपले मत व्यक्त करू नका.
मकर :–एखादा किडा मुंगी दंश करण्याचा धोका आहे तरी अडगळीच्या ठिकाणी किंवा झाडाझुडपात जाऊ नका. नात्यांमधे दिलेली आर्थिक मदत मानसिक समाधान देईल. आईच्या प्रकृतीची काळजी वाढेल.
कुंभ :– शाळकरी मुलांना त्यांच्या गरजेनुसार तुमच्याकडून मदत मिळेल. संततीच्या आरोग्याच्या प्रश्र्नावर योग्य मार्ग सापडेल. उच्च शिक्षणच्या प्रतिक्षेतील विद्यार्थ्यांना आता योग्य तो निर्णय घेता येणार आहे.
मीन :–लहान मुलांचा ताप वाढू देऊ नका. फिटस् येणार्या मुलांची विशेष काळजी घ्यावी लागेल. नोकरीच्या ठिकाणच्या कामातील आस्था व प्रेम वाटण्यासाठी प्रामाणिक प्रयत्नच कामी येतील. अविचाराने कोणतेही मत व्यक्त करू नका.
||शुभं–भवतु ||