daily horoscope

मंगळवार 08 जून 2021 चे दैनिक राशीभविष्य

Read in

मंगळवार 08 जून 2021 चे दैनिक राशीभविष्य

मंगळवार 08 जून चंद्ररास मेष 12:22 पर्यंत व नंतर वृषभ.

चंद्रनक्षत्र कृतिका अहोरात्र. वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा
विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

मेष:– आज तुम्ही तुमच्या बुद्धीचातुर्याने अवघड कामाचेही योग्य प्रकारे नियोजन कराल. आज तुम्हाला एखादी
गुंतवणूक करण्यास हरकत नाही. पायदुखी, कंबरदुखीकडे दुर्लक्ष करू नका. कुटुंबातील वातावरण आनंदी ठेवण्यात
तुमचा मोठा वाटा राहील.

वृषभ :–विवाहित मुलींना माहेरी जाण्यासाठी कारण मिळेल तरी संधीचा फायदा घ्या. कोणतेही आर्थिक व्यवहार
दुपारी 12:22 नंतर करा तत्पूर्वी करू नका. नोकरीत बदलाची अपेक्षा करणार्‍यांनी स्वत: इच्छूक असल्याचे दाखवू
नका.

मिथुन :– कोणाच्याही मदतीशिवाय आज तुम्ही आगेकूच करणार आहात. कोणत्याही निर्णयापर्यंत येताना
एकतर्फी विचार करू नका. मित्रांच्या मदतीने नवीन व्यवसायाचा विचार कराल किंवा मित्राचा व्यवसाय
चालविण्यास घेण्याचा विचार कराल.

कर्क :–गेले वर्षभर करत असलेल्या मेहनतीतून आर्थिक कमाई समाधानकारक राहील. आत्या, काका यांच्या
मदतीसाठी जावे लागेल. मनातील योजना आज कोणासमोरही उघड करू नका.

सिंह :–वडिलांच्या प्रकृतीच्या काळजीने मनाला शांतता मिळणार नाही. टेक्निकलच्या क्षेत्रातील मंडळीना नवीन
प्रोजेक्ट मिळेल व कुटुंबात आनंद निर्माण होईल. विद्यार्थी नवीन वर्षाच्या अभ्यासाचे उत्तम प्रकारे नियोजन
करतील.

कन्या :– डोळ्यांच्या जून्या त्रासावर औषध करण्यासाठी परदेशी असलेल्या मित्राकडून मोठी मदत मिळेल.
बहिणीच्या विवाहाचा प्रश्र्न तुमच्या मध्यस्थीने मार्गी लागेल. सरकारी बँकेच्या विविध योजनांची माहिती इतरांना
समजावून सांगण्याची संधी सोडणार नाही.

तूळ :– शाळकरी वयात शिकलेल्या कला सादर करण्याची चांगली संधी मिळेल. पर्यावरणाच्या क्षेत्रातील तुमच्या
योगदानाबद्दल समाजात तुमची मान उंचावेल. इस्टेट एजंटना अचानक पैसे मिळवून देणार्‍या संधी मिळतील.

वृश्र्चिक :–राजकीय क्षेत्रातील मंडळीना नवीनच अडचणीला सामोरे जावे लागेल. महिलांनी कौटुंबिक चर्चा करत
बसण्यापेक्षा आपल्या करियरकडे लक्ष दिल्यास प्रगतीची दिशा सापडेल. मैत्रीच्या व्यवहारात तुम्हाला मोठी आर्थिक
मदत करावी लागेल.

धनु :– वडिलांकडील नात्यातील माणसांच्या मदतीसाठी धावून जावे लागेल. शाळकरी मुलांना आपल्या आवडीच्या
विषयात रस निर्माण होईल. अविवाहीतांना आलेल्या स्थळाची बारकाईने चौकशी करावी लागेल.

मकर :–आजची सकाळ तुमच्यासाठी आनंदाची बातमी घेऊन येईल. वडील व मुलगा यांच्यातील नाते घट्ट करणारे
प्रसंग महत्वाचा ठरेल. बोलण्यातील चतुरपणामुळे आज तुम्ही मिटींग जिंकून स्वत:ला सिद्ध करणार आहात.

कुंभ :– गुंतवणूकीतून आज कोणत्याही विशेष घडामोडी करू नका. नव्या व्यवसायाच्या वृद्धीसाठी अचानक
कोणतेही धाडस करू नका. नोकरदार वर्गाला बदलीच्या ठिकाणी जाण्यापूर्वी तेधील परिस्थितीची पूर्ण माहिती करून
घ्यावी.कुंभ :– गुंतवणूकीतून आज कोणत्याही विशेष घडामोडी करू नका. नव्या व्यवसायाच्या वृद्धीसाठी अचानक
कोणतेही धाडस करू नका. नोकरदार वर्गाला बदलीच्या ठिकाणी जाण्यापूर्वी तेधील परिस्थितीची पूर्ण माहिती करून
घ्यावी.

मीन :–यशासाठी मेहनतीपेक्षा नवनवीन प्रयोग करण्याची आवश्यकता आहे याचा विचार करावा लागेल. नवीन
ओळखीवर विश्र्वास ठेवून कोणतेही व्यवहार करण्याचे धाडस करू नका. प्रवासाची रिस्क घेऊ नका.

||शुभंभवतु ||

 

One thought on “मंगळवार 08 जून 2021 चे दैनिक राशीभविष्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *