daily horoscope

सोमवार 07 जून 2021 चे दैनिक राशीभविष्य

Read in

सोमवार  07 जून  2021 चे दैनिक राशीभविष्य

सोमवार. 07  जून चंद्ररास मेष दिवसरात्र व चंद्रनक्षत्र भरणी 29: 35  पर्यंत व नंतर कृत्तिका.

आज सोमप्रदोष आहे. ज्यांच्याकडे घराण्यात श्री महादेवाची  उपासना केली जाते त्यांनी हा प्रदोष अवश्य करावा.  वरील राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

 

मेष :– आज स्वभावातील लहरीपणात अचानक वाढ होईल  व एका मताशी ठाम राहणार नाही. तरी कोणताच निर्णय घेऊ नका. संततीच्या आजारपणावर खर्च होणार आहे तरी जवळ पैसे ठेवावे लागतील. कोणत्याच गोष्टीत अती धाडस करू नका व बेफिकीरी पण नको.

 

वृषभ :–परगावी जाण्याचा बेत रद्ध करावा लागेल. सरकारी खात्यातील कर्मचार्‍यांना आपल्या दैनंदिन कामकाजासोबत दुसर्‍या खात्यातील कामही करावे लागेल.  लहान मुलांच्या पायाला  व घोट्याला मार लागण्याचा धोका आहे.

 

मिथुन :–महिलांना आवडत्या वस्तूंची खरेदी करता येणार आहे. वयस्कर मंडळीना घेऊन कुटुंबात मनोरंजनात्मक कार्यक्रम  आयोजित करण्यात येईल.  गायनाची मैफल जमेल. स्वेच्छा निवृत्ती घेण्याचा विचार सध्या तसाच राहू द्या.

 

कर्क :– व्यवसायातील ठरलेल्या कामाच्या पद्धतीत अचानक बदल करावा लागेल.  तुमच्यापेक्षा वयाने मोठे असलेल्या मित्रांच्या प्रकृतीची विशेष चौकशी करावी लागेल. विद्यार्थ्यांना पाठांतरासाठी  नवनवीन प्रयोग सुचतील.

 

सिंह :– आज सकाळपासून हातात घेतलेल्या कामात अचानक अडथळा निर्माण होईल तरी योग्य व्यक्तीकडून सल्ला घ्यावा. तुमची आर्थिक गरज पूर्ण करण्याचे मार्ग सापडतील व ते ही कमी व्याजाने  सोय होईल.

 

कन्या :–नोकरी सोडून मित्राच्या व्यवसायात काम करण्याची संधी मिळेल.  जे नोकरीच्या प्रतिक्षेत आहेत त्यांनी या संधीचा फायदा घ्यायला हरकत नाही. भाग भांडवल, भागिदारी या गोष्टींच्या भानगडीत पडू नका.

 

तूळ :–अविवाहित मुलींना आपल्या विवाहाचा प्रश्र्न मार्गी लावण्यासाठी ज्येष्ठांच्या विचाराने जावे लागेल. मनातील अनुत्तरीत प्रश्न विचारानेच सोडवावे लागतील.  सध्या बचतीचे धोरण स्विकारून आर्थिक नियोजन करा.

 

वृश्र्चिक :–नोकरदार स्त्रीयांना कामाचा ताण जास्त प्रमाणात जाणवणार आहे.  कामाच्या योग्य नियोजनाने कामे सोपी कराल.  पतीपत्नी दोघांनी एकमताने पैशाची गुंतवणूक केल्यास त्यातून लाभ चांगला होईल.

 

धनु :–संततीच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. तरूण मुलांकडे विशेष लक्ष द्या. त्याच्याकडून तुमची फसगत होण्याची शक्यता आहे.  कोणतेही महत्वाचे करार व बँकेचे व्यवहार ज्येष्ठांच्या सल्ल्याशिवाय करू नका.

 

मकर :–विद्यार्थ्यांना आपल्या रखडलेल्या प्रोजेक्टवर काम करता येणार आहे. नवीन नोकरीतही तुम्हाला आपले कौशल्य दाखवता येईल पण तेवढी जिद्ध ठेवावी लागेल. कुटुंबातील अडचणींवर मार्ग काढताना दमछाक होणार आहे.

 

कुंभ :–मित्रमैत्रिणींकडून प्रेरणा घेतल्याने नवीन धाडस करण्याची हिम्मत वाढेल. बँकेतील कर्जाच्या  व्यवहारातील कामात प्रगती होईल.  आई व मुलांमधील प्रेमाचा अनुभव इतर नातेवाईकांना खूपच ह्रदयस्पर्शी असेल.

 

मीन :– आजच्या दिवसात जेवढी महत्वाची कामे करता येणार आहेत ती करून घ्या.  महिलांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्धल सर्वांकडून कौतुक होईल. आज सर्वच कामे शांततेने केल्यास ती यशस्वी होतील.

||शुभंभवतु ||

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *