Read in
शनिवार 05 जून 2021 चे दैनिक राशीभविष्य
शनिवार 05 जून चंद्ररास मीन 23:36 पर्यंत व नंतर मेष.
चंद्र नक्षत्र रेवती 23:36 पर्यंत व नंतर अश्र्विनी. वरील
दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय
फलादेश देत आहे.मेष :– राजकिय क्षेत्रातील व्यक्तींना सत्तेसाठी कोणतेही धाडस करण्याची तयारी असण्याच्या मनोवृत्तीला संयम
घालावा लागेल. हातात घेतलेल्या प्रत्येक कामामध्ये नियोजनाची गरज राहील. ज्येष्ठांबरोबर मिळते जुळते धोरण
स्विकारा.वृषभ :–घराच्या सुशोभिकरणाकला महत्व देऊन त्यानुसार नियोजन कराल. अभ्यासू वृत्तीच्या विद्यार्थ्यांना
आगामी वर्षात काय शिकावे यासाठी संभ्रम निर्माण होईल. सल्लागार मंडळींकडून अतिशय मोलाचे सल्ले दिले
जातील.मिथुन :–राजकारणाच्या क्षेत्रात तुमचे म्हणणे बरोबर आहे हे सर्वाना पटेल व कांही महत्वाची सुत्रे तुमच्या हातात
येतील. न्यायालयातील विषयावर बोलताना तुमची भूमिका आक्रमक होऊ देऊ नका. कोणालाही आश्र्वासन
देण्यापूर्वी विचार करा.कर्क :– तरूणांनी आपल्या क्षमता ओळखूनच व्यवहार करावेत, अतिविश्र्वासाने पैसे कर्जाऊ देऊ नका. समोरील
व्यक्ती तुमच्यावर छाप पाडून तुम्हाला व्यवहार करण्यास भाग पाडेल तरी आंधळेपणाने कोणतेही व्यवहार करू
नका.सिंह :–कौटुंबिक वादावर डोळे झाक न करता मूळ कारणाचा विचार करा. विद्यार्थ्यांनी व तरूणांनी स्पर्धात्मक
परिक्षेचा विचार करून निर्णय घ्यावेत. कुशाग्र बुद्धीमत्तेचा वापर कसा करता येईल याचा विचार करूनच प्रवेश
घ्यावा.कन्या :–संपत्तीसाठी प्रयत्न करणार्यांना आशादायी चित्र दिसेल. आज प्रत्येक कामात तुम्हाला कसोटीचे क्षण
येणार आहेत तरी न डगमगता सामोरे गेल्यास नक्कीच यशस्वी व्हाल. वयस्कर मंडळीनी औषध घेताना लेबल नीट
वाचूनच घ्यावे.तूळ :– अचानक सुचणार अया कल्पनांवर संयम ठेवा पण विचार मात्र बारकाईने करा. नोकरीच्या ठिकाणी तुम्ही
केलेल्या पैशाच्या मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार केला जाईल. कलाकार मंडळींचे समाजाकडून कौतूक होईल.वृश्र्चिक :–पूर्वीच्या प्रवासात झालेल्या ओळखीची तुम्हाला आजच्या कामात मदत होणार आहे. जूळ्या मुलांच्या
प्रकृतीची विशेष आज काळजी घ्यावी लागेल. वयोवृद्ध मंडळीनी अतिचिकित्सेने वागू नये.धनु :– बर्याच दिवसापासून घरातील हरवलेली वस्तू चोरीला गेली असल्याचे कळेल. व हा तुमचा अंदाजही खरा
ठरेल. आज मित्रपरिवाराबरोबर वागताना नि:संकोच वृत्तीने वागल्यास अवघड गोष्टीही सोप्या होतील.मकर :–सर्व गोष्टी नशिबावर सोडून प्रयत्न थांबवू नका. कुटुंबातील सर्वाना एकत्र घेऊन कामाला सुरूवात केल्यास
आज नुकसानीची जराही शक्यता नाहीय हे लक्षात घ्या. स्वकर्तृत्वावर विश्र्वास ठेवा.कुंभ :–अभ्यासासाठी जेवढी मेहनत घेता तेवढीच मेहनत हातातील प्रोजेक्ट पूर्ण करण्यासाठी पण घेतल्यास आर्थिक
प्राप्तीचा नवीन मार्ग सापडेल. निवृत्त व्यक्तीना समुपदेशनाचे काम करण्याची उत्तम संधी मिळेल.मीन :–तुमच्यावर असलेली जबाबदारी अतिशय चोखपणे पार पाडणे महत्वाचे आहे हे लक्षात घ्या. कोणत्याही
प्रकारच्या नकारात्मक कारणांना संधी देऊ नका. आकस्मिक आलेल्या खर्चामुळे नियोजन बिघडेल.
||शुभं–भवतु ||