daily horoscope

शुक्रवार 04 जून 2021 चे दैनिक राशीभविष्य

Read in
शुक्रवार 04 जून 2021 चे दैनिक राशीभविष्य

शुक्रवार 04 जून चंद्ररास मीन दिवसरात्र व चंद्रनक्षत्र उत्तराभाद्रपदा 20:46 पर्यंत व नंतर रेवती.

वरील दोन्ही राशी
नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश
देत आहे.
मेष :–हातातील खर्च झालेल्या पैशाचा हिशोब लागणार नाही तरी खर्च करतानाच लक्षात ठेवा. जवळच्या व्यक्तीच्या
मदतीने व्यवसायातील आर्थिक गणिते सोडवणे सोपे जाईल. कलाकार मंडळींना आज तुमच्याकडून महत्वाचे
मार्गदर्शन मिळेल.

वृषभ :– आज सकाळपासूनच घरातील कामाची धांदल गडबड सुरू होईल. अचानक तुमच्या छंदाला वा आवडत्या
कलेसाठी तुम्हाला वेळ देता येणार आहे. जोडीदाराच्या नोकरीच्या ठिकाणातून आनंदाची बातमी कळेल.

मिथुन :–स्वत:च्या पराक्रमाच्या जोरावर ध्येयाच्या दिशेने वाटचाल कराल. पतीपत्नीच्या व्यवसायात अचानक
पती राजांच्या मदतीने मोठी आघाडी माराल. प्रेमाच्या व्यवहारातील वाद, अडचणी दूर करण्यात यशस्वी व्हाल.

कर्क :–गुप्त हितचिंतकांकडून योग्य वेळी मार्गदर्शन मिळेल. मनातील विचारांवर संयम राखल्यास मानसिक त्रास
कमी होईल. संध्याकाळच्या भेटीगाठी मधून आज अमर्याद आनंद मिळेल.

सिंह :–कमी पैशाच्या गुंतवणूकीतून चांगला लाभ होणार असल्याचे संकेत मिळतील. कोणत्याही परिस्थितीत आज
प्रवासाचा बेत ठरवू नका प्रवासात धोका आहे. तरूण मुलांचा आज लहरीपणा वाढेल.

कन्या :–मनातील विचारांची दोलायमानता चुकीची असल्याचे मनालाच पटेल. तरूण तरूणींना वयात जास्त अंतर
असलेल्या जोडीदाराचे स्थळ पसंत पडेल. सामाजिक क्षेत्रातील ऊच्च प्रतिष्ठित लोकांबरोबर ऊठबस होईल.

तूळ :–नोकरीत तसेच व्यवसायातही अचानक मान सन्मानाचे प्रसंग येथील. आजचा दिवस हा तुमच्या आयुष्याला
एखादी वेगळीच कलाटणी देणारा ठरेल. महिला माँडेल्सना नवीन करार करता येणार आहे.

वृश्र्चिक :–नोकरीत बढतीचे वारे वाहू लागतील. महिलांचा अकारण क्रोध वाढेल व मानसिक नाराजी निर्माण होईल.
कुटुंबात धार्मिक कार्याचे नियोजन कराल. संततीच्या नावावर असलेल्या व्यवसायात तुमच्या मताला व
अधिकाराला महत्व निर्माण होईल.

धनु :–लहान हाँटेल, घरगुती खाण्याचे पदार्थ यांच्या व्यवसायाला अचानक जोरात चालना मिळेल भांडवलाच्या
भितीने घाबरून जाऊ नका. उधारी वसूल होईल. विद्यार्थ्यांनी आपल्याला नक्की काय करायचे आहे त्याचा विचार
करावा.

मकर :–अथक परिश्रमाने केलेली कामे यशस्वी होण्याच्या मार्गावर राहतील व सामाजिक स्तरावर तुमचे कौतुक
होईल. तरूणांना धाडसाच्या कामाचे आकर्षण वाटेल. आज दुपारनंतर तुम्हाला तुमचे कौशल्य दाखवण्याची संधी
मिळेल.

कुंभ :–आज दुपारनंतर अचानक कुटुंबात धावपळ गडबड होणार्‍या शुभ घटना घडतील. उच्चशिक्षित तरूणांना
ज्याची वाट पहावी लागली तेच आत्मसात होत असल्याचे जाणवेल. हाती आलेले नवीन प्रोटेक्ट स्विकारण्यास वेळ
लावू नका.

मीन :–आजचा दिवस काहीसा आळसावलेला राहणार आहे. आज अचानक कोणाविषयी ही मत बनवताना मागील
घटना जुळवून बघू नका. जवळच्या नातेवाईकांकडून मोठा मानसिक व प्रसंगी आर्थिक आधारही मिळेल.

||शुभंभवतु ||

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *