daily horoscope

गुरूवार 03 जून 2021 चे दैनिक राशीभविष्य

Read in
गुरूवार 03 जून 2021 चे दैनिक राशीभविष्य

गुरूवार 03 जून चंद्ररास कुंभ 12:06 पर्यंत व नंतर मीन.

चंद्रनक्षत्र पूर्वा भाद्रपदा 18:33 पर्यंत व नंतर उत्तरा भाद्रपदा.
वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने
नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :– नातेवाईकांकडून आनंदाच्या बातम्या कळतील. अतिउत्साहाच्या भरात नवीन कामाला सुरूवात कराल.
गाण्याच्या कार्यक्षेत्रात काम करणार्या कलाकारांना आपली कला आँन लाईन सादर करता येणार आहे.

वृषभ :–तरूणांना आपली सामाजिक कर्तव्ये पार पाडताना तारेवरची कसरत करावी लागेल. स्वपराक्रमाने
अडचणींवर मात करून कामाची दिशा ठरवाल. सकाळपेक्षा दुपारनंतरचा वेळ महत्वाचा राहील.

मिथुन :–आज तुमच्या मनात असलेल्या शंका सहजपणे दूर होतील. वकिली व्यवसायाच्या क्षेत्रातील मंडळीना
अचानक तुम्हाला तुमच्या विचारात बदल करावा लागेल. सरकारी क्षेत्रातील मंडळीनी आपलाच हेका चालवण्याचा
प्रयत्न करू नये.

कर्क :– कोण काय म्हणते याचा विचार करण्यापेक्षा तुम्ही तुमच्या मेहनतीवर विश्र्वास ठेवून कामाला सुरूवात
करा. तरूणांना आज मिळणार्‍या संधीचा उपयोग करून घेता आल्यास मनातील इच्छा पूर्ण होतील.

सिंह :–नोकरी व्यवसायात अचानक प्रगतीचे मार्ग सापडतील. महिलांना त्यांच्या घरगुती उद्धोगाची चांगली वाढ
होण्यासाठी भांडवलात वाढ करावी लागेल. सरकारी लायसन्स मिळण्याचे मार्ग सापडतील.

कन्या :–मानसिक शक्तीने कामाचा आलेला ताण घालवाल. धार्मिक कार्यात सहभागी होण्यासाठी प्रवास घडेल.
गायन, वादनाच्या वेबिनार मधील तुमचा सहभाग इतरांकडून कौतुकाचा राहील. आरोग्याच्या दृष्टीने विशेष
काळजी घ्यावी.

तूळ :–मनोरंजन व चैनीच्या वस्तूसाठी अचानक पैसे खर्च कराल. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीच्या मदतीमुळे
मनातील भिती दूर होऊन काम करण्याचे धाडस अंगात येईल. सामाजिक क्षेत्रात तुमच्या औदार्याचे कौतुक होईल.

वृश्र्चिक :–घरगुती व्यवसायात आर्थिक आवक चांगली राहील. जवळच्या व्यक्तीच्या मदतीने व्यवसायातील नवीन
योजना सुरू कराल. आजपर्यंतची नोकरीतील तुमचा कामाबाबतचा असलेला आदर व सन्मान वाढेल.

धनु :–कुटुंबातील शुभ कार्यासाठी मोठी रक्कमेच्या खर्चाची जबाबदारी तुमच्यावर येईल. अचानकपणे जून्या
नोकरीतून येणारे येणे लवकरच मिळणार असल्याचे कळेल. स्वयंशिस्तीसाठी ज्येष्ठांकडून मिळणारा सल्ला
महत्वाचा ठरेल.

मकर :–परिस्थिती संघर्षमय असलीतरी तुम्हाला त्याचा काहीही त्रास होणार नाही. आज तुमच्या नात्यातील
आवडती प्रेमाची माणसे भेटतील व त्यामुळे कौटुंबिक सुखात वाढ होईल. मौजमजेसाठी पैसे खर्च होतील.

कुंभ :– नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांच्या नाराजीमुळे ताणतणाव वाढेल. शेतीच्या व घराच्या व्यवहाराची जबाबदारी
तुमच्यावर येऊन पडेल. वडीलांच्या उपदेशामुळे स्वत:चे मत सहजपणे बदलले जाईल.

मीन :–अचानक आप्तेष्ठांना भेटण्यासाठी प्रवासाचा बेत ठरेल. बोलण्यातील मुखदुर्बळता कमी केल्यास अडलेले
काम सहजपणे मार्गी लागेल. व्यवसायातील हाताखालील व्यक्तीकडून महत्वाची माहिती मिळेल.

||शुभंभवतु ||

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *