daily horoscope

बुधवार 02 जून 2021 चे दैनिक राशीभविष्य

Read in
सोमवार 31 मे 2021 चे दैनिक राशीभविष्य

बुधवार 02 जून चंद्ररास कुंभ दिवसरात्र व चंद्रनक्षत्र शततारका 16:58 पर्यंत व नंतर पूर्वा भाद्रपदा.

वरील दोन्ही
राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय
फलादेश देत आहे.
आज मंगळ या ग्रहाचा कर्क राशीमधे सकाळी 06:50 ला प्रवेश होत आहे .
मेष :– आज स्वत:च्या खिशाला झीज सोसून इतरांना मदत कराल. कोणताही निर्णय घेताना मित्रपरिवाराबरोबर
चर्चा करूनच मग निर्णय घ्या. लांबच्या व्यवहारांवर विसंबून राहिल्यास फसगत होईल.

वृषभ :–बर्‍याच दिवसानंतर तुम्हाला मानसिक मोकळेपणा मिळाल्याचे जाणवेल. कुटुंबातील ज्येष्ठ मंडळींच्या
सहवासाने सकारात्मक विचारांना चालना मिळेल. महिलांना डोकेदुखीचा त्रास कमी झाल्याचे जाणवेल.

मिथुन :–पूर्ण विचार केल्याशिवाय तुम्ही तुमचे मत व्यक्त करू नका. नोकरीतील तुमची काम करण्याची क्षमता
पाहून इतरांना आज आश्र्चर्य वाटेल. व्यवसायासाठी काढलेल्या कर्जाचा बोजा मानसिक त्रास वाढवेल.

कर्क :–अचानक मानसिक बळ वाढवणार्‍या घटना घडतील तरी बाजूला ठेवलेली कामे हातात घ्यायला हरकत नाही.
बिघडलेल्या कामाचाही आज विचार केल्यास त्यावर कांहीतरी सकारात्मक मार्ग निघेल.

सिंह :–स्वकर्तृत्वावरील विश्र्वास डळमळू देऊ नका. व्यवसायातील, नोकरीतील तुमची हक्काची येणी लवकरच
मिळणार असल्याचे कळेल. जोडीदाराकडून खात्रीशीरपणे सहकार्य मिळेल तरी विचारायला हरकत नाही.

कन्या :– अंगावर जखम असलेल्यांनी अतिशय काळजीपूर्वक वागावे. मधुमेहीनी आपल्या आहारावर नियंत्रण
ठेवावे जराही हलगर्जीपणा करू नये. नोकरीतील कामाच्या ताणतणावाला अती महत्व देऊ नका. पायांची काळजी
घ्या.

तूळ :–स्पर्धा परिक्षांच्या अभ्यासात हलगर्जीपणा न करता सातत्य ठेवा. कुटुंबात मुलांना बैठ्या खेळात पत्त्यांचे
व्यसन कधी लागले याचा मानसिक धक्का बसेल. मुलांना आवडता पदार्थ खाण्याची संधी मिळेल.

वृश्र्चिक :– वर्षभर कमी अभ्यास केलेल्यांना पास नापासांची भिती वाटेल. तरूणांनी क्षणिक आनंदासाठी कोणत्याही
प्रलोभनाला बळी पडू नये. आज तसा प्रसंग येणार आहे तरी सावध रहावे.

धनु :–वर्तमानपत्राच्या क्षेत्रात काम करणार्‍यांनी आपला आवाका ओळखून काम करावे व अनाठायी धाडस करू
नये. लेखकांना आपल्या पुस्तक प्रकाशनाचे वेध लागतील. तरूणांना आनंद देणार्‍या घटना घडतील.

मकर :–निवृत्त कर्मचार्‍यांना त्यांचे प्राँव्हीडंट फंडाचे पैसै वेळेवर न मिळाल्याने दिलेला शब्द पाळता येणार नाही.
घराच्या कुलुपाची किल्ली हरवण्याचा धोका आहे तरी आज विशेष काळजी घ्या.

कुंभ :–शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांच्या विचारांना महत्व प्राप्त होईल व त्यांच्या मताचा सरकारी कामात उपयोग
करण्याची मंजुरी मिळेल. लहान मुलांना शब्दकोडी, अंककोडी यात जिंकण्याची संधी मिळेल.

मीन :–व्यावसायिक जोडीदाराबरोबर मतभेदाचे प्रसंग आल्याने मानसिक ताण येईल. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी
मामाकडून चांगली आर्थिक मदत मिळेल. आज गुंतवणूक करू नका व पूर्वीच्या गुंतवणूकीतून कोणतेच व्यवहार
करू नका.

||शुभंभवतु ||

 

One thought on “बुधवार 02 जून 2021 चे दैनिक राशीभविष्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *