daily horoscope

मंगळवार 01 जून 2021 चे दैनिक राशीभविष्य

Read in
मंगळवार 01 जून 2021 चे दैनिक राशीभविष्य

मंगळवार 01 जून चंद्ररास कुंभ दिवसरात्र व चंद्रनक्षत्र धनिष्ठा 16:06 पर्यंत व नंतर शततारका.

मेष :– आज तुम्हाला स्वप्नांचा पडताळा येईल पण त्यासाठी ओढून ताणून अर्थ लावत बसू नका. शिक्षक मंडळींचे
राहिलेले पगाराचे पैसे मिळण्याचे मार्ग खुले होतील. आँनलाईनच्या व्यवसायाची सुरूवात आज करायला तुम्हाला
लाभदायक दिवस आहे.

वृषभ :–आईवडीलांच्या प्रकृतीकडे विशेष लक्ष द्यावे लागेल. व्यवसायातील रेंगाळलेल्या प्रश्र्नांना प्रथम महत्व द्या
व कामाच्या पूर्ततेसाठी आवश्यक ती मेहेनत घ्या. सापडत नसलेली वस्तू दक्षिण दिशेला सापडेल.

मिथुन :–वडिलांकडील नात्यातील माणसांकडून महत्वाची सूचना मिळेल त्या सूचनेवर विचार करा. भावनेच्या
आहारी जाऊन न्यायालयीन कामकाजात स्वत:च्या मताने वागू नका. कुटुंबात पूजा प्रार्थनेसाठी स्वत:चा वेळ द्यावा
लागेल.

कर्क :–नवीन नोकरीच्या कामातील गुंतागुंत सोडवताना वरिष्ठांबरोबर सल्ला मसलत करूनच काम करा. मानसिक
शक्तीच्या बळावर सासूरवाडीकडील लोकांना संकटातून वाचवाल. व्यवहारात आर्थिक नुकसानीची शक्यता आहे.

सिंह :–डाँक्टर मंडळीना त्यांचा मानसिक ताण वाढणार्‍या प्रसंगांना तोंड द्यावे लागेल. अनोळखी व्यक्तींकडून
समजलेल्या बातम्यांवर विश्र्वास ठेवू नका. विद्यार्थ्यांना नवीन अभ्यासक्रमाची ओढ निर्माण होईल.

कन्या :–दुकानदार, किरकोळ विक्रेते यांनी आपल्या नुकसानीचे खापर नोकरांवर फोडू नये. विनाकारण मनाची
चलबिचलता वाढेल. नोकरीतील कामात सहकार्यांकडून आपण होऊन मदत मिळेल.

तूळ :–नाटक, सिरियल्स मधे काम करणार्याना लोकांच्या टिकेला सहन करावे लागेल. मित्रांच्या आग्रहाने असो किंवा
स्वत:च्या मताने असो आज व्यसनाच्या नादी लागल्यास भयंकर मनस्ताप सोसावा लागेल.

वृश्र्चिक :–शाळेच्या नवीन प्रवेशाबाबत मानसिक गोंधळ निर्माण होईल. आईबरोबर असलेल्या भागिदारीच्या
व्यवसायात अचानक चांगली वसुली होईल. कलाकारांना आपली कला दाखवण्याची चांगली संधी मिळेल.

धनु :–इतरांना आलेल्या अनुभवातून शिकण्याचा प्रयत्न केल्यास पुढील त्रास सोसावा लागणार नाही. मोठ्या
भावंडांबरोबर असलेले तात्विक मतभेद मिटवण्याचा प्रयत्न करा. वयस्कर मंडळीना सांधेदुखीचा त्रास होईल.

मकर :–तुमच्याकडून झालेली चूक खुल्या मनाने स्विकारून पुन्हा होणार नसल्याची खात्री द्यावी लागेल.
कोणत्याही प्रकरणाच्या वादविवादात न पडता विषय शांततेने मिटवण्याचा प्रयत्न करा.

कुंभ :–नोकरीच्या ठिकाणी नवीन आव्हानाला सामोरे जावे लागेल. स्वत:च्या जबाबदारीवर कराव्या लागणार्‍या
कामाला शंभर टक्के वेळ दिल्यास अवघड कामही तुमच्याकडून यशस्वी होईल.

मीन :–मनाच्या अचानक बदलणार्‍या वृत्तीसाठी तुमची तुम्हालाच मेहनत घ्यावी लागेल. वयोवृद्ध महिलांनी न
झेपणारया कामात सहभाग घेऊ नये. तरूणांना आपल्याच लपवलेल्या गोष्टींबाबत मानसिक त्रास होईल.

||शुभंभवतु ||

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *