daily horoscope

सोमवार 31 मे 2021 चे दैनिक राशीभविष्य

Read in
सोमवार 31 मे 2021 चे दैनिक राशीभविष्य

सोमवार 31 मे चंद्ररास मकर 27:58 पर्यंत व नंतर कुंभ.

चंद्रनक्षत्र श्रवण 16:01 पर्यंत व नंतर धनिष्ठा. वरील
दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05 :30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने
नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :–तुम्ही कार्य करत असलेल्या क्षेत्रात तुमची स्वत:ची ओळख निर्माण होईल. शासकीय कागदपत्रे
सांभाळण्याची जबाबदारी तुमच्यावर येईल. चोरीस गेलेल्या वस्तूंचा सुगावा लागेल. वर्कशाँप मधील कामात
निर्माण झालेला यांत्रिक अडथळा दूर करण्याचे श्रेय तुम्हाला मिळेल.

वृषभ :–आध्यात्मिक क्षेत्रातील मंडळीना सहाध्यायींचे चँलेंज स्विकारावे लागेल. कुटुंबात या सप्ताहात
घडणार्‍या गोष्टींबाबतचे तुम्हाला सूचक स्वप्न पडेल. वडीलांच्या जवळच्या मित्राच्या हट्टापायी त्याना
वडीलांना भेटण्यासाठी घरी आणावे लागेल.

मिथुन :–न्यायालयातील कर्मचार्‍यांनी आपल्या कामातील पारदर्शकता पाळावी. महिलांना असलेल्या क्राँनिक
वेदनादायी आजाराचा फारच त्रास होईल. महाविद्यालयातील प्राध्यापक मंडळीना इतरांना ट्रेनिंग देण्याची
जबाबदारी सोपवली जाईल.

कर्क :–शासकीय नियमांच्या अभ्यासातील तज्ञांवर प्रशिक्षणाची जबाबदारी सोपवण्यात येईल. सामाजिक
कार्यकर्त्याना आपल्या जबाबदारीतील कामावर चोख लक्ष द्यावे लागेल. पोलिस खात्यातील वरिष्ठ अधिकारी
वर्गास आपले अधिकार योग्य पद्धतीने विचारपूर्वक वापरावे लागतील.

सिंह :–आई वडीलांच्या गैरहजेरीत महत्वाचे निर्णय घेताना बुद्धीचा कस लागेल. घरातील मानापमानाच्या
प्रश्र्नांवर पडदा न टाकल्यास सहकारी वर्गाचेही सहकार्य मिळणार नाही.

कन्या :–बालसंगोपन केंद्रातील सेवाभावी ताईवर्गास फार मोठी जबाबदारी सांभाळावी लागेल. वृद्धाश्रमातील
स्वच्छतेचे काम करताना वृद्धांच्या सापडत नसलेल्या वस्तू सापडतील व त्याचा वृद्धांना अतिशय आनंद
होईल.

तूळ :–प्रसुतीच्या वेळी होणारा त्रास व दु:ख टाळण्यासाठी इतरांच्या सल्ल्याने अचानक निर्णय बदलू नका.
खेळाचे साहित्य व खेळणी बालसंगोपनगृहास तुमच्याकडून दिली जातील.

वृश्र्चिक :– ग्राफिक्स डिझायनिंग च्या तज्ञांना आँन लाईन प्रशिक्षण देता येणार आहे. पेंटींग्ज व चित्रकारांना
त्यांचे प्रदर्शन भरवता येणार आहे. महिलांना हस्तकला व शिवणकलेच्या क्षेक्त्रात नाविन्यपूर्ण काम करता
येणार आहे.

धनु :–शिल्पकलेतील तुमचे प्राविण्य शिल्पाच्या डोळ्यांच्या सौंदर्यावर वाखाणले जाईल. गायन विद्येचा तुमचा
सराव व अभ्यास तुमच्या गुरूजींच्या अपेक्षेप्रमाणे होईल. बँकेतील कर्मचार्‍यांना कस्टमरच्या प्रती असलेली
बेफिकीरी महागात पडेल.

मकर :–कुटुंबातील मतभेदांमुळे नात्यांमधे दुरावा निर्माण होणार आहे. वैचारिक संपर्षाला वैयक्तिक संबंधांवर
घेऊ नका. महिलांना स्वकष्टार्जित धनाचा वापर करावा लागेल. संततीच्या उच्चशिक्षणासाठीचे नियोजन
अचानक बदलावे लागेल.

कुंभ :–तुमच्या पुढाकाराने कुटुंबियांच्या वतीने गरजू संस्थांना व व्यक्तीना धान्याचा दानधर्म कराल. नाजूक
प्रकृतीच्या व्यक्तींना आहारातील बदलामुळे त्रास होईल. तरूणांना अभ्यासाच्या नावाखाली उनाडपणा करताना
पकडले जाईल.

मीन :–कुटुंबातील भावाभावातील कलह दूर होऊन एकोपा निर्माण करण्यात बहिणीचा मोठा वाटा असेल.
पतीपत्नीमधील वादावर पडदा पडून पुनर्मिलन होणार असल्याचे संकेत मिळतील. आईवडीलांचा आजचा दिवस
आनंदाचा व सुखाचा जाईल.

||शुभंभवतु ||

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *