daily horoscope

शनिवार 29 मे 2021 चे दैनिक राशीभविष्य

Read in
शनिवार 29 मे 2021 चे दैनिक राशीभविष्य

शनिवार 29 मे चंद्ररास धनु 23:39 पर्यंत व नंतर मकर. चंद्रनक्षत्र पूर्वाषाढा 18:03 पर्यंत व नंतर उत्तरा षाढा.

वरील दोन्ही राशी व नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती
पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

मेष :-– मित्रांच्या संगतीने त्यांच्या विचाराने वागल्याने आज तुमचा आत्मविश्वास कमी होणार आहे.
गुंतवणूकीतून आज चांगला लाभ होणार आहे पण नव्याने आज गुंतवणूक करू नका. मनातील विचारात सतत
बदल होतील.

वृषभ :--अध्यात्म मार्गातील मान्यवरांना उपासनेतून आनंद मिळेल. समवयस्काकडून नवीन कामाची आँफर
येईल. सामाजिक कार्यकर्त्यानी स्पर्धात्मक कामाच्या मागे लागू नये. मंदीराच्या जीर्णोद्धाराच्या कामासाठी
आर्थिक मदत द्याल.

मिथुन :–हाँस्पिटलमधे काम करणार्यानी शासनाचे आरोग्याचे नियम कडकपणे पाळावेत. कौटुंबिक सुखाच्या
बाबतीत तुमच्या विचारांना व इच्छांना आवर घालावा लागेल. महिलांना घरातील कामाला वेगळा वेळ द्यावा
लागेल तरच कामे होतील.

कर्क :–शिक्षणातील अडथळे दूर करण्यासाठी नियोजित कोर्सऐवजी वेगळ्या कोर्सचा विचार करा. आजारातून बरे
होणार्यांना देवाच्या चमत्काराचा अनुभव येईल. कुटुंबातील ज्येष्ठ मंडळींच्या विचाराने घरातील महत्वाचे प्रश्र्न
सोडवा.

सिंह :–संशोधन क्षेत्रात काम करणार्याना त्यांच्या कामाची शासन नोंद घेत असल्याचे कळेल. विम्याचे अडकून
पडलेले पैसे मिळण्याचा मेसेज येईल. पत्नीसाठी केलेली मौल्यवान खरेदी अचानक आलेल्या बहिणीला दिली
जाईल.

कन्या :–प्रकृती अस्वास्थ्यामूळे आज मानसिक ताण येईल. न्यायालयात पेडींग राहिलेल्या कामात अचानक
गती येईल. तुमच्या जोडीदाराचा स्वार्थी विचार तुम्हाला सहन करावा लागेल. घरातील बाथरूम मध्ये चालताना
काळजी घ्या.

तूळ :–लहान भावंडावर आलेल्या नोकरीतील संकटामुळे घरातील स्वास्थ्य बिघडेल. नोकरदार मुलांनी
व्यवसायात वडीलांना मदत करावी. कालचे शिल्लक राहिलेले काम आज तर अजिबात पूर्ण होणार नाही.

वृश्र्चिक :–बँकेतील थोड्या थोड्या साठवललेल्या पैशावर मित्रांचा डोळा राहील. कुटुंबात राहण्याची इच्छा
असूनही वैचारिक मतभेदांमुळे गावी जावे लागेल. जोडीदाराच्या अचानक निघालेल्या दुखण्यांवर उपाय
करण्यासाठी आँपरेशनसाठी अँडमिट करावे लागेल.

धनु :– नवीन घराचे कर्ज मजूर झाल्याचे कळेल व अखेर घराचा प्रश्र्न सुटेल. आईवडीलांच्या व्यवसायातून आज
तुम्हाला प्रतिष्ठा मिळेल. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मामाकडून चांगली मदत होईल.

मकर :–कर्ज देण्याघेण्याच्या व्यवहारातून तुमच्यावर गुन्हा दाखल होण्याचा धोका आहे. प्रवासाचा विचार करत
असाल तर आजच्या दिवशी प्रवासाचा हेतू साध्य होणार नाही. कुटुंबातील वातावरण नरम गरम राहील.

कुंभ :–पी. एच. डी. करणार्‍यांना योग्य मार्गदर्शन मिळून अभ्यासाला पण योग्य दिशा मिळेल. वाहतुक
कंपनीच्या सल्लागार मंडळावरील अधिकारी कायद्याच्या कचाट्यात अडकतील. जाहिरात क्षेत्रातील कामात
उल्लेखनीय कार्य कराल.

||शुभंभवतु ||

 

One thought on “शनिवार 29 मे 2021 चे दैनिक राशीभविष्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *