daily horoscope

शुक्रवार 28 मे 2021 चे दैनिक राशीभविष्य

astrologyRead in

शुक्रवार 28 मे 2021 चे दैनिक राशीभविष्य

शुक्रवार 28 मे चंद्ररास धनु दिवसरात्र व चंद्रनक्षत्र चंद्रनक्षत्र मूळ 20:02 पर्यंत व नंतर पूर्वाषाढा.

वरील दोन्ही
राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय
फलादेश देत आहे.
शुक्राचा मिथुन राशीत प्रवेश 23:59 ला होत आहे.
मेष :–आज तुमच्या जवळच्या ओळखीच्या व्यक्तीला देव्हारा आणून देण्याचे आश्वासन द्या. वडीलांच्या
इच्छेला मान देऊन त्यांच्या अध्यात्मिक गुरूंचा फोटो त्याना आणून द्याल.आजचा दिवस तुमच्यासाठी देवाची
कामे करण्याचा आहे.

वृषभ :–महिला असो वा पुरूष सर्वानाच सासुरवाडीकडून वारसा हक्कातील धन मिळणार असल्याची बातमी
कळेल. आँडिट विभागात काम करणार्‍यांना अचानक मोठ्या आर्थिक घोटाळ्याचा सुगावा लागेल.

मिथुन :–नातेवाईकांना दिलेले कर्ज परत मिळेल. वैवाहिक जोडीदाराच्या व्यापारी संस्थेतील तुमच्या वर
असलेली जबाबदारी अतिशय चोखपणे बजावाल. आज कुटुंबात सून मुलाबरोबर वैचारिक मतभेद होईल.

कर्क :–तरूणांच्या पायाची जखम चिघळत असेल तर त्वरीत डाँक्टरांकडे जा. नेहमी तुमच्याबरोबर प्रेमाने
वागणारे मित्र आज तुम्हाला अडचणीत आणतील व विश्र्वासाला तडा जाईल. चित्रकार मंडळींना त्यांच्या आँन
लाईन वर्गास चांगली दाद मिळेल.

सिंह :– गाण्याच्या क्षेत्रातील तज्ञांना सामाजिक पातळीवर काम करण्याचे आवाहन केले जाईल. शाळकरी
मुलांना स्पर्धात्मक परिक्षेत चांगले यश मिळेल. महिलांना त्यांच्या अध्यात्मिक प्रवासात नवीन अद्भूत
अनुभव येईल.

कन्या :–लहान लहान गोष्टींवरून आईच्या मताचा अनादर करू नका. गणिताच्या प्राध्यापकांना त्यांच्या
विद्यार्थ्यांकरता स्वत:च्या जबाबदारीवर नवीन पद्धती शिकवाव्या लागतील. वैयक्तिक लेवलवर मुलांचे प्रश्र्न
सोडवताना अडचणी निर्माण होतील.

तूळ :–मामाकडून मुलांसाठी आवडीच्या वस्तू घरपोच होतील. नोकरीत हाताखालच्या कर्मचार्यांकडे आवश्यक ते
सहकार्य मिळेल. कुटुंबात कुळाचाराच्या पूजा अर्चा करण्याचे ठरेल. बोलण्यातील वकीली स्पष्टपणा तुम्हाला
अडचणीत आणेल.

वृश्र्चिक :–कामगार संघटनेच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात मोठे काम कराल. घर व शेती खरेदीच्या चर्चेतून
कोणताही निष्कर्ष निघणार नाही. तरूणांना पिढीजात व्यवसाय सोडून नवीनच काम करण्याची इच्छा निर्माण
होईल.

धनु :–कोणत्याही प्रकारची लाँटरी किंवा शेअर्समधे पैसे गुंतवू नका. मित्रमंडळीमधे एखादी पैज लावाल तर
नक्कीच हारणार आहात. कोणत्याही निर्णयापर्यंत येताना वडील मंडळींचा सल्ला घ्या. आजपर्यंत करत
असलेल्या कामाव्यतिरीक्त नवीनच कार्य आज तुम्ही हातात घेणार आहात.

मकर :–बँकेच्या पासबुकातील आकडे पाहून मनाला आनंद होईल. घरगुती खाद्धपदार्थ्रांच्या उद्धोगातून एक
नवीन शाखा सुरू करण्याचे ठरवाल. आज तुमच्या बाबतीत कोणतीच गोष्ट नकारात्मक होणार नाही.

कुंभ :–आपल्याच माणसांविषयी राग निर्माण होणार्या घटना घडतील. शेजार्यां बरोबर कितीही मतभेद असले
तरी वादाचे प्रसंग टाळा. मनाविरुद्ध घडलेल्या गोष्टी मूळे मानसिक त्रास होईल.

मीन :–आज खाण्या पिण्यावरील बंधन कटाक्षाने पाळा. संततीच्या हट्टीपणासाठी मोठा खर्च करावा लागेल.
मानापमानाच्या भावना बाजूला ठेवून काम करावे लागेल. व्यवसायात आलेल्या अडचणींचा शांतपणाने विचार
करा.

||शुभंभवतु ||

 

One thought on “शुक्रवार 28 मे 2021 चे दैनिक राशीभविष्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *