daily horoscope

गुरूवार 27 मे 2021 चे दैनिक राशीभविष्य

Read in

गुरूवार 27 मे 2021 चे दैनिक राशीभविष्य

गुरूवार 27 मे चंद्ररास वृश्र्चिक 22:29 पर्यंत व नंतर धनु. चंद्रनक्षत्र ज्येष्ठा 22:29 पर्यंत व नंतर मूळ.

वरील
दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05.30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने
नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :– विमा एजंटचे काम करणार्‍यांना अचानक मोठ्या कामाचा ताण येईल. अचानक ओळखीच्या
व्यक्तीकडून न मागताही आर्थिक रक्कम मिळेल. आजचा दिवस कुटुंबात तुम्हाला प्रत्येकाची काळजी
वाढवणारा राहील.

वृषभ :–लहान भावाच्या मुलाच्या बाबतीत आनंदाची बातमी कळेल. मोठ्या भावाकडून गाडी घेण्याचा विचार
पक्का होईल. निवृत मंडळीना भविष्य निर्वाह निधीचे पैसे लवकरच मिळणार असल्याचा मेसेज येईल.

मिथुन :–दुसर्यांना वेळोवेळी केलेल्या मदतीतून त्यांच्या झालेल्या कामातील प्रगती बाबतचा निरोप येईल व
तुम्हाला आनंद होईल. दत्तक मुलीच्या विवाहाच्या सकारात्मक झालेल्या वाटाघाटी आज पुढे सरकणार आहेत.

कर्क :–कोरोना वाँरियर्सचे त्यांच्या मेहनती व झोकून देण्याच्या पद्धतीमुळे सगळीकडून कौतुक होईल. तरूणांना
आपल्या कामात कर्तृत्व दाखवता येणार आहे. घरातील सदस्यांना तुमच्याकडून आश्र्चर्य चकित करणार्‍या
घटना घडतील.

सिंह :–घरातील कटकटी कमी होण्यासाठी तुमचा घरातील सहभाग वाढवल्यास चांगला बदल होईल. बांधकाम
साहित्याच्या क्षेत्रातील मंडळींची थोडीफार उधारी वसूल होईल. घरातील फर्निचरची दुरूस्ती तातडीने करावी
लागेल.

कन्या :–तरूणांच्या शिक्षणात पडलेला खंड भरून काढता येणार असल्याचा मार्ग सापडेल. लहान मुलाना
झोपाळ्यावरून पडण्याचा धोका आहे. लहान भावंडाच्या प्रकृतीची चौकशी करा.

तूळ :–स्कष्टाने मिळवलेल्या पैशातून आईवडीलांना आनंद द्याल. विधवा महिलांना द्वितीय विवाहासाठी
विचारणा होईल तरी आवश्यक ती काळजी घ्या व सकारात्मक विचार करा.

वृश्र्चिक :–आज संपूर्ण दिवस तुम्ही इतरांच्या मदतीसाठी काम कराल . सेवाभावी संस्थेतील कर्मचार्‍यांना
त्यांच्या कामातून खूप आनंद मिळेल. तुमच्या कामाची व व्यक्तीमत्वाची इतरांवर छाप पडेल.

धनु :–आज सकाळपासून अचानक आळसाची भावना निर्माण होईल. आज कोणत्याही क्षेत्रात कसलीही
गुंतवणूक करताना तज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय करू नका. नोकरीत कामाचा ताण वाढल्याने वाढल्याने
ब्लडप्रेशरचा त्रास संभवतो.

मकर :–आजारी मंडळीना आजपासून एकदम बरे वाटू लागेल. आज तुमच्याकडून होणार्‍या सर्वच कामातून
तुम्हाला आनंद मिळेल व लाभही होणार आहे. तरी पूर्ण विचाराने कामे करा.

कुंभ :–आज काचेच्या वस्तू अतिशय काळजीपूर्वक हाताळाव्या लागतील. फिशटँकच्या जवळही जाऊ नका.
रस्त्यावरील विक्रेते किंवा फेरिवाले यांच्याकडून आज कोणतीही वस्तू घेऊ नका तुम्हाला फसवले जाणार आहे.

मीन :–पदव्युत्तर अभ्यासकांना आपला अभ्यास अतिशय योग्य मार्गाने चालल्याचे शिक्षकांकडून कळेल. दोन
मित्रामधील वाद, मतभेद यावरील तुमचा विचार मित्रांना पटणार नाही आज मध्यस्थी करू नका.

||शुभंभवतु ||

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *