Read in
बुधवार 26 मे 2021 चे दैनिक राशीभविष्य
बुधवार 26 मे चंद्ररास वृश्र्चिक दिवसरात्र व चंद्रनक्षत्र अनुराधा 25:15 पर्यंत व नंतर ज्येष्ठा.
वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05 :30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
आज वैशाख पौर्णिमा 16:44 पर्यंत व नंतर वैशाख कृष्ण पक्षाची प्रतिपदा सुरू होते. आज वैशाख स्नान समाप्ती होत आहे. आज कुर्मजयंती आहे.
आजची पौर्णिमा बुद्ध पौर्णिमा असल्याने या पौर्णिमेला जास्त महत्व प्राप्त झाले आहे
आज खग्रास चंद्रग्रहण असून ते फक्त ईशान्य भारतातून खंडग्रास दिसणार आहे. ग्रहणाविषयीची माहिती आपण दिनांक 20 मे च्या लेखात पाहिलीच आहे.
मेष :– परदेशात वस्तू पाठवूनच्या व्यवसायातील अडकून पडलेले पैसे सुटत असल्याचे दिसेल. महिलांना व लहानमुलांना युरिन इन्फेक्शनचा त्रास होईल. आज होणारी प्रसुती मात्र बिन त्रासाची व सुलभपणे होणार आहे.
वृषभ :–आज तुमच्या मनात सुरू असलेल्या व्यापार व्यवसायास मदत होणार्या घटना घडतील. उच्चशिक्षित मंडळीना परदेशातील मान सन्मान एखादा पुरस्कार जाहिर होणार असल्याचे कळेल. रखडलेल्या कोर्ट केसच्या कामात लक्ष घाला.
मिथुन :–ज्यांच्याकडे पाळीव प्राणी, पक्षी असतील त्यांनी प्राण्यांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी. बाहेरून आणलेल्या अन्नातून आज विषबाधा सारखे त्रास होण्याची शक्यता आहे. तरूण मुले मामाचा व्यवसाय पुढे सुरू करण्याचे विचार पक्के करतील.
कर्क :–नोकरीत अधिकारी वर्गाच्या हाताखालील कर्मचारी बदलले जाणार असल्याची बातमी कळेल. वयस्कर मंडळींची औषध ठेवण्याची जागा बदलू नका जीवघेणी गडबड होईल.
सिंह :–घरातील पाण्याच्या माठातील पाण्याची आज विशेष काळजी घ्यावी लागेल. प्रेमाच्या व्यवहारात सुरू असलेली नाराजी वाढू देऊ नका. लहान भावंडाचे व्यवसायात अडकलेले प्रश्र्न तुमच्या मदतीने मोकळे होतील.
कन्या :–तरूण मंडळीना अचानक खांदा अखडल्याचे जाणवेल. शाळकरी मुलांकडून आज जबरदस्तीने त्याचे कपाट आवरून घ्या पण आक्षेपार्ह वस्तू बघून सौम्यपणे कानउघाडणी करा. आज संगणकात बिघाड निर्माण होईल.
तूळ :–वयस्कर मंडळीना मोतिबिंदु, काचबिंदुचा त्रास वाढेल तरी उपाय करावा लागेल. मोठ्या भावाचे घराचे काम पूर्ण झाल्याचे कळेल. वडिलांचा आजार मोठे रूप धारण करेल तरी ताबडतोप डाँक्टरांचा सल्ला घ्या.
वृश्र्चिक :–लहान बहिणीच्या इच्छेसाठी आँन लाईन खरेदी कराल. वडीलांकडून तुमच्या सध्याच्या अडचणींवर आर्थिक मदत मिळेल. संततीच्या प्रतिक्षेतील आईवडीलांना आनंदाची बातमी कळेल.
धनु :–आई वडीलांकडून मुलांना इच्छापूर्तीचा आनंद मिळेल. व्यवसायातील अडचणीवर बँकेकडे मागितलेले कर्ज मंजूर होत असल्याचे कळवले जाईल. घरातील मुलाबाळांचे आईला आज चांगले सहकार्य मिळेल.
मकर :–जोडीदाराच्या व संततीच्या आज चांगल्या वैचारिक चर्चा होतील. दूरगावी असलेल्या मित्रांकडून पुढील शिक्षणाबाबतच्या चर्चा लाभदायक होतील.लहान मुलांच्या गुडघ्याला दुखापत होण्याची शक्यता आहे.
कुंभ :–मुलांच्या आजारपणावर चिंता निर्माण होईल. वडीलांकडून प्राप्त झालेल्या आर्थिक मदतीचा कसा वापर करावा हा मोठा प्रश्र्न सुटेल. घरात सर्वात ज्येष्ठ व्यक्तीकडून नाराजीचे सुर निघतील.
मीन :–ज्योतिषशास्त्र शिकणार्याना अभ्यासात चांगली प्रगती झाल्याचे जाणवेल. व्यवसायातील अडचणी दूर होऊन व्यवसाय मार्गी लागण्याचे संकेत मिळतील. अध्यात्मिक क्षेत्रात गुरूतुल्य व्यक्तीकडून मार्गदर्शन मिळेल
||शुभं–भवतु ||
Thank you Tai