Read in
मंगळवार 25 .मे 2021 चे दैनिक राशीभविष्य
मंगळवार 25 मे चंद्ररास तूळ 22:55.पर्यंत व नंतर वृश्चिक. चंद्र नक्षत्र स्वाती 07:05 पर्यंत व नंतर संपूर्ण दिवसभर विशाखा आहे.
वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05 :30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
आज नृसिंह जयंती आहे. रविचा रोहिणी नक्षत्रात 08:46 ला प्रवेश होत आहे.
मेष :– तुम्ही करत असलेल्या मदतीमुळे ज्यांनी व्यवसाय सुरू केला आहे त्यांना अनपेक्षित आज लाभ होईल. आजारी असलेल्यांनी स्वत:ची विशेष काळजी घ्यावी. आज रूढीबाह्य कोणतेही काम करू नका लोकांकडून. टिकेला पात्र व्हाल.
वृषभ :– शिजवलेले अन्न ठेवण्याच्या जागेच्या स्वच्छतेची महिलांना विशेष काळजी घ्यावी लागेल. तरूणांना पित्ताशयाचा त्रास संभवतो. घरातील नोकर चाकर यांना आर्थिक मदत द्यावी लागेल.
मिथुन. :–अध्यात्मिक मंडळीना त्यांच्या साधनेबाबत श्री गुरूमाऊलीकडून उपदेश मिळेल. तंत्र-मंत्राची साधना करणार्यांना उत्तम प्रकारे आकलन होईल. सरकारी कामातून मिळणारे उत्पन्न अचानक कमी होईल.
कर्क:–प्रेम प्रकरणात आई वडीलांकडून विरोध होईल. विवाहिताना संततीबाबतची अडचण अजूनही दूर होत नसल्याचे रिपोर्ट वरून कळेल. जोडीदाराच्या व्यवसायातील अडचणींवर तुमच्याकडून उपाय सुचवला जाईल.
सिंह :–रजिस्टर आँफीस मधील नोंदणी अधिकार्यांना अडचणीत सापडल्याचे जाणवेल. महत्वाच्या कामासाठी लहानशा प्रवास करावा लागेल. दळणवळणाच्या क्षेत्रातील मंडळीना कामाचे नवीन फंडे आजपासून वापरता येणार असल्याचे कळेल.
कन्या :–मुळातच टाँन्सिल्सचा त्रास असलेल्यांनी विशेष काळजी घ्यावी. आईच्या इच्छेकरीता नवीन घरात पूजेचे नियोजन कराल. संततीच्या नावावर असलेल्या व्यवसायात तुमचे अधिकार चालणार नाहीत.
तूळ :–मुलांच्या परदेशी शिक्षणाच्या प्लँनवर पाणी पडेल त्यामुळे घरातील वातावरण आनंदी राहणार नाही. पुरूषांच्या बोलण्याच्या पद्धतीमुळे व प्रेझेंटेशनच्या वेळी इतरांवर चांगली छाप पाडाल.
वृश्र्चिक :–दवाखान्यातून अजून चारदिवस तरी डिसचार्ज मिळणार नाही. टेक्निकलच्या क्षेत्रातील मंडळी स्वकर्तृत्वाने, जिद्धीने हातातील प्रोजेक्टवर काम करतील व काम पूर्ण होण्यापूर्वीच त्यांचे कौतुक होईल.
धनु :–विद्यार्थ्यांना त्यांच्या रखडलेल्या शिक्षणाच्या बाबतीत हहितचिंतकांकडून महत्वाचा सल्ला. मिळेल व प्रत्यक्ष मदतही मिळेल. तुमच्या नकळत तुमचे वडील एखादा त्यांना न झेपणारा पराक्रम करण्याचा विचार करतील.
मकर :–आज तुमचा काँन्फरन्स मधील सहभाग बघून सर्वांकडून प्रशंसा होईल. विभागीय अधिकारी नगरसेवक यांना लोक कोंडीत पकडतील व त्यांना जनतेच्या प्रश्र्नांना उत्तरे द्यावी लागतील.
कुंभ :–तुमचा विश्र्वास असो वा नसो तुम्हाला आज सूचक स्वप्नांचा पडताळा येईल. महाविद्यालय, विद्यापीठ येथील पदाधिकार्यांना नवीन निर्णयाच्या चर्चेत सामावून घेतले जाईल. कोर्टातील केसचा निवाडा तुमच्या बाजूने लागण्याचे संकेत मिळतील.
मीन :– अचानक धनलाभ होण्याचे संकेत मिळत असतानाच तांत्रिक अडचण निर्माण होईल.राजकीय मंडळींवर खोटे आरोप होऊन त्यांची अपकीर्ती होईल. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या विचारांवर, वागण्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे.
||शुभं–भवतु ||