Read in
सोमवार 24 मे 2021 चे दैनिक राशीभविष्य
सोमवार 24 मे चंद्ररास तूळ दिवसरात्र व चंद्रनक्षत्र चित्रा 09:49.पर्यंत व नंतर स्वाती.
वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05 :30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
आज प्रदोष असल्याने ज्यांचा प्रदोषाचा उपवास असतो त्यानी आज उपवास करावा.
मेष :–पाटबंधारे व पाणी खात्यातील मंडळीना अचानक कामाचा तणाव निर्माण होईल. आज वयस्कर मंडळीनी दुग्धजन्य पदार्थ खाऊ नयेत. आतड्याचा विकार असलेल्यांनी विशेष काळजी घ्यावी दुखणे अंगावर काढू नये.
वृषभ :–साथीच्या रागापासून आज व उद्या अगदी बारकाईने काळजी घ्या. बाहेर जाण्याचे टाळा व हाथ पाण्याने स्वच्छ धुवा. कँटरींगच्या क्षेत्रातील महिलांनी आपल्या व्यवसायात तडजोडची वृत्ती ठेवल्यास चांगला जम बसेल.
मिथुन. :–ज्यांना फुलझाडांची आवड आहे अशांना आज नवीन उद्धोगाची ओळख होईल. नोकरीच्या ठिकाणी आज तुमच्या बाँसचे वेगळेच सकारात्मक रूप अनुभवास येईल. कोणत्याही स्पर्धेत सहभागी होऊ नका.
कर्क :–गँरेजमधील कर्मचार्यांना आज एकदम किंमती विदेशी गाडीचे काम करण्याची संधी मिळेल. कुटुंबातील सर्वांचा हातभार लागून घराची स्वच्छता होईल. संततीकडून फार अपेक्षा ठेवू नका. आईच्या प्रकृतीची काळजी वाढणार आहे.
सिंह :–आज आँन लाईनच्या कार्यक्रमातून तुम्हाला लेखन कलेचे धडे मिळतील. लहान मुलांच्या आकलन शक्तीला चालना देणार्या घटना घडतील. ज्येष्ठांच्या स्वभावातील रागीटपणाला उसळून वर येईल.
कन्या :–विद्यार्थ्यांना त्यांच्या ग्रूपमधे त्यंच्या कल्पनाशक्तीचा उत्तम नमुना सादर करता येईल. सौंदर्यप्रसाधनाच्या घरगुती व्यवसायात महिलांना चांगली आर्थिक प्राप्ती होईल. मानसिक बळाच्या जोरावर व्यवसाय वाढवाल.
तूळ :–आज तुम्हाला स्वकष्टाने मिळवलेले धन दुसर्यास द्यावे लागणार आहे. लोखंडाशी संबंधित व्यवहार असलेल्यांनी आज खरेदी करू नका. कुटुंबातील महत्वाच्या प्रश्र्नाला वेळ द्यावा लागेल.
वृश्र्चिक :–पूर्वी केलेल्या गुंतवणूकीत अचानक तोटा झाल्याचे कळेल. राजकीय मंडळीनी कोणतीही फुशारकी मारू नये. निवडणूकीच्या ठिकाणी तुम्हाला लोक स्विकारणार नसून प्रतिस्पर्ध्याला यश मिळेल.
धनु :–विवाहाच्या कारणासाठी तुम्हाला लहानसा प्रवास करावा लागेल. अतिशय काळजीपूर्वक करावा. जी जमिन विकत आहात त्याचा व्यवहार ठरत असल्याचे संकेत मिळतील. गर्भवती महिलांचा जाणवत असलेला धोका दूर होईल.
मकर :–व्यवसायात भागिदारावर टाकलेली जबाबदारी त्याच्याकडून पाळली जाणार नाही. स्पर्धात्मक गोष्टीत मनातील इच्छेच्या बळावर बाजी माराल. प्रेमाच्या व्यवहारात अती अपेक्षा ठेवल्यामुळे वाद निर्माण होतील.
कुंभ :–व्यवसाय क्षेत्रात तुम्हाला अपेक्षित बदल करण्याची संधी मिळेल. नातेवाईकांकडून भरघोस सहकार्य मिळेल. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीचा वाढदिवस डिजीटल पद्धतीने साजरा कराल.
मीन :–तुमच्या बोलण्याचा अर्थ वेगळाच काढून राजकारणी लोक तुम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करतील. स्वेच्छानिवृतीच्या विचारात असाल तर नक्कीच फसाल. आज तुमची विचारांची दिशा चुकणार आहे हे दिवसभर लक्षांत ठेवा.
||शुभं–भवतु ||