Read in
रविवार 23 मे 2021 ते शनिवार 30 मे 2021 पर्यंतचे साप्ताहिक राशी भविष्य
रविवार 23 मे चंद्ररास कन्या 23 : 03 पर्यंत व नंतर तूळ. चंद्रनक्षत्र हस्त 12:11 पर्यंत व नंतर चित्रा.
सोमवार 24 मे चंद्ररास तूळ दिवसरात्र व चंद्रनक्षत्र चित्रा 09:49 पर्यंत व नंतर स्वाती 07:05 पर्यंत व नंतर विशाखा. मंगळवार 25 मे चंद्ररास तूळ 22:55 पर्यंत व नंतर वृश्चिक. चंद्र नक्षत्र विशाखा 28:10 पर्यंत व नंतर अनुराधा. बुधवार 26 मे चंद्ररास वृश्र्चिक दिवसरात्र व चंद्रनक्षत्र अनुराधा 25 :15 पर्यंत व नंतर ज्येष्ठा . गुरूवार 27 मे चंद्ररास वृश्र्चिक 22:29 पर्यंत व नंतर धनु. चंद्रनक्षत्र ज्येष्ठा 22:29 पर्यंत व नंतर मूळ. शुक्रवार 28 मे चंद्ररास धनु दिवसरात्र व चंद्रनक्षत्र मूळ 20:02 पर्यंत व नंतर पूर्वाषाढा. शनिवार 29 मे चंद्ररास धनु 23:39 पर्यंत व नंतर मकर. चंद्रनक्षत्र पूर्वाषाढा 18:03 पर्यंत व नंतर उत्तराषाढा.
सोमवार 24 मे सोमप्रदोष.
मंगळवार 25 मे श्री नृसिंह जयंती.
बुधवार 26 मे बुद्धपौर्णिमा.
शनिवार 29 मे संकष्टी चतुर्थी, चंद्रोदय 22:27 वाजता.
वरील प्रत्येक दिवसाच्या राशी व नक्षत्रांचा विचार करून व रोजच्या पहाटेच्या 05 :30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :– तुमच्या प्रथम संततीकडून त्याच्या नोकरीतील घडामोडीबाबतची आनंदाची बातमी कळेल. तुमच्या स्वत:च्या बाबतीत नोकरीतील वक्तशीरपणा बाबत तुमचे कौतुक होईल. कुटुंबात मामा, मावशीचे येणे होऊन नवीन व्यवसाय सुरू करण्याविषयी चर्चा होईल. सरकारी क्षेत्रात असणार्या अधिकारी वर्गाला आपल्या कामातील त्रुटींकडे लक्ष् द्यावे लागेल. तुमच्या आजूबाजूला असलेली व्यक्ती गुन्हेगारीमधे अडकलेली असण्याची दाट शक्यता आहे तरी जागरूक रहावे लागेल. भागिदारीच्या व्यवसायातील व्यावहारिक गैरसमजामुळे भागीदारी संपुष्टात येत असल्याचे दिसेल.
वृषभ :–आर्थिक व्यवहारात तुम्हाला ब्लँकमेल करत असल्याचे जाणवेल तरी त्यांच्या जाळ्यात न अडकता ताबडतोप मदत घ्या. कोणत्याही प्रकारच्या गुप्त गोष्टींसाठी तिसर्या व्यक्तीची मदत घेऊ नका. गुंता जास्त वाढेल हेल्थ इन्स्पेक्टरनी योग्य वेळी महत्वाच्या कामाला महत्व द्यावे. उत्पादनाच्या क्षेत्रातील कर्मचार्यांना नवीन काँन्ट्रक्टचा विचार करावा लागेल. विद्यार्थ्यांनी सध्या जरी शाळा सुरू नसल्या तरी आपल्या अभ्यासाकडे चांगले लक्ष द्यावे. स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्यांनी अभ्यासाचा जोर वाढवल्यास खात्रीने यश मिळेल.
मिथुन :– तुम्ही तुमच्या मेहनतीवर विश्र्वास ठेवून कामाला सुरूवात करा. कलाकार मंडळीनी आपल्या कामाचे नियोजन करून कलेला देण्याचा वेळ निश्चित करावा. तसेच आपल्या कार्यक्रमाचे आन लाईन ही प्रक्षेपण करता येणार आहे. राजकीय मंडळीनी महत्वाच्या विषयावर बोलताना आपली भूमिका स्पष्ट करावी. व्यसनापासून दूर राहण्यासाठी तुम्ही केलेला निश्चय कोणाच्याही आग्रहाखातर मोडू नका. कुटुंबातील प्रत्येकाचे मत घेऊनच नवीन प्रोजेक्टचा विचार करा. आजारातून बरे होणार्या मंडळीनी देवाचे आभार मानावेत. तरूणांची परमेश्र्वरावरील श्रद्धा वाढेल.
कर्क :– विद्यार्थ्यांनी आपली बौद्धिक पातळी वाढवण्यासाठी ज्येष्ठांचा, तज्ञांचा सल्ला घेऊन अभ्यासाचा सराव करावा. वाहन विक्रीच्या व्यवहारात कोणालाही शब्द देऊ नका. ठरलेला व्यवहारही अचानक बिघडणार आहे. दहा वर्षाच्या आतिल लहान मुलाना खिडकीतून, गँलेरीतून खाली पडण्या लागण्याचा धोका आहे. आयुर्वेदीक डाँक्टरांना त्याना मिळालेल्या यशाबद्दल एखादा मानाचा पुरस्कार मिळेल. तसेच त्यांना आँन लाईन माहिती देण्यासाठी समाजाकडून मोठ्या प्रमाणात विचारणा होईल. बौद्धीक क्षेत्रातील मंडळी त्यांच्या क्षेत्रात अतिशय व्यग्र राहतील.
सिंह :–आज तुमच्या स्वत:च्या मालकीच्या धनदौलतीमधून गरजवंताला मदत करण्याचा आदर्श इतरांना घालून द्याल. तुमच्या मित्रमंडळींच्या ग्रूपच्या माध्यमाचा वापर मदतीसाठी करण्याचे ठरवा. आपल्या गावातील स्वच्छतेच्या कामाची जबाबदारी उत्तम रितीने फार पाडाल. आओ लहान भावाला त्याच्या विचार करण्याच्या पद्धतीत तुम्हाला बदल करता येणार आहे. संततीकडून मिळणार्या समाधानाने आईवडीलांना आनंद होणार आहे. वडीलोपार्जित मालमत्तेवर भाऊबंदांकडून वाटणीसाठी विचारणा होईल. गर्भवती महिलांनी शारिरीक कष्ट करू नयेत.
कन्या :–लहान कुटुंबातील ज्येष्ठ मंडळींच्या विचाराने घरातील महत्वाचे प्रश्र्न सोडवले जातील. चुलत व मावस दोन्ही घरांकडील मंडळी एकत्र येऊन वेळ आनंदात घालवाल. महसूल विभागातील कर्मचार्यांना कामाचा अतिरिक्त ताण जाणवेल. व्यावसायिक क्षेत्रातील तुमचे अंदाज अचूक निघतील. ज्योतिष विषय शिकवणार्याना आपल्या अभ्यासातून व अनुभवातून नवीन थेरी मांडता येणार आहे. नोकरीत कामाच्या स्वरूपातील बदल आनंद देणारा व आवडणारा असेल.
तूळ :–मोठ्या हाँस्पिटलमधील डाँक्टर्सना पेशंटच्या गुंतागुंतीच्या केसचा तणाव जाणवेल. दुसर्यांसाठी खर्च करण्याच्या तुमच्या सवयीला तुम्हाला थोडे बंधन घालावे लागेल अन्यथा खरोखरच मोठा आर्थिक भार पडेल. तरूण मंडळीना मानसशास्त्राच्या डाँक्टरांकडे जाणे हिताचे ठरेल. शाळकरी मुलांनी बोलण्याची कला आत्मसात करण्यासाठी तज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे. या सप्ताहात तुम्हाला न मागताही तुमच्या इच्छा पूर्ण करणार्या घटना घडतील. स्वकर्तृत्वावर विश्र्वास ठेवून निर्णय घ्या. लांबच्या व्यवहारांवर विसंबून राहू नका..
वृश्र्चिक :–हातातील कामात जरी यश दिसत नसले तरी आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका. घरातील नात्यात वैचारिक संघर्ष होऊन मनात कटुता निर्माण होणार्या घटना घडतील. राजकीय संकटाचा विचार करून कोणत्याच गुंतागुंतीच्या कामात अडकू नका. कोणत्याही प्रकारची आँन लाईन खरेदी करताना घाई करू नका. सत्तेसाठीच्या संघर्षात तुमच्या हाताला काहीही लागणार नाही तरी या सप्ताहात कोणतेही प्रयत्न करू नका. अध्यात्मिक साधनेत अनेक प्रकारच्या अडचणी निर्माण होतील.
धनु :–बर्याच दिवसापासून अडकलेले काम उच्चपदस्थांच्या ओळखीने करून घ्या. महिलांना त्यांच्या व्यक्तिगत जीवनातील प्रश्र्न सोडवण्यासाठी आईवडीलांबरोबरची चर्चा फलद्रूप होईल. महिलांना आपल्या आवडत्या छंदाबाबत यू ट्युबच्या माध्यामातून एखादा कार्यक्रम करता येणार आहे व वेबिनारच्या माध्यमातूनही लोकांबरोबर संवाद साधता येणार आहे. खाजगी नोकरीतील आर्थिक अधिकार असलेल्या पदाधिकार्यांना एखाद्या चौकशीला सामोरे जावे लागेल. नोकरी व व्यवसाय दोन्हीही करणार्यांना नोकरीच्या ठिकाणी अडचणी निर्माण झाल्याने त्रास होईल.
मकर :–परमेश्र्वरावर श्रद्धा असलेल्यांना इश्र्वरी शक्तीचा अनुभव येईल. उपवास व उपासना यातील भेद समजल्याने तुम्ही स्वत: इतरांच्या विचारात बदल करण्याचा प्रयत्न कराल. श्री गजाननाच्या कृपेने आयुष्याला वेगळे वळण मिळणार असल्याचे संकेत मिळतील. न्यायालयातील कर्मचार्यांनी वरिष्ठांना विचारल्याशिवाय वकीलांबरोबर किंवा अशिलांबरोबर कोणताही संवाद साधू नये. मोठ्या भावाच्या मदतीने व्यवसायाच्या लायसन्स मधील एक टप्पा यशस्वीपणे पार पाडाल. कौटुंबिक खर्चाचे प्रमाण वाढल्याने आर्थिक चिंता वाढेल. विवाहेच्छुनी मुले आपल्या विवाहाबाबतच्या कांही वेगळ्याच कल्पना व्यक्त करतील.
कुंभ :– आय. टी. क्षेत्रातील उच्चशिक्षित मुलांना अनेक अडचणींना तोंड ध्यावे लागेल. परगावी राहिलेल्या, आईवडीलां पासून लांब राहणार्याना आईवडीलांच्या प्रकृतीच्या गरजेसाठी येता येणार नाही. मधुमेहीनी आपल्या आहारावर नियंत्रण ठेवून व व्यायाम करून शुगर वाढू न देण्याची काळजी घ्यावी. या सप्ताहात तुमच्या आरोग्याच्या तक्रारी उद्भवतील. महिलांना पाठदुखी, मानदुखी व स्पाँडीलायसेसचा त्रास होईल. महाविद्यालयातील प्राध्यापक मंडळीना इतरांना ट्रेनिंग देण्याची सोपवलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी लागेल.
मीन :–नोकरीच्या ठिकाणी तुमच्या तापट स्वभावामुळे वरिष्ठां बरोबर वाद निर्माण होईल. काहीही झाले तरी नोकरीत शांत राहण्याचा प्रयत्न करा. निवृतीला आलेल्या कर्मचार्यांनी अनवधानानेही कोणत्याही नियमाचे उल्लंघन होत नसल्याची खातरजमा करावी. वारसा हक्काच्या मालमत्तेबाबत सख्ख्या भावंडामधील चर्चा फलद्रूप होणार नाही उलट वाद होऊन दुरावा निर्माण होईल. भागिदाराच्या सहाय्याने परिस्थितीत बदल करू शकणार आहात. बर्याच वर्षानंतर जून्या मित्राची भेट होईल व त्यातही त्याची परिस्थिती जाणून घेतल्यावर भावनिक व्हाल. आईच्या माहेरकडील माहिती मिळेल.
||शुभं-भवतु ||