daily horoscope

शनिवार 22 मे 2021 चे दैनिक राशीभविष्य

Read in

शनिवार 22  मे 2021 चे दैनिक राशीभविष्य

शनिवार 22  मे चंद्ररास कन्या दिवसरात्र व चंद्र नक्षत्र उत्तरा फाल्गुनी 14:05  पर्यंत व नंतर हस्त.

वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05 :30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

आज मोहिनी स्मार्त एकादशी आहे.

मेष :–मनातील विचारात एकवाक्यता न झाल्याने कोणतेच काम आज मार्गी लागणार आही. व्यावसायिक कामात होणारा बिघाड हा तुम्हीच केलेल्या कामातील घाई मुळे किंवा पूर्ण विचाराने न केल्याने असेल हे लक्षांत घ्या.

 

वृषभ :–राजकीय मंडळींच्या न्यायप्रविष्ट असलेल्या कामात अचानक स्फोटक गोष्टी घडतील. आज कोठेही बाहेरच्या प्रवासाचे ठरवू नका. कुटुंबात वादग्रस्त विषयावरील चर्चेने मानसिक शांतता बिघडेल.

 

मिथुन :–आईच्या आशिर्वादाने जमिनीचे व शेतीबाबतचे अडकलेले काम मार्गी लागेल व त्याबाबतचा निरोप मिळेल. महिलांना मनाविरुद्ध झालेल्या घटनांमुळे आलेला राग आवरणार नाही. आज्जीची नातवंडांची खाणे करण्याकरीता आज फारच धावपळ होईल.

 

कर्क :–हाँस्पिटलमधे अँडमिट असलेल्यांना  अजून आराम पडायला ३ ते ४ दिवस लागणार आहेत. नोकरीतील तुमच्या वरिष्ठांकडून तुमच्याबरोबर उत्तम प्रकारचे सहकार्य मिळेल. कुळाचाराच्या पूजेसाठी दिवस निश्चित कराल.

 

सिंह :–पुरूषांना पत्नीच्या सहकार्याने व्यवसायातील भांडवलाचा प्रश्र्न सोडवता येईल. वकीलांना अशिलाच्या केसमधील सूचक प्रश्र्नांचा उपयोग होणार असल्याने अशिलांनी वकीलांना चांगले सहकार्य करावे.

 

कन्या :–जास्त वजनाच्या मंडळीना आता विचार करण्याची वेळ आलेली आहे. ज्यांना मधुमेह आहे त्यांनी कोरोना बाबत अतिशय जागरूक रहावे. नोकरीत अचानक कानावर आलेल्या अफवांवर विश्र्वास ठेवू नये.

 

तूळ :–औषधाच्या दुकानदारांना नियमबाह्य काम केल्याबद्धल दंड भरावा लागेल. सरकारी क्षेत्रातील उच्चपदाधिकार्यांना गुंतागुंतीची केस हाताळताना झालेल्या चुकीमुळे नोकरीवर गदा येण्याची शक्यता आहे.

 

वृश्र्चिक :–आईच्या प्रकृतीसाठी जागेपणी वा स्वप्नात मिळालेल्या सूचनेचे पालन करा. श्री दत्तमहाराजांच्या कृपेने तुमच्यावर आलेल्या संकटातून मुक्ती होण्यासाठी श्री दत्त महाराजांची उपासना करावी.

 

धनु :–विवाहित स्त्रीयांना संसारात आज तुमच्या मताला काहीच किंमत मिळणार नाही आहे. आपलेच म्हणणे पुढे दामटवू नका. किडनीचा त्रास असलेल्यांनी डाँक्टरांचा सल्ल्याकडे जराही दुर्लक्ष करू नये.

 

मकर :–अती व्यवहारी विचारांने वागल्यामुळे आज तुम्ही जवळचे नाते गमावून बसाल. आई, मावशी यांच्याबरोबरच तात्विक वाद वाढेल व मानसिक नाराजी येईल. लहान भावंडाबरोबर प्रेमळ संवाद होईल.

 

कुंभ :–आज महत्वाची कागदपत्रे सांभाळावी लागतील. अगदी काँम्प्युटरमधील फाईलही करप्ट किंवा डिलीट होण्याचा प्रसंग येईल. महत्वाची  केलेली खरेदी अपेक्षित आनंद देणार नाही.

 

मीन:– आज सकाळ होऊनही झोपेचा अंमल जास्तच राहील. ज्येष्ठांनी, निद्रानाशाचा त्रास असलेल्यांनी मनाने झोपेच्या गोळ्या घेऊ नयेत. आज अचानक आजोळकडील मंडळींचा सहवास मिळेल व आनंद वाटेल.

||शुभंभवतु ||

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *