daily horoscope

शुक्रवार 21 मे 2021 चे दैनिक राशीभविष्य

Read in

शुक्रवार  21  मे 2021 चे दैनिक राशीभविष्य

चंद्ररास सिंह  21: 06  पर्यंत व नंतर कन्या. चंद्रनक्षत्र पूर्वा फाल्गुनी 15:21  पर्यंत व नंतर उत्तरा फाल्गुनी. 

वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05 :30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

मेष :– न्यायालयात  बर्याच वर्षापासून पेडींग असलेल्या कामात अचानक विचीत्र गोष्टी घडतील. सर्व निर्णय आपले आपणच निर्णय घेण्याच्या सवयीमुळे आज हातात घ्याल त्या कामात अडचणी निर्माण होतील.

वृषभ :–तुम्ही मनापासून ठरवलेल्या गोष्टींवर जोडीदाराकडून विरजण पडेल व कामातील उत्साह कमी होईल. विद्यार्थ्यांना आपले ध्येय गाठण्यासाठी तज्ञांचे मार्गदर्शन घ्यावे लागेल. वडील व गुरूजनवयांजकडून मनासारखी साथ मिळेल.

मिथुन. :–कामातील तुमचा उत्साह बघून सगेसोयरे, मित्रमंडळी सगळेच अचंबित होतील. विद्यार्थ्यांना, नोकरदारांना ज्या महत्त्वाकांक्षेने पछाडले आहे त्याच दिशेने प्रयत्न सुरू होतील. नवविवाहितांना एकमेकांविषयी आश्वासक वाटू लागेल.

कर्क :–तरूणांना अचानक डोकेदुखीचा त्रास सुरू होईल.   राजकीय क्षेत्रातील  मंडळीना स्वत:चा हेका  चालवता येणार आहे. दवाखान्याच्या  मदतीसाठी शेजार्‍यांची मदत घ्यावी लागेल. वयोवृद्ध मंडळीना  हवेतील उष्णतेचा त्रास होईल.

सिंह :–   अगदी जवळच्या असलेल्या मित्रमैत्रिणींच्या बरोबर तुमच्या अडमुठ्या विचाराने वाद निर्माण होईल. व आयात सरकारी नियमामधे अडकलेली कामे करताना महिला अधिकारी व्यक्तीची मदत होईल.

कन्या :–राजकीय अधिकारी व्यक्तीबरोबर घातलेला वाद चांगलाच महागात पडणार आहे. मुलीच्या वडीलांचे व मुलीच्या सासुबाई बरोबर मतभेद वाढून वाद निर्माण होईल. मुलाच्या आजारपणावर योग्य उपाय मिळेल.

तूळ :–न्यायालयातील लढाईत तुम्हाला दंड भरावा लागणार आहे. आज अचानक उत्साहात वाढ होऊन कामातील ढिलेपणा काढण्याचा प्रयत्न कराल. आज व्यवसायात नव्याने गुंतवण्यात येणार्या रकमेसाठी आजचा दिवस थांबून मग निर्णय घ्या.

वृश्र्चिक :–आजचा दिवस आर्थिक नुकसानीचा असल्याने कोणतीही खर्चाची कामे काढू नका. पतीपत्नीच्या  चर्चेत किंवा कोणत्याही वादात तिसर्‍याला हस्तक्षेप करू देऊ नका. घरातील अंतर्गत व्यवहारास अचानक तोंड फुटेल.

धनु :–प्रेमविवाहाच्या ठरलेल्या कार्यक्रमात अचानक अडथळा निर्माण होईल. द्वितीय संततीला पडून धडपडून एखादी दुखापत होण्याचा धोका आहे. तरूण मुलांचा आज लहरीपणा व आडमुठेपणामधे वाढ होईल.

मकर :–लहान मुलांना उन्हाळे लागण्याचा त्रास होईल तर वयस्करांना युरीन इन्फेक्शनचा त्रास संभवतो. प्रेमाच्या व्यवहारातील वाद जवळच्या मित्रमैत्रिणीमुळे आटोक्यात येईल. शाळकरी मुलांना शब्दकोडे सोडवण्याची टँक्ट सापडेल.

कुंभ :–गर्भवती व दिवस भरलेल्या महिलांनी जराही धावपळ करू नये आज फक्त आरामच करावा. कुटुंबात आज प्रत्येक गोष्टीत महिलांचे वर्चस्व चालेल. पार्किंग सणाचा त्रास असलेल्यांनी प्रकृतीस जपावे.

मीन :–नोकरीतील जे वाढीव किंवा मागचे राहिलेले जे पैसे मिळणार होते ते कांही प्रमाणात मिळतील. वार्ताहर व संपादकांना आक्षेपार्ह बातमी बद्धल सरकारी नोटीस येईल. एकट्या पत्नीच्या व्यवसायातून मोठा आर्थिक लाभ होईल.

||शुभंभवतु ||

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *