daily horoscope

गुरूवार 20 मे 2021 चे दैनिक राशीभविष्य

Read in

गुरूवार 20  मे 2021 चे दैनिक राशीभविष्य

गुरूवार 20. मे चंद्ररास सिंह दिवसरात्र व चंद्रनक्षत्र मघा 15:56.पर्यंत व नंतर पूर्वा फाल्गुनी. 

वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05 :30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

मेष :–बालसंगोपन केंद्र, व वृद्धाश्रमाच्या व्यवस्थापकांना सेवावृत्तीने काम करणार्‍या तरूणांची आपणहून मदत मिळेल. शेजारपाजार कडून आलेल्या कोणत्याही अफवांवर विश्र्वास ठेवू नका.

वृषभ :–रक्ताभिसरणातील क्रिटीकल बाबी वेळेवर लक्षात आल्यामुळे वयस्करांना वेळेवर व योग्य इलाज मिळेल. या राशीच्या मृगशीर्ष नक्षत्राच्या पेशंट्सना एका हाँस्पिटलमधून दुसर्या हाँस्पिटलमधे हलवावे लागेल.

मिथुन :–लहान मुले घरातल्या घरात सायकलवरून पडतील व दुखापत होईल. वयस्कर मंडळीना पायांच्या बोटातील संवेदना कमी होत असल्याचे जाणवेल.

कर्क :–गुंतवणूकीतून झालेल्या दिवाळखोरीवर नातेवाईकांच्या मदतीने बाहेर पडण्याचा मार्ग सापडेल. पत्नीच्या बोलण्यामुळे झालेल्या वादाचे रूपांतर पोलिस स्टेशन पर्यंत जाणार आहे तरी सावध रहा.

सिंह :–शेअर्स, म्युच्युअल फंड्स मधून चांगला धनलाभ होणार आहे. वयस्करांना आज खेळत्या हवेत बसवल्यास त्याच्या मानसिकतेत खूपच फरक पडेल व आजारपणाची जाणिवही होणार नाही.

कन्या :–आज तुमच्या आजारपणातील धोके टाळत असताना नव्याने दुसरीच गुंतागुंत निर्माण होईल. घरातील पाहुण्या व्यक्तीची देवासारखी मदत होईल.  अहंपणा टाकून श्री दत्त महाराजाना शरण जावे.

तूळ :–उच्चशिक्षित झालेल्याना आपला भाग्योदय होत असल्याचे जाणवेल. पूजा प्रार्थना करणार्यांना आपले गार्हाणे देवापर्यंत पोहोचल्याचा आनंद मिळेल. वडिलांच्या प्रकृतीची विशेष काळजी घ्यावी लागेल.

वृश्र्चिक :–नोकरीतील कोणत्याही गुप्त कारवाईत सामिल होऊ नका  त्याचा परिणाम चांगला होणार नाही. वडीलांकडील आर्थिक मदतीवर व्यवसाय सांभाळण्याचे काम करावे लागेल.

धनु :–व्यवसायातून जूनी आर्थिक येणी येतील.पोलीस खात्यातील कर्मचार्‍यांना अचानक धावपळ करावी लागेल. स्पर्धा परिक्षा लांबणीवर गेल्यामुळे मुले झटून अभ्यासाला लागतील. नोकरीतील प्रमोशनचे वायदे फोल निघत असल्याचे जाणवेल.

मकर :–व्यवसायिक कामासाठी बिल्डरांनी मागितलेले कर्ज मंजूर होत असल्याचे जाणवेल. महत्वाच्या कागदपत्रांतील मजकूर समजून घेऊनच सह्या कराव्यात. आज आईच्या आशिर्वादाची किंमत कळेल.

कुंभ :–महिलांनी, पुरूषांनी ओल्या फरशीवरून चालताना काळजीपूर्वक चालावे. पाठीच्या कण्याला दुखापत होण्याचा धोका आहे. अध्यात्मिक अभ्यासात असलेल्याना अध्यात्मिक गुरूकडून मोलाचा उपदेश मिळेल पण त्याचा अर्थ समजून घ्यावा लागेल. 

मीन :–आज तरूणांना घसा दुखीचा त्रास जाणवेल तरी काळजी घ्यावी. किडनी स्टोन असलेल्यांनी आता तपासणी करण्याची गरज आहे. शेतातील किंवा घराची एखादी कच्ची किंवा पडायला आलेली भिंत पडण्याचा धोका आहे. 

||शुभंभवतु ||

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *