daily horoscope

बुधवार 19 मे 2021 चे दैनिक राशीभविष्य

Read in

बुधवार 19  मे 2021 चे दैनिक राशीभविष्य

बुधवार 19 मे चंद्ररास कर्क  15:47  पर्यंत व नंतर सिंह. चंद्रनक्षत्र आश्लेषा 15:47  पर्यंत व नंतर मघा. 

वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05 :30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

मेष :–. घरातून आँफिसचे काम करत असाल तर आज इलेक्ट्रिसिटी, किंवा नेटवर्कचा प्राँब्लेम होणार आहे. उत्पादन क्षेत्रात विजेच्या प्राँब्लेम मुळे उत्पादन थांबवावे लागेल. आईच्या माहेरकडील मंडळीना दवाखान्याच्या कामात मदत करावी लागेल. 

वृषभ :– स्वत:च्या आनंदापेक्षा दुसर्‍याच्या आनंदाला  प्राधान्य देऊन त्याच्यासाठी कराल. पगारातील पैशाची मोठी रक्कम सार्वजनिक कामासाठी द्याल व इतरांपूढे आदर्श निर्माण कराल. वयस्कर मंडळीना त्यांच्या मुलांकडून आनंददायक घटना कळतील. 

मिथुन :–आजचा दिवस इतका धावपळीत जाईल की तुम्हाला जेवायलाही वेळ मिळणार नाही. महिलांना आपल्या चेहर्याचे सौंदर्य वाढवण्याची इच्छा होईल. महिलांना मासिक धर्माचा किंवा मोनोपाँजचा त्रास होईल तरी आवश्यक ती काळजी घ्यावी. 

कर्क :–मनातील  विचारांची बैठक पक्की होणार नाही उगाच मनाची  चलबिचलता वाढेल. आजारी व्यक्तीनी मला कांही होत नाहीच मंत्र सोडून डाँक्टरांचा सल्ला घ्यावा. वडीलांच्या जवळच्या मित्राच्या आजारपणासाठी  वडीलांच्या समाधानासाठी मदत कराल. 

सिंह :–कोर्टातील केसमधे दुसर्यांवर टाकलेल्या आरोपांविषयी बोलताना तुमची अर्जूनासारखी परिस्थिती होईल. राजकीय क्षेत्रात आज  तुम्हाला महत्व प्राप्त होईल. सरकारी नोकरदारांनी आपल्यावर असलेली जबाबदारी पार पाडताना अतिशय पारदर्शकता बाळगावी. 

कन्या :–प्रवास करणार असलात तर ऐन वेळेला वाहन दगा देणार आहे हे  लक्षात घ्या. वयस्कर मंडळींचे आज शेजार्यांबरोबरचे चांगले पटेल मनातील सूप्त राग डोके वर काढणार नाही. व्यवसायातून होणारा धनलाभ तुम्हाला अचंबित करेल. 

तूळ :–. सध्या सुरू असलेला उद्धोग बदलून दुसरा नवीन करावासा वाटेल. विशेष म्हणजे आज तुमचे  व सासूबाईंचे अगदी गुळपिठ जमेल. सध्या स्कीनचा होणारा त्रास हा काही काळापुरता आहे त्यामुळे फार काळजी करू नका व अती औषधांचा मारा पण करू नका. 

वृश्र्चिक :–तुमचे व वडीलांचे बिघडलेले संबंध सुरळीत करण्यासाठी उत्तम संधी आहे तरी संधीचा फायदा घ्या. तरूणांना पोट बिघडण्याचा त्रास होईल पण याला लहानशी तक्रार समजून दुर्लक्ष करू का. पुरूषांना किडन३बाबतची तक्रारदुरूस्त होत असल्याचे जाणवेल. 

धनु :–आज कोणत्याही परिस्थितीत सलून, पार्लर संबंधित कोणतेही काम करू नका. काम बिघडून सारखे होणार नाही. बँकेच्या कर्ज वसुली विभागाला चांगले समजवू शकाल व तुम्हाला वाढीव वेळ देण्याचा विचार करतील. 

मकर :– नोकरीत निर्माण झालेली अडचण आता तुम्हाला दूर करता येणार आहे. नोकरी सोडण्याचा  विचार करू का. संतती सौख्याच्या बाबतीत आपण इतरांपेक्षा खूपच सुखी असल्याचे जाणवेल. कुटुंबात आईला भेटण्यासाठी म्हणून सर्व भावंडे एकत्र येणर आहेत. 

कुंभ :– प्रेम विवाहाच्या सकारात्मक झालेल्या  वाटाघाटी अचानक व्यसन या विषयावर अडतील. गायन कलेतील तज्ञांना  आँन लाईन खूप चांगला प्रतिसाद  मिळेल. आपले प्राँडक्टस् विकण्यासाठी तुमचे नवनवीन फंडे लाभदायक ठरल्याचे जाणवेल. 

मीन :–संततीच्या शिक्षणाच्या विषयावर तुमचे मन दोलायमान होईल. तुमच्या उजव्या पायाची काळजी आज तुम्हाला घ्यावी लागेल. गुडघा सांभाळा. मदतीला तुमच्याकडे आलेल्या वक्तीला त्याचे पूर्ण समाधान करून पाठवाल. संततीच्या आवश्यक गरजा भागवताना मोठा खर्च निघेल. 

||शुभंभवतु ||

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *