Read in
मंगळवार 18 मे 2021 चे दैनिक राशीभविष्य
मंगळवार 18 मे चंद्ररास कर्क दिवसरात्र व चंद्रनक्षत्र पुष्य 14:54 पर्यंत व नंतर आश्लेषा.
वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05 :30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :–वडिलांच्या प्रतिष्ठेचा विचार करून हाती घेतलेल्या कामातील घडणार्या घडामोडींवर लक्ष द्यावे लागेल. रेंगाळलेल्या, अडकलेल्या चर्चांना नव्याने भरते येऊन पुन:तेच विषय सुरू होतील. कुटुंबात एकत्र बसून सहविचाराने निर्णय घ्या.
वृषभ :–तुम्हाला शाळकरी मुलांकडून वेगवेगळ्या विषयावरचे संवाद लिहून घेता येणार आहेत. व्यवसायातील घडामोडींवर लक्ष केंद्रित करताना कुटुंबाकडे दुर्लक्ष कमी होऊ देऊ नका. अचानक नोकरीतील पेंडिंग अमाऊंट लवकरच मिळणार असल्याचे कळेल.
मिथुन:–स्पष्ट व परखड न बोलल्याने आज चुकीच्या कामासाठी तुम्हाला जबाबदार धरण्यात येईल. सामाजिक कार्याशी जोडल्या गेलेल्यांना आज कामात बिलकुल रस वाटणार नाही. कुटुंबात अचानक चिडचिड निर्माण होईल.
कर्क :–ज्या कामाची आवड आहे आज अगदी तेच काम करायला मिळणार आहे. लेखकांना व वक्त्यांना आवडत्या विषयावर व्यक्त होण्याची संधी मिळणार आहे. कोणत्याही कारणाने मनातील विचारांना मोकळी वाट करण्याची संधी मिळेल.
सिंह :–राजकीय मंडळीना उघडपणे गुप्तशत्रूंचा त्रास होईल. पुरूषाना सासुरवाडीकडील ज्येष्ठ मंडळींच्या प्रकृती बाबतची माहिती मानसिक ताण वाढवेल.कुटुंबात वाढदिवसानिमित्त मित्रमंडळींची येणे होईल.
कन्या :–आजचा दिवस अतिशय लाभदायक आहे. जून्या गुंतवणूकीतून चांगला लाभ होणार आहे. शेजार्यांच्या मदतीने घरातील किराणा भरण्याचे बेत ठरतील. वयस्कर मंडळीनी डोळ्यांची काळजी घ्यावी.
तूळ :–बर्याच दिवसापासूनच्या आजारावर वैद्धबुवांच्या औषधाचा चांगला उपयोग झाल्याचे जाणवेल. श्री गजाननाच्या कृपेने आजच्या महत्वाच्या चर्चेतून तरूणांच्या आयुष्याला नवीन वळण लागेल.
वृश्र्चिक :– ज्यांच्या वंशवृद्धीमधे अडचणी येत आहेत त्यानी कोणतेही इतर उपाय न करता डाँक्टरांच्या सल्ल्याचा आदर करावा. बँकेच्या कर्जाचे प्रकरण निकालात निघणार असल्याचे कळेल. घरातील आज्जी आजोबांचा सल्ला महत्वाचा ठरेल.
धनु :–तुम्हाला सर्व प्रकारच्या कर्जातून मुक्त होण्याची तीव्र इच्छा होईल. दुसर्यांच्या सांगण्यावरून कोणतेही निर्णय घेऊ नका. डाँक्टर व सर्जन मंडळीना पेशंटला अचानक अवघड परिस्थितीतून बाहेर काढताना मानसिक ताण येईल.
मकर :–कोणत्याही आजारावर डाँक्टरांकडून परफेक्ट व वेळेत सल्ला मिळाल्यामुळे मोठा धोका टळणार आहे. नवीन भाडेकरूंच्या शोधात असलेल्यांना तुमच्या इच्छेनुसार भाडेकरू मिळेल.
कुंभ :–व्यवसायातील अडचणींवर अचानक मात करता येणारा मार्ग वडील बंधुकडून सुचवला जाईल. कलाकार मंडळींचे मनोधैर्य वाढून तुमच्याकडून सामाजिक विषयांना तोंड फोडणाऱ्या विषयावर कला सादर केली जाईल.
मीन:– आजोळकडील नात्याच्या मदतीने न्यायालयातील अडकलेल्या कामावर उपाय सापडेल. लहान मुलांच्या पायाला मोठी दुखापत होण्याचा धोका आहे. वयस्कर मंडळीनी आज बाहेर जाऊ नये.
||शुभं–भवतु ||
Dhanyawad Tai