Read in
सोमवार 17 मे 2021 चे दैनिक राशीभविष्य
सोमवार 17 मे चंद्ररास मिथुन 06:52 पर्यंत व नंतर कर्क. चंद्रनक्षत्र पुनर्वसु 13:20 पर्यंत व नंतर पुष्य.
वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05 :30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :– विद्यार्थ्यांना त्यांच्या रखडलेल्या शिक्षणाच्या बाबतीत नव्याने घेतलेला निर्णय फायदेशीर असल्याचे मुलांना पटेल. आजोळकडील गावी जाण्याची संधी मिळेल. भाड्याने घर बदलाचा विचार पक्का कराल.
वृषभ :–होमसिक मुलांना मानसिक दडपण आल्यासारखे वाटेल. लहान भावंडाच्या मदतीने घरातील आवराआवर कराल. व्यावसायिकांना धनार्जनाचे नवनवीन मार्ग सुचतील. वडीलांच्या प्रतिष्ठेमुळे, ओळखीमुळे अडलेले काम पूर्ण होईल.
मिथुन :–तुमच्या रोग प्रतिकारशक्ती मधे वाढ झाल्याचे जाणवेल. मुलांच्या आवडी निवडीत सकारात्मक बदल होईल. ज्यांना अँलोपँथिचा त्रास होतो त्यानी आयुर्वेदाचा विचार करावा.
कर्क :–हाती घेतलेल्या कामात अचानक अडथळा निर्माण होईल. कुटुंबातील ज्येष्ठ मंडळींना लहान मुलांना, नातवंडांना एखादी वस्तू भेट द्यावीशी वाटेल. राजकीय मंडळीनी आज शांत रहावे कोणाशीही स्पर्धा करू नये.
सिंह :–बर्याच दिवसापासून न्यायालयात सुरू असलेला वाद कोर्टाच्याच मध्यास्थीने मिटण्याची लक्षणे जाणवतील. आजारी असलेल्या लहान मुलांना आजपासून बरे वाटू लागेल. लहानशा प्रवास संभवतो.
कन्या :– मानसन्मान हा मागून मिळत नसतो याची प्रचिती येईल. सामाजिक स्तरावर तुम्ही करत असलेल्या कामाचा एक आदर्श ठसा उमटेल. आजवर तुमच्यापासून दूर गेलेले नातेवाईक तुमच्या जवळच असल्याचे जाणवेल.
तूळ :–अध्यात्मिक उपासकांना सामुदायिक उपासनेत सामिल करून घेतले जाईल. कुटुंबात धार्मिक समारंभाचे आयोजन कराल. आज दुपारनंतर नोकरीच्या ठीकाणी महत्वाच्या कामात वरिष्ठांचे मार्गदर्शन मिळेल.
वृश्र्चिक :–बर्याच दिवसापासून न सापडणारी वस्तू चोरीला गेल्याचा निष्कर्ष खरा ठरेल. वाहन चालवताना नियम न पाळल्याने दंड भरावा लागेल. सरकारी क्षेत्रातील मंडळीना त्यांच्या हातातील अधिकारांवर बंधने येतील.
धनु :–दवाखान्यात अँडमिट असलेल्यांना धोका टळून प्रकृती सुधारत असल्याने आनंद होईल. नोकरीत सहकारी वर्गाची मनापासून मदत मिळेल. महिलांना घरगुती व्यवसायातील आर्थिक वाढ चांगली होईल.
मकर :–वैवाहिक सुखामधील अडचणी गैरसमजामुळे होत्या याची खात्री पटेल. व्यवसायातील भागिदारी तील गुंतवणुकीत वाढ करण्याचे ठरेल. उच्चशिक्षण निमित्ताने परदेशी जाण्याचा निर्णय घेतला जाईल.
कुंभ :–नोकरीतील कामात अचानक बदल करून दुसरेच काम सोपवले जाईल. तरूणांना मित्राच्या आजारपणासाठी दवाखान्यात धावपळ करावी लागेल. सरकारी बँकेच्या कर्ज प्रकरणातील अडचणीत वाढ होईल.
मीन :–नोकरीतील बदलीची शक्यता वाढेल. घरामधील नवनवीन वस्तुंच्या खरेदीच्या विषयांना जोर येईल. सामाजिक आरोग्याची जाणीव वाढवणार्या घटना घडतील.
||शुभं–भवतु ||
Dhanyawad Tai