Read in
रविवार 16 मे 2021 ते शनिवार 22 मे 2021 पर्यंतचे साप्ताहिक राशी भविष्य
रविवार. 16 मे चंद्ररास मिथुन दिवसरात्र व चंद्रनक्षत्र आर्द्रा 11:33 पर्यंत व नंतर पुनर्वसु. सोमवार 17 मे चंद्ररास मिथुन 06:52 पर्यंत व नंतर कर्क.
चंद्रनक्षत्र पुनर्वसु 13:20 पर्यंत व नंतर पुष्य. मंगळवार 18 मे चंद्ररास कर्क दिवसरात्र व चंद्रनक्षत्र पुष्य 14:54 पर्यंत व नंतर आश्लेषा. बुधवार 19 मे चंद्ररास कर्क 15:47 पर्यंत व नंतर सिंह. चंद्रनक्षत्र आश्लेषा 15:47 पर्यंत व नंतर मघा. गुरूवार 20 मे चंद्ररास सिंह दिवसरात्र व चंद्रनक्षत्र मघा 15:56 पर्यंत व नंतर पूर्वा फाल्गुनी. शुक्रवार 21 मे चंद्ररास सिंह 21:06 पर्यंत व नंतर कन्या. चंद्रनक्षत्र पूर्वा फाल्गुनी 15:21 पर्यंत व नंतर उत्तरा फाल्गुनी. शनिवार 22 मे चंद्ररास कन्या दिवसरात्र व चंद्र नक्षत्र उत्तरा फाल्गुनी 14:05 पर्यंत व नंतर हस्त.
सोमवार 17 मे राजी श्री आद्धशंकराचार्य यांची जयंती.
वरील प्रत्येक दिवसाच्या राशी व नक्षत्रांचा विचार करून व रोजच्या पहाटेच्या 05 :30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :– ज्या नोकरीच्या इंटरव्हूच्या पत्राची वाट बघत आहात ते या सप्ताहात उपलब्ध होणार आहे. माहिती व प्रसारण संस्थेत असलेल्याना माहितीचा स्त्रोत तपासून पहावा लागेल नाहीतर अनर्थ होईल. वाहन विकायला काढले असेल तर फक्त जाहिरातीच्या माध्यामातून विकले जाणार आहे. राहत्या घराला भाडेकरू मिळेल पण तपासून घ्यावा लागेल. गायन कलेच्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करता येणार आहे. कलाकुसरीची कामे करणार्यांना स्वत:चे काम सुरू करून लहानसा उद्योग प्रस्थापित करता येईल. तरूणांना साथीच्या आजाराचा त्रास संभवतो.
वृषभ :–तुमच्या डोळ्यातील सौंदर्याचे मित्रमैत्रिणींकडून कौतुक होईल. प्राणी पक्षी निरीक्षणाच्या क्षेत्रातील तरूणांना आपले करियर करण्याची संधी मिळेल. कुटुंबातील सर्वांचा हातभार घेऊन या सप्ताहात तुम्हाला तुमच्या नवीन व्यवसायात चांगल्या प्रकारे स्थिर होता येणार आहे. लहान भावंडाच्या परदेशी शिक्षणात काळजीचे वातावरण निर्माण होईल. भागिदाराच्या सहाय्याने परिस्थितीवर मात करता येणार आहे. मोबाईल, इंटरनेटच्या सेवेतील कर्मचार्यांना मोठ्या दिव्यातून जावे लागेल. कुरीअर क्षेत्रातील कर्मचार्यांना चांगली आर्थिक कमाई वाढेल.
मिथुन :–हा सप्ताह तुमचा अतिशय खर्चाचा जाणार असून त्यासाठी तुम्हालाच खर्चाला आवर घालावा लागेल. कौटुंबिक समस्या सोडवताना तुमची दमछाक होईल. आईला तिच्या नोकरीत मानसन्मान मिळण्याच्या संधी उपलब्ध होणार आहेत. वडिलांच्या व्यसनात वाढ होईल तरी त्यासाठी तुम्ही काय करू शकाल ते ठरवा. आँन लाईन वेबिनारच्या माध्यमातून तुमच्या उत्तम वक्तृत्व शैलीचे दर्शन होईल. व्याख्यातांना नविन सामाजिक विषयावर आपली मते मांडण्याची संधी मिळेल. विद्यार्थ्यांना स्मरणशक्तीच्या खेळात बक्षिस मिळवता येणार आहे. जाहिरात यंत्रणेत काम करणार्यांना नवनवीन कल्पनाशक्तीला वाव मिळेल व वरिष्ठांकडून मान्यताही मिळेल.
कर्क :–नोकरीतील अपेक्षित बदलाचे स्वप्न पूर्ण होण्याचे संकेत मिळतील. गर्भवती महिलांनी शारिरीक कष्ट न करता आपल्या गर्भाला सांभाळण्यास प्राधान्य द्यावे. पर्सेस, बँग्ज तयार करणार्या घरगुती उद्योजकांना चांगली आँर्डर मिळेल.लहान मुले जेवत असताना त्यांच्या बाजूलाच बसा, एखादा घास अन्ननलिकेत अडकल्याने ठसका लागण्याचा धोका आहे. आईच्या इच्छा पूर्ण करण्याकरीता तुम्ही भावंडे एकत्र याल व आईला सरप्राईज गिफ्ट द्याल. तुमच्या मानसिक शक्तीमधे वाढ झाल्याने अवघड कामेही मार्गी लावाल. चित्रकला व पेंटींग्ज मधे वेळ मजेत घालवाल.
सिंह :–वडिलांच्या नोकरीत अचानक बदल संभवतो. पण तो सकारात्मक असेल. पतीपत्नीच्या व्यवसायात अचानक वैचारिक मतभेद होऊन व्यवसायावर परिणाम होतील. शेजारील कुटुंबाकरता धावपळ करावी लागेल व स्वेच्छेने आर्थिक खर्च करावा लागेल. स्वयंपाक घराची स्वच्छता करताना महिलांना आनंद होईल. एकमेकांच्या आवडी निवडी याबाबत संततीबरोबर मतभेद होऊन त्याचे रूपांतर खरोखरचे भांडणात होईल. चोरीला गेलेल्या वस्तूंचा सुगावा लागेल व त्याचा ताबा मिळवण्यासाठी प्रयत्न कराल. ज्येष्ठांच्या विचाराने मौल्यवान वस्तूंच्या खरेदीचे प्रस्ताव पक्के होतील. घरातून रागवून पळून गेलेल्या मुलाला घरी परत जाण्याचे वेध लागतील.
कन्या :–लहान भावंडाच्या प्रकृतीची काळजी मानसिक ताण वाढवेल. दवाखान्यासाठी धावपळ करावी लागेल. सरकारी कार्यालयातील कर्मचार्यांना त्यांच्या कामाचे जे लाभ मिळण्याचे ठरले आहे त्याची प्राप्ती होईल. घरगुती पार्लरचा व खाद्य पदार्थांच्या व्यावसायिकांना मोठ्या आँर्डर्स मिळतील. वर्कशाँप मधे काम करणार्या कामगारांना अचानक आँर्डर्समधे वाढ झाल्याने आर्थिक लाभ होणार असल्याचे कळेल. शब्दांची कोडी, काव्य व लेखन यांतून समाजाकडून प्रशंसा मिळेल. नोकरीतील नैराश्याची भावना कमी कमी होत असल्याचे जाणवेल. शाळकरी मुलांना कष्टाच्या कमाईचे मोल कळेल.
तूळ :–अचानक स्वेच्छानिवृत्ती घ्यावयाचे मनात येईल व त्याबाबत विचार कराल. सरकारी नोकरीतील अधिकारी वर्गाच्या हातातील अधिकाराचा बदल होईल म्हणजे कमी केले जातील. महिलांना मांड्यांचे स्नायू दुखण्यांचा त्रास होईल. महिलां अंत:स्फूर्तीने विविध विषयावर काव्यलेखन करतील. तरूणांनी अनोळखी व्यक्तीला प्रतिसाद देऊ नये. महिलांची, मुलींची फेसबुक मैत्री त्यांना संकटात आणेल. व्यवसायातील महत्वाकांक्षेत वाढ होऊन त्या दृष्टीने मेहनत सुरू कराल. आजपर्यंत तुम्हाला जे मुद्धे पटत नव्हते तेच मुद्धे तज्ञांनी दिलेल्या सल्ल्यानंतर पटू लागतील. तुमच्या कामात उत्तम व्यवस्थापनाची गरज भासणार आहे.
वृश्र्चिक :–तुमच्या पाठीराख्यांच्या मदतीने तुम्ही या सप्ताहाच्या सुरूवातीलाच मोठी उडी मारणार आहात. ज्या कामाच्या चौकशीसाठी तुमची निवड झाली आहे त्यात तुम्हाला वेगवेगळ्या महत्वाच्या विषयांवरील छुपी माहिती मिळेल. कोणत्याही कामाची जबाबदारी स्विकारण्यापूर्वी त्यातील गुंतागुंतीचा अंदाज घेऊनच नंतर स्विकार करा. महिलांना आवडती वस्तू सहजासहजी उपलब्ध होणार नाही. सरकारी कागदपत्रांवर सह्या करताना त्यावरील माहिती वाचल्याशिवाय व समजून घेतल्याशिवाय करू नका. इतरांच्या सांगण्यावरून कोणत्याही क्षेत्रात पैसे गुंतवू नका.
धनु :–तुमच्या महत्वाच्या कामासाठी तज्ञांचा सल्ला घ्यावा लागेल. आध्यात्मिक संस्थेमधे पात्रता नसताना नुसत्या ओळखीच्या आधारे प्रवेश देऊ नका. आराध्य दैवतांच्या उपासकांना आपली उपासना फळास आल्याचे जाणवेल. परदेशी असलेल्या मुलांना त्याच्या अडचणीच्या प्रसंगी वडिलांचा सल्ला महत्वाचा ठरणार आहे, त्यासाठी मुलांनी वडिलांबरोबर मोकळेपणाने बोलणे महत्वाचे आहे. सरकारी क्षेत्रातील कार्यालयातील कर्मचारी व अधिकारी वर्गाने प्रत्येक महत्वाच्या मिटींगला उपस्थित न राहिल्याबद्दल जाब विचारला जाईल. वयस्कर मंडळीना मुळात असलेला किडनीचा त्रास जाणवेल. हाँस्पिटलमधे अँडमिट असलेल्या वडिलांबाबत विशेष जागरूक रहावे लागेल.
मकर :–ज्यांची प्रसुतीची तारीख या सप्ताहात आहे त्यांची प्रसुती अगदी सहजपणे होणार नसून सिझेरियन करावे लागेल. वयस्कर महिलांना मूत्रपिंड, मुत्राशय याबाबतचा त्रास होईल. चुलत घराण्याकडून वडीलांना जे मिळणार होते ते हातात येणार नसल्याचे कळेल. कोणतीही आगपाखड न करता वस्तुस्थितीचा स्विकार करा. जाहिरात क्षेत्र, मल्टी मिडीया मधील तरूणांना कामातील प्रोजेक्टमधे मोठ्या संधी मिळतील. आकाशवाणी, दूरदर्शनच्या क्षेत्रातील अँकर्सना मानसिक गोंधळ उडवणारी कामे करावी लागतील. प्रत्येक काम जागरूकतेने करा.
कुंभ :–बँकेच्या कर्ज देण्या घेण्याच्या व्यवहारातील तुमचा सहभाग, सल्ला महत्वाचा राहील. एकत्र कुटुंबातील पूर्वजांच्या धनाबाबतच्या निर्णयाची जबाबदारी तुमच्यावर येईल व अडचणीत याल. मेडीकल आँफिसर, हेल्थ आँफिसर यांना फार मोठी जबाबदारी सांभाळावी लागणार आहे. नोकरीच्या ठिकाणी जबाबदारीच्या ओझ्याखाली पिचून जाल. विमा एजंट वि विमा पाँलिसी यांबाबत शहानिशा करताना दमछाक होणार आहे. कोणताही निर्णय स्वत:वर न घेता इतर जेष्ठांच्या सल्ल्याने घ्यावा. कोणत्याही प्रकारच्या गुप्तगोष्टीना सार्वजनिक रूप देण्यात सहभागी होऊ नका. इतरांच्या प्रेमविवाहाच्या व्यवहारात तटस्थ रहा. रूढीविरूद्ध केलेल्या कामाचा तुम्हाला त्रास होणार आहे.
मीन :–उष्णतेच्या रोगांनी त्रस्त व्हाल तरी त्वरीत डाँक्टरांकडून योग्य ती उपाय योजना करून घ्यावी. वयस्कर मंडळीना निद्रानाश, मानसिक रोग यांचा त्रास होईल. आयुर्वेदाच्या डाँक्टर्सना पेशंटच्या कांही प्रश्र्नांचा उत्तरे देणे कठीण जाणार आहे. आंतरधर्मीय विवाहासाठी तुम्ही केलेली मदत तुम्हालाच त्रासदायक होणार आहे. अनाकलनीय रोगा विषयी तुम्हाला तज्ञांकडून माहिती मिळाल्याशिवाय आजाराचे कारण व उपाय या विषयावर जाहिर बोलण्याचे टाळा. जून्या वास्तूसंबंधित असलेल्या व्यवसायात खूप मेहनत करूनही हाताला काहीही लागणार नाही.
||शुभं-भवतु ||