Read in
शुक्रवार 14 मे 2021 चे दैनिक राशीभविष्य
शुक्रवार 14 मे 2021 चंद्ररास वृषभ 19:12 पर्यंत व नंतर मिथुन. चंद्रनक्षत्र मृगशीर्ष अहोरात्र.
वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05 :30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
- आज शुक्रवार वैशाख शुक्लपक्ष तृतीया म्हणजेच अक्षय्य तृतीया. अ+ क्षय. ज्या तिथीचा क्षय होत नाही ती. या दिवशी करण्यात येणार्या गोष्टींचा कधीही नाश होत नाही तर त्याची वृद्धीच होते. म्हणूनच आज सोने किंवा तत्सम किंमती वस्तू खरेदी करण्याचा प्रघात आहे.
- आज परशुराम जयंती आहे.
मेष :–विद्यार्थ्यांना लवकरच आपल्या शैक्षणिक इच्छा पूर्ण करता येणार असल्याने आजच्या मुहूर्तावर त्याचे नियोजन करावे. व्यावसायिक क्षेत्रातील अंदाज बांधल्याशिवाय, माहिती घेतल्याशिवाय काहीही आर्थिक व्यवहार करू नका.
वृषभ :–आज तुम्हाला तुमच्या आवडत्या गोष्टी करता येणार आहेत. सुख समाधान देणार्या घटना कुटुंबातील व्यक्तींकडून घडतील. मुलांकडून वयस्कर आईवडीलांना त्याच्या आवडीची वस्तू भेट केली जाईल.
मिथुन. :–पूर्वीच्या केलेल्या गुंतवणूकीतून चांगला फायदा होईल. दत्तक मुलीच्या विवाहाचा प्रश्र्न मार्गी लागण्याची सूचकता मिळेल. मुलीना वयात जास्त अंतर असलेले स्थळ येईल. डाँक्टरांच्या सल्ल्याने आजारपणावर योग्य उपाय मिळेल.
कर्क :–राजकीय क्षेत्रातील मंडळीना अचानक प्रतिस्पर्ध्यावर मात करता येणार आहे. कुटुंबात सुना, जावई व शेजार्यांना घेउन लहानशा समारंभ साजरा कराल. लहान मुलांच्या डाव्या कानाचे दुखणे त्रास देईल.
सिंह :–पुरूषांना सासूबाईंना घेऊन दवाखान्यात जावे लागेल. तरूण मुले व मुली आपल्या प्रेमाच्या, आवडत्या मित्रमैत्रिणीसाठी महत्वाची खरेदी करतील. घराच्या गच्चीत एखादे कबुतर, चिमणी जखमी होऊन पडेल.
कन्या :–अचानक रस्त्यावर चालताना वाहनाची धडक लागण्याची भिती आहे. वयस्कर मंडळीनी आज बाहेर जाऊ नये. कुटुंबातील लहान व्यक्ती विचारातील समजूतदारपणा दाखवतील. कुटुंबात सहकार्याची भावना असल्याचे प्रकर्षाने जाणवेल.
तूळ :–आँन लाईन चैनीच्या वस्तूंची खरेदी करण्याचा मोह आवरणार नाही. अती मसालेदार खाण्याने पित्ताचा त्रास होईल. पुरूष मंडळीना महिलांबरोबर वागताना, बोलताना समंजसपणाने बोलावे लागेल व मर्यादा पाळाव्या लागतील.
वृश्र्चिक :–द्वितीय संततीकडून मनासारखी साथ मिळाल्याने मनाला समाधान वाटेल. व्यवसायासाठी केलेल्या प्रवासात कांही कारणाने थांबावे लागून वेळेचे नियोजन चुकेल. महिलांना अचानक पोटदुखीचा किंवा ओटीपोट दुखण्याचा त्रास होईल.
धनु :–उत्पादन क्षेत्रातील कामगार वर्गास मनाला त्रास होणारे अनुभव येतील. डाँक्टर पेशातील कर्मचारी वर्गास अवघड परिस्थितीला तोंड द्यावे लागेल. घरातील बाथरूम, संडास मधील सांडपाण्याच्या आऊटलेटमधे बिघाड निर्माण होईल.
मकर :–प्रेमविवाहात अडकलेल्या मुलांनी रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. तरूणांनी व्यवसाचा विचारही करू नये. प्रौढ महिलांना अचानक विस्मरणाचा त्रास होऊ लागेल तरी लगेच डाँक्टरांचा सल्ला घ्यावा.
कुंभ :–बिल्डर मंडळीनी आपली कामे वेळेवर न केल्याबद्धल सामाजिक स्तरावरून प्रक्षोभ सहन करावा लागेल. सरकारी नियमांचे बंधन न पाळणार्या वाहन चालकांना मोठा दंड सोसावा लागेल.
मीन :–शाळकरी मुलांना सुंदर हस्ताक्षरासाठी उत्तम तज्ञांचे मार्गदर्शन मिळेल. लहान मुलांच्या अभ्यासातील लहान लहान गोष्टींकडे पालकांना लक्ष द्यावे लागेल. विजेच्या उपकरणांपासून वयस्कर मंडळीना धोका आहे तरी काळजी घ्या.
||शुभं–भवतु ||