daily horoscope

बुधवार 12 मे 2021 चे दैनिक राशीभविष्य

Read in

ुधवार 12  मे 2021 चे दैनिक राशीभविष्य

बुधवार 12 मे चंद्ररास मेष 06:17 पर्यंत व नंतर वृषभ.

चंद्रनक्षत्र कृतिका 26 :39  पर्यंत व नंतर रोहिणी. वरील दोन्ही राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05 :30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

 

मेष :–आज बर्‍याच दिवसापासूनची स्वत:ची इच्छा पूर्ण करण्याकरीता खर्च करण्याची मनाची तयारी होईल. टाँन्सिल्सचा त्रास संभवतो तरी काळजी घ्या. वयस्कर मंडळीना विस्मरण झालेली गोष्ट अचानक आठवेल.

 

वृषभ :–जोडीदाराच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. कोणत्याही प्रकारच्या आर्थिक व्यवहारात फायदा होईल.  कुटुंबातील  ज्येष्ठ व्यक्तीला महत्वाच्या कामासाठी घरापासून दूर जावे लागेल. नोकरदारांना वैयक्तिक डाँक्युमेंटची गरज भासेल.

 

मिथुन :–आज अचानक शरिरात कार्यशक्तीची कमतरता जाणवेल. तरूण महिलांच्या तळपायाची आग होईल. महिला व पुरूष सर्वानाच आईकडून, तुमचा भाग्योदय करणार्‍या टिप्स मिळतील.

 

कर्क :–लहान मुलांना टेरेस गच्चीतून वाकण्या पडण्यापासून सांभाळावे लागेल.महिलांच्या उजव्या पायाच्या खुब्यात वेदना होतील. वडिलांना नोकरीतील न मिळालेले पैसे लवकरच मिळणार असल्याचा निरोप मिळेल.

 

सिंह :–फँक्टरी किंवा व्यवसायातील उत्पादनाच्या जागेतील अडचणी दूर करण्याकरीता धार्मिक विधीचे आयोजन कराल. तरूणांना त्याच्या कार्यक्षेत्रातील विशेष कामगिरीबद्दल  समाजाकडून गौरव होईल.

 

कन्या :–तुमच्या बोलण्यातील, विचारातील दोलायमानता आज इतरांच्या लक्षात येईल तरी महत्च्याच्या ठिकाणी व्यक्त होऊ नका. व्यवसायातील यश अपयशाला इतरांपेक्षा स्वत:लाच जबाबदार धरा.

 

तूळ :–गर्भवती महिलांनी आज फक्त स्वत:ची काळजी घ्यावी. घरातील टायलेट बाथरूममध्ये जपूनच वावरावे. ज्यांचे इन्शुरन्सचे पैसे यायचे आहेत त्यांना आज निरोप येईल किंवा डायरेक्ट पैसे मिळतील.

 

वृश्र्चिक :–तुमच्या व्यवसायात आपणहून भागिदाराकडून नवीन गुंतवणूकीबाबतचा प्रस्ताव येईल. तुमची हरवलेली वस्तू चोरीला गेली असल्याचे लक्षांत येईल. विवाहिताना जोडीदाराची चांगली प्रेमळ साथ मिळेल.

 

धनु :–तुमच्या घरातील भाडेकरू अचानक जागा सोडत असल्याचे सांगेल. पोट दुखणे, अपचन होणे यासारखा त्रास संभवतो. समोरील प्रतिस्पर्ध्याच्या ताकदीपुढे तुमचे कांहीही चालणार नाही. आज शक्यतो सर्वच ठिकाणी नमते घ्यावे.

 

मकर :–व्यवसाय, घरगुती उद्धोगात सर्वांची चांगल्या प्रकारे मदत मिळेल. महिलांना अध्यात्मिक क्षेत्राविषयी कुतूहल निर्माण होईल. घरातील विजेच्या उपकरणात अचानक बिघाड निर्माण होऊन कामे थांबतील.

 

कुंभ :–आज कोणत्याही क्षेत्रात कसलीही गुंतवणूक करू नका. तटस्थ रहा. आईला दवाखान्यात अँडमिट करावे लागेल तरी आधीच प्रकृतीची काळजी घ्यावी. जोडीदाराच्या नोकरीच्या ठिकाणात  किंवा कामाच्या प्रकारातही बदल होईल.

 

मीन :–लहान भावंडाच्या प्रकृतीची काळजी वाटणार्‍या घटना घडतील. प्रवासाचा योग आहे पण तो त्रासदायक असल्याने प्रवास टाळावा. सरकारी कामाच्या ठिकाणी तुमची छाप पडेल असे वागावे लागेल तरच काम होईल.

||शुभंभवतु ||

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *