daily horoscope

मंगळवार 11 मे 2021 चे दैनिक राशीभविष्य

Read in

मंगळवार 11  मे 2021 चे दैनिक राशीभविष्य

मंगळवार 11  मे चंद्ररास मेष दिवसरात्र व चंद्रनक्षत्र भरणी  23:30  पर्यंत व नंतर कृत्तिका.

वरील दो राशी नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.

आज चैत्र अमावास्या 24:29  पर्यंत व नंतर वैशाख शुक्ल प्रतिपदा सुरू होत आहे.

मेष :–मनातील इच्छा प्रत्यक्षात उतरवण्याकरीता फारशी मेहनत घ्यावी लागणार नाही. मोठ्या भावंडाच्या मदतीने नवीन प्रोजेक्टला सुरूवात कराल. गाण्याच्या कार्यक्षेत्रात काम करणार्या विद्यार्थ्यांना त्यांच्या गायन गुरूंकडून नवीन सोपी पद्धत समजेल.

 

वृषभ :–कामाच्या ठिकाणी ऐनवेळी हातापायातील बळ कमी झाल्याचे जाणवेल . कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीच्या मदतीमुळे मनातील भिती दूर होऊन काम करण्याचे धाडस अंगात येईल.

 

मिथुन :–तब्बेतीची तक्रार बळावेल तरी जास्त वेळ न काढता डाँक्टरांना भेटा. प्रशासनातील अधिकारी वर्गाची तुमच्यावर मेहेरनजर होऊन त्यांची मदत मिळेल. महिला अधिकारी मदत करतील.

 

कर्क :–रक्ततपासणीचा रिपोर्ट वेळेवर मिळाल्याने डाँक्टरांचा उपाय लवकर सुरू होतील. वकील मंडळीना फौजदारी दाव्यासाठी व क्रिमिनल केससाठी मोठी तयारी करावी लागेल. वडीलांना चक्कर येण्याची दाट शक्यता आहे.

 

सिंह :–नोकरीतील येणारे पैसे, व्यवसायातील येणार असलेली उधारी या दोन्हीसाठी प्रयत्न केल्यास लवकरच पैसे हातात येऊ शकतील. महिलांच्या घरगुती उद्धोगाची चांगली वाढ होत असल्याचे जाणवेल.

 

कन्या :–आई व वडीलांचे किरकोळ कारणावरून झालेले मतभेद भांडणाचे रूप घेतील. वडील रागारागाने घरातून निघून जातील. आईला आज झोपेची गोळी घेतल्याशिवाय झोप येणार नाही.

 

तूळ :–वडीलांच्या नोकरीच्या ठिकाणचे थटलेले पैसे मिळतील. प्रथम संततीच्या करियरमधील प्रगतीमुळे आनंद व समाधान वाटेल. तरूणांनी कोणत्याही व्यसनांचा आधार घेऊ नये.

 

वृश्र्चिक :–पोटात दुखण्याच्या त्रासाने आज तुम्ही अगदी हैराण होऊन जाल. लहान मुलांच्या हातातील कोणतीही असेल ती वस्तू तोंडात घालतील. आईच्या कर्तृत्वाने तिच्यापुढे सर्वजण नतमस्तक व्हाल.

 

धनु :–डोकेदुखीचे खरे कारण समजण्यासाठी डाँक्टरांच्या सल्ल्याने एम. आर. आय. करावा लागेल. वयस्कर मंडळींचा सांधेदुखीचा व डोकेदुखीचा त्रास आटोक्यात येणार नाही.

 

मकर :– लहान लहान मुलांमधे आज तुम्ही रमणार आहात. कोणत्याही प्रकारच्या आर्थिक व्यवहारात आज तुम्हाला फायदाच फायदा होणार आहे. पण उगाच गावभर चर्चा करू नका. जरा शांततेने घ्या.

 

कुंभ :– भाऊबहीण सहविचाराने निर्णय घेतील व परिस्थितीतून मार्ग निघेल. नव्या खरेदीच्या शेवटच्या क्षणी विचार बदलतील व खरेदी रद्ध कराल. नोकरीच्या ठिकाणी आज नेहमीपेक्षा वेगळेच काम करावे लागेल.

 

मीन :–जास्त वजनाच्या मंडळीनी आपल्या जवळच्या नात्यातील माणसांची मदत घ्यावी. गेल्या सप्ताहातील अनुभवावरून आत्मचिंतन केल्यास आर्थिक फायदा होईल व अडचणीं  निर्माण होणार नाहीत.

||शुभंभवतु ||

 

One thought on “मंगळवार 11 मे 2021 चे दैनिक राशीभविष्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *