Read in
सोमवार 10 मे 2021 चे दैनिक राशीभविष्य
सोमवार 10 मे 2021 चंद्ररास मेष दिवसरात्र व चंद्रनक्षत्र अश्र्विनी 20:24 पर्यंत व नंतर भरणी.
वरील दोन्ही राशी व नक्षत्रांचा
विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :– विचारात व निर्णयात एकवाक्यता ठेवणे आज तुम्हाला अवघड जाणार आहे. कुटुंबातील ज्येष्ठ महिलांकडून तुमच्या
विचारांना विरोध होईल. वडीलांकडून तुमच्या सध्याच्या अडचणींसाठी आर्थिक प्राप्ती होईल व मार्ग निघेल.
वृषभ :- तुम्ही कुटुंबात वडीलधारे असाल तर तुम्हाला मन खंबीर करून निर्णय घ्यावा लागेल. व्यवसायातील भागिदार असाल तर
व्यवहारातील पारदर्शकतेचा प्राधान्य द्या. नोकरीत वरीष्ठांबरोबर बोलताना अहंकाराला दूर ठेवा.
मिथुन :–पुस्तक प्रकाशनाच्या आँन लाईन कार्यक्रमात एक मान्यवर म्हणून भाग घ्याल. जे कोडिड 19 ने आजारी दवाखान्यात
अँडमिट आहेत त्यांना आज प्रकृतीत सुधारणा होउ लागेल व दवाखान्यातून घरी लवकरच सोडणार असल्याचे कळेल.
कर्क :–परीक्षेत मिळालेली सूट व त्यामुळे मिळालेल्या यशामुळे उगाच फुशारून जाल. बदलत्या परिस्थितीचा विचार करून
करियर विषयीचा सल्ला घेऊन अभ्यासाची दिशा ठरवा. किरकोळ घरगुती उद्योग करणार्यांना आज चांगल्या आँर्डर्स मिळतील.
सिंह :–न्यायाधिश मंडळीना अचानक कोर्टाच्याच महत्वाच्या कामासाठी बाहेरगावी जावे लागेल. धर्मग्रंथाच्या अभ्यासकांना मार्ग
दर्शकांना नवीन पद्धतीने शिकवण्याची एक युक्ती सापडेल. कामातील पारदर्शकता महत्वाची ठरेल.
कन्या :–आँपरेशन तातडीने करणे आवश्यकच असेल तरच करावे नाहीतर पुनर्विचार करावा व पुन्हा डाँक्टरांचा सल्ला घ्यावा.
नोकरीतील तुमच्या सर्व प्रश्र्नांना उत्तरे आज मिळणार आहेत हे लक्षात घ्या कोणत्याही निर्णयाची घाई करू नये.
तूळ :–परदेशातून भारतात येण्याची घाई करू नका प्रवास खंडीत होउन मधेच लटकावे लागेल ही परिस्थिती पुढील तीन दिवस
तशीच असणार आहे. महिलांना स्वयंपाकघरातील कामात पुरूष वर्गास आज मदत करावी लागेल.
वृश्र्चिक :–स्पर्धात्मक परिक्षेचा अभ्यास करणार्यांनी आपला अभ्यासात तज्ञांकडून मार्गदर्शन घ्यावे. तरूणांना वडीलांच्या
मर्जीखातर स्वत:चे निर्णय बदलावे लागतील. विवाहाच्या बाबतीत सारासार विचार करूनच निर्णय घ्या.
धनु :–ह्रदयरोग असणार्यांना आपण ह्रदयाच्या आजारपणातून बाहेर पडत असल्याचा अनुभव येईल. अपत्यप्राप्तीच्या इच्छूकांनी
डाँक्टरांच्या सल्ल्याशिवाय इतर कोणतेही उपाय करू नयेत. पायांचे दुखणे असणार्या महिलांनी कोणतीही रिस्क घेऊ नये.
मकर :–तुमची तब्बेत कितीही चांगली असली तरी कोविड 19.च्या इन्फेक्शनपासून तुम्हाला येत्या 4 -5 दिवस खूप सांभाळावे
लागेल. सरकारी क्षेत्रातील उच्चपदाधिकार्यांनी आपले अधिकार वापरताना दहा वेळा विचार करावा लागेल.
कुंभ :–स्टेशनरीच्या दुकानदारांना व्यवसाय वृद्धीसाठी कांही नवीन युक्त्या वापराव्या लागतील नवीन भांडवल गुंतवताना पूर्ण
विचार करूनच करा. तरूण वर्गास आनंदाच्या भरात आत्मविश्वास वाढल्याचे जाणवेल. लहान बहिणीच्या आरोग्याची काळजी
घ्या.
मीन :–महसूल विभागात काम करणार्या अधिकार्यांना आज अचानक कोंडीत पकडल्याचे जाणवेल. कुटुंबात तरूण वर्गाच्या
क्लीष्ट प्रश्र्नांना उत्तरे देताना वयस्करांचा मानसिक तोल जाईल व त्यांना त्रासही होईल.
||शुभं–भवतु ||