Read in
शनिवार 08 मे 2021 चे दैनिक राशीभविष्य
शनिवार 08 मे 2021 चंद्ररास मीन दिवसरात्र व चंद्रनक्षत्र उत्तराभाद्रपदा 14:46 पर्यंत व नंतर रेवती.
वरील दोन्ही राशी व
नक्षत्रांचा विचार करून व आजच्या पहाटेच्या 05:30 च्या कुंडली नुसार कृष्णमूर्ती पद्धतीने नक्षत्रीय फलादेश देत आहे.
मेष :–परदेशी संस्थांबरोबर करत असलेल्या कामातील थांबलेली प्रगती पुन्हा नव्याने सुरू होण्याचे संकेत मिळतील.
धार्मिक कामाच्या बाबतीतील तुम्ही करत असलेल्या मार्गदर्शनाची दिशा चूकत नसल्याची खात्री करून घ्या.
वृषभ :–बर्याच दिवसापासून हरवलेली वस्तू अचानक वडीलांना सापडेल. निवृत्त झालेल्या ज्येष्ठ मंडळींना सेवाभावी
संस्थेच्या माध्यमातून काम करण्याची संधी मिळेल. नोकरीतील नैराश्याची भावना कमी होत असल्याचे जाणवेल.
मिथुन :–आज प्रतिष्ठा वाढवणार्या घटना घडू लागतील. पूर्वनियोजित कार्यक्रम अचानक पुढे ढकलण्यात विचार पक्के
होतील. आँन लाईन सेमिनारमधील तुमचा सहभाग इतरांकडून कौतुकाचा राहील.
कर्क :–पतीपत्नीच्या एकत्र व्यवसायातील अडचणींवर तोडगा निघेल. महिलांशी संबंधित आजारांवर उपचार करताना
डाक्टर मंडळीना त्रास निर्माण होईल. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या विचारांवर आत्मचिंतन करण्याची गरज आहे.
सिंह :–तुमच्या न बोलण्यामुळे, व्यक्त न होण्यामुळे राजकीय क्षेत्रातील विरोधक घाबरून मागे हटतील. सरकारी
कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी वकीलांची मदत घ्या. आयुष्यातील ताण तणाव दूर ठेवायचे असतील तर बोलण्यात
मार्दवता ठेवा.
कन्या :–पूर्वी दिलेल्या नोकरीच्या मुलाखतीतून तुम्हाला काँल येईल. आज अतिशय सांभाळून राहिलात तर संसर्गजन्य
रोगाचा त्रास होणार नाही. कुटुंबात आपल्या आवडीचे व समाधान देणार्या विषयावर चर्चा होतील.
तूळ :–व्यावसायिकांना दुसरा मनासारखा व्यवसायाचा पर्याय निर्माण होईल. तरूणांनी आपल्या मनातील विचार
जोडीदाराबरोबर मोकळेपणाने व्यक्त करावेत. घरमालक व भाडेकरू यांच्यातील संबंध विनाकारण बिघडत असल्याचे
जाणवेल.
वृश्र्चिक :–उच्च पदावरील नोकरदारांना नवीन नोकरीतील वातावरण आव्हानात्मक वाटेल. कुटुंबातील आनंददायक
वातावरणामुळे वयस्कर मंडळीना मानसिक स्वास्थ्य व समाधान मिळत असल्याचे जाणवेल.
धनु :–बेरोजगारांनी नोकरीबाबतचे आपले विचार अती ताठर ठेवू नयेत. आज येणारी संधी स्विकारा. नवीन घराचे पझेशन
मिळण्याचे मार्ग मोकळे होतील. वयस्कर मंडळीना आजारपणामुळे हाँस्पिटलमधे अँडमिट करावे लागेल.
मकर :–आजचा प्रवास त्रासदायक ठरणार आहे तरी प्रथम वाहनाची तपासणी करून मगच निघा. जाहिरातीवर भुलून
अचानक अनावश्यक खरेदी करून खर्च वाढवाल. तरूणांना दंड व हाथ दुखण्याचा त्रास होईल.
कुंभ :– तुमचा दुखणार्या घशाकडे अजिबात दुर्लक्ष करू का. डाँक्टरांचा सल्ला आवश्यक. अध्यात्मिक उपासकांनी उगीच
बढाया मारू नयेत. सज्जन व प्रामाणिक माणसाशी भेट होउन उत्तम विचार ऐकावयास मिळतील.
मीन :–नवीन नोकरीच्या मुलाखतीचा परिणाम फारसा सकारात्मक मिळणार नाही तरी त्यावर विसंबून राहू नका.
न्यायालयातील वाद न्यायालयाच्या बाहेर सुटणार असल्याचे लक्षात येताच वेळ वाया घालवू नका. तज्ञ व ज्येष्ठ
व्यक्तीचा सल्ला घ्या.a
as ||शुभं–भवतु ||
Dhanyawad Tai